Dictionaries | References

माजणें

   
Script: Devanagari
See also:  मांजणें

माजणें     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
with earth, ashes &c.: also to besmear or smear in general.
. 4 To grow richly, fully, luxuriantly--crops. 5 In lax phraseology. To spread abroad; to be diffused widely; as बातमी माजली: to encrease, enlarge, extend in every direction--a business, a town, a wilderness; as कारखाना माजला, वस्ती माजली, झाडी माजली: to swell or advance beyond all bounds;--applied ad libitum; as दरिद्र माजलें, महागाई माजली, गोंधळ माजला: to wax free and bold--the tongue, hand &c.; i. e. to take to abusing, striking &c.; as जिव्हा माजली, हात माजला.

माजणें     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
v i   Be drunk. Swell. Get fat. Spread abroad.

माजणें     

अ.क्रि.  
मादक पदार्थ , औषधें यांचा अंमल , चढणें ; कैफ चढणें ; झिंगणें ; धुंद होणें .
फुगणें ; शेफारणें ; चढून जाऊन तोरेबाज , दांडगा , उन्मत्त होणें . माजो बाहुबळें न छात्र । - मोउद्योग १३ . १५ .
मर्यादेबाहेर पुष्ट , मस्त , तुंद होणें ( खुराक खीरपुरी इ० कांनीं ).
पुष्कळ , पूर्णपणें , उफाड्यानें वाढणें ; फोफावणें . ( पीक ).
मुलुखभर पसरणें ; दूरवर प्रसूत होणें ( बातमी . गोष्ट ). बातमी माजली .
वाढणें ; वृद्धि पावणें ; सर्व बाजूंनीं विस्तार होणें ( धंदा , गांव , रान यांचा ). कारखाना माजला . वस्ती माजली , झाडी माजली .
अमर्याद वाढणें ; फुगणें . दरिद्र माजलें , महागाई माजली . गोंधळ माजला .
संवकणें ( जीभ , हात इ० ). जिव्हा माजली हात माजला . [ सं . मद , माद्य ; प्रा . मज्य ] म्ह० माजली महारीण फोपसाला जहार .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP