Dictionaries | References

मसण

   
Script: Devanagari

मसण     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
of a burning ground and constrain them to work some marvel. म0 माजणें To grow wildly or luxuriantly thick;--said of a corn-field, sugarcane-plantation &c. मस- णांत गोवऱ्या or हाडें जाणें g. of s. To be about to die. मसणांत or मसणीं दिवा लावणें To do any wild, unmeaning, and unprofitable feat; to act deviously from reason, usage, or decorum: also, with the power of v i मसणांत &c. दिवा लागणें. मसणांत देखील कावळ्यांचा उपद्रव No rest, not even in the grave. मसणांतून ओढून काढणें To raise from the brink of the grave. मसणांतून ओढून काढलेला Said of a meagre person who cannot, or of a slothful person who will not, do any work.

मसण     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 
मसणवट  f -टा
 m -टी
 f  A cemetery. burning ground.
मसणांत गोवऱ्या-हाडें, जाणें   Be about to die.

मसण     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : स्मशानभूमी, स्मशान

मसण     

 न. प्रेतें जाळण्याची किंवा पुरण्याची जागा ; स्मशान . अग्नीचा परम सण क्षणांत भासे पुरी भयंकर मसण । - मो रामायणें १ . ३४३ . [ सं . स्मशान ; प्रा . मसण ] म्ह० आचरट खाणें मसणांत जाणें .
०उठणें   ज्या ठिकाणीं लढाईंत भयंकर प्राणहानि झाली असेल किंवा जेथें असंख्य लोक जाळले गेले असतील अशा जागेबद्दल योजतात .
०जागविणें   स्मशानांतील पिशाचांना उठवून त्यांनां कांहीं अदभुत करावयास लावणें .
०माजणें   भरमसाट , अतिशय दाट वाढणें ( शेत , गवत इ० ). मसणांत गोवर्‍या , हाडें जाणें मरणाच्या पंथाला लागलेला असणें ; वयातीत असणें . मसणांत मसणीं दिवा लावणें कोणतेंहि उच्छृंखलपणाचें अशास्त्रीय , अयोग्य , निरर्थक कृत्य करणें . मसणांत देखील कावळ्यांचा उपद्रव कोणत्याहि स्थळीं - परिस्थितींत विश्रांति न मिळणें . मसणांतून ओढून काढणें अनेक उपाय करुन मरणोन्मुख माणसाला बरें करणें . मसणांतून ओढून काढलेला वि . कोणतेंहि काम करण्यास असमर्थ , अत्यंत अशक्त ; रोड ; किडकिडीत ( माणूस )
०कुटी  स्त्री. ( ना ) स्मशानभूमि .
०खाई  स्त्री. 
प्रेतें जाळण्याची खोलगट अशी जमीन .
( ल . ) खूप मोठें ( स्मशानाप्रमाणें ), भयाण , ओसाड घर .
०खुंट  पु. आईबाप , बायकामुलें इ० नसून विद्या व द्रव्य बेताचेंच असलेला अगडबंब , धष्टपुष्ट माणूस .
०फट्टें  न. ( गो . )
स्मशानांत पिंड देण्याकरितां शिजवितात तें अन्न .
( ल . ) रुचि नसलेलें जेवण .
०वट   टी टा - स्त्रीपु . स्मशानभूमि . मसणा - वि .
ज्याचें नांव आपणास माहीत नाहीं किंवा ज्याचें नांव सांगणें अप्रिय किंवा इष्ट नाहीं अशा माणसाबद्दल योजतात . फलाणा ; कोणीतरी , गोमाजी .
रागामध्यें संबोधनार्थ योजावयाचा शब्द . अरे मसण्या तुला शंभर वेळ सांगितलें तरी तूं तसाच .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP