|
न. मसण ; प्रेते जाळण्याची , पुरण्याची जागा . [ सं . शव + शयन ] ०कर्म न. प्रेतसंस्कार ; उत्तरक्रिया ; दहनविधि . ०निद्रा स्त्री. मृत्यु ; मरण . ( अखेरची झोप ). ०भट पु. प्रेतसंस्कार करणारा ब्राह्मण ; प्रेतदहनप्रसंगीचे मंत्र सांगणारा ब्राह्मण . ०भाजन न. १ प्रेतांभोंवतीं ज्या भांडयानें पाणी फिरवितात तें भांडे , मडकें . २ ( ल . ) टाकाऊ , निरुपयोगी , क्षुद्र वस्तु . भूमि , भूमी - स्त्री . मसण ; मसणवटा ; प्रेते जाळण्याची किंवा पुरण्याची जागा . भोजन - न . प्रेतसंस्काराच्या वेळी स्मशानांत करावयाचें जेवण ; उत्तरक्रियेच्या अथवा और्ध्वदेहिकाच्या वेळी ब्राह्मणांस घालावयाचे मृताच्या प्रीत्यर्थ जेवण . ०मित्र पु. मरणापर्यंत , स्मशनांत जाईपर्यंत ज्याची मैत्री टिकते असा सोबती , सहचर ( जन्मोजन्मींचा मित्र नव्हे ). ०मैत्री स्त्री. मरणापर्यंत टिकणारें साहचर्य , सख्य . ०रुदन , रोदन - न . १ स्मशानांतील रडणें ; वायफळ , वृथा केलेला शोक ( स्मशानांत कोणी ऐकून सांत्वन करूं शकत नाही याकरितां ). २ केवल तात्कालिक शोक ; मनापासून नव्हे पण वरवरचा शोक . ०वास पु. स्मशानांत राहणें ; जगापासून अलिप्त राहणें ; सर्व संग परित्याग करणें ; सर्व सोडून एकटे राहणें . ०वासी वि. १ स्मशानांत राहणारा . २ शंकराचे विशेषण . स्मशानवासी भूषण भयंकर पिंगट मुगुटी जटा । - प्रभाकर लक्ष्मीपार्वती संवाद . ०वैराग्य न. एखाद्याच्या मरणामुळें उत्पन्न झालेली तात्कालिक विरक्ति ; संसाराबद्दल केवळ स्मशानांत उत्पन्न झालेली उदासीनता . प्रेतदहनास आलेल्या मनुष्यास वाटणारी संसाराबद्दलची असारता . ०विरक्त वि. वैरागी ; स्मशानविरक्ति झालेला . ०विरक्ति स्त्री. स्मशानवैराग्य . ०साधन न. पिशाच्चादिक वश व्हावें म्हणून स्मशानांत केलेले जपजाप्य ; मंत्राचा प्रयोग वगैरे .
|