Dictionaries | References

माज

   
Script: Devanagari
See also:  माकां

माज     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
5 The cord belonging to the बैली of a loom. 6 A Rág or musical mode. See राग. माज करणें To be under the excitement of the periodical passion; to be in rut or heat;--used of cattle or beasts. माज मोडणें g. of s. To cool or be cooled; to pass or be passed out of the periodical heat. 2 fig. To have one's pride or conceit brought down: also to lose one's mettle or pluck or ardor. माज मोडणें g. of o. To bring down the haughtiness or arrogance of.
. Ex. सिंह देखोनि जिचा माज ॥ मुख न दावी मनुष्यांत ॥.
The ashes and earth prepared to be smeared over culinary vessels: also the smearing over of this ashes and earth: also the smeared state or the coating accomplished.

माज     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  Inflation; intoxicating quality.
माज मोडणें   Cool. Fig. Have one's pride brought down; bring down the arrogance of.

माज     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : अहंकार, नशा

माज     

 पु. ( काव्य ) मध्य ; कंबर ; मधला भाग . ( शरीर , टेकडी , घर यांचा ) सिंह देखोनि जिचा माज । मुख न दावी मनुष्यांत । [ सं . मध्य ; आर्मेजि . मंझ ; यूरोपियन . जि . मस्करे ]
सना . ( राजा . कु . ) मला . [ मी ] म्ह० ( गो . ) माका तुका पडना , वडे वाढूक घंडाना ; माका तुका पडता , वडे वाढूक घडता = मन एक असलें म्हणजे वाटतील त्या गोष्टी मनुष्यें एकमेकांसाठीं करतात .
( राज ) स्वयंपाकाच्या भांड्यास तें न जळावें म्हणून बाहेरुन लावण्याची राख व माती .
०बांधणें   कंबर बांधणें . दुष्ट वाढे जो तो उपाव आधीं , दनुज रोषें बोलोनि माज बांधी । - आमहा ६ .
मैथुनेच्छा ; उधान ; मस्ती ( गोमहिष्यादिकांस ऋतु प्राप्त झाला असतां उत्पन्न होणारी ). ( क्रि० येणें ; करणें ).
( कों . ) एक मासा ;
भांड्यास राख व माती फांसण्याची क्रिया .
( माण . ) माचा .
०सोडणें   कंबर सोडणें सुदेव नामा द्विज माज सोडी । - सारुह ५ . ३८ .
मद ; फुगा ; तोरा ; धुंदी ; गर्व ; अहंभाव .
अशी राख , माती फासलेली स्थिति , केलेला लेप . [ माजणें ]
०घर  न. घराचा मध्य भाग ; मध्य गृह ; पडशाळेच्या आंतील मुख्य खोली . [ सं . मध्यगृह ]
आधिक्य ; रेलचेल ; वृद्धि . तैसी रजतमें हारवी । जै सत्त्व माजु मिरवी । - ज्ञा १४ . १९९ .
०पट   - पु कमरपट्टा ( विशेषतः बायकांचा ) अचाट दळ अबळांचें कैसें प्रबळ माजलें । माजपट्यानें माज बांधलें । - अमृत २३ .
( औषधांतील ) मादक गुण . कैफ . कनकाचिया फळा । आंतु माज बाहेरी मौळा । , - ज्ञा १८ . ६५८ .
पट्टा   - पु कमरपट्टा ( विशेषतः बायकांचा ) अचाट दळ अबळांचें कैसें प्रबळ माजलें । माजपट्यानें माज बांधलें । - अमृत २३ .
खळबळ . तरि सिंधूचेनि माजे । जळचरा भय नुपजे । - ज्ञा १२ . १६५ .
हातमागाच्या सुतास पाजण करतेवेळीं ज्या बैलीस सूत ताणतात त्या बैलीची ताणण्याची दोरी .
गाण्यांतील एक राग . राग पहा . [ सं . मद ; प्रा . मज्ज ]
०करणें   पशूंना ठराविक मुदतीनें मैथुनेच्छा उत्पन्न होणें ; माजास येणें . माज मोडणें ( कर्त्याची षष्ठी ) माज शांत होणें ; पशूना ठराविक मुदतीनें मैथुनेच्छा होण्याचें बंद होणें .
( ल . ) खोड मोडणें ; गुरमी जिरणें .
०मोडणें   ( कर्माची षष्ठी ) खोड मोडणें ; माज जिरविणें . माजावर येणें फळणीस येणें . सामाशब्द -
०क वि.  मत्त ; धुंद झालेला ( मद्य , औषध , मान इ० कानीं ). [ सं . मादक ]
०गेला वि.  सहज शेफारणारा ; मगरुर ; मस्तवाल .
०मोड  पु. ( विशेषतः म्हैस , घोडी यांची ) मैथुनेच्छा शमविणें . [ माज + मोड ] माजरा , माजिरा वि .
मादक . विशिष्ट धान्यें व वनस्पतींसंबंधीं योजतात . उदा ०माजरा हरीक , माजरा गोंवल , माजरी खडसांबळी , इ० याच्या उलट . गोडा हरीक ; गोडा गोंवल इ० .
बेहोष ; उन्मत्त ; शेफारलेला ; मगरुर . जो सावध घे मदिरा । तो होउनि ठाके माजिरा । - ज्ञा १७ . ११३ .
चोखंदळ्या ; चवचाल . माजर्‍या हरीक - पु . हरकाची मादक काळ्या टरफलाची जात . याच्या उलट गोडाहरीक . माजरु , रू - वि . ( व . )
मस्तवाल .
माजलेला . माजरें - न . मादक असलेलें धान्य , वनस्पति खाल्ल्यानें उत्पन्न होणारा कैफ , धुंदी . - वि . कैफ उत्पन्न करणारें . माजवण - न .
उन्मत्तपण .
मादक पदार्थ . कां माजवण दीजे मर्कटा । - ज्ञा ३ . ९ .
अधिकता . चंचळपणाचें माजवण । घेतलें जेणें । - स्वादि १ . ५ . १८ .
०वणें   अक्रि . माजणें .
०विणें   सक्रि . उन्माद आणणें ; जास्त , अधिक करणें . माजिवटा पु .
उन्माद ; गुंगी . पातलिया मरणाचा माजिवटा । - ज्ञा ८ . २०८ .
मरण . माजिवडें - वि . मस्त .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP