Dictionaries | References

हाय दोस्त धुला

   
Script: Devanagari
See also:  हाय दोस दुल्ला , हाय दोस धुला , हाय दोस्त दुल्ला

हाय दोस्त धुला

   ( क्रि. घालणें, माजणें, उठणें, भांडणें करणें). मोहरमांत ताबुतांच्या व स्वार्‍यांच्या मिरवणुकींत वरील प्रकारचे उद्धार काढून लोक छाती पिटीत जात असतात अशा वेळीं सर्वत्र गोंधळ, गडबड सुरु असते. त्यावरुन गडबड
   गोंधळ
   अव्यवस्था. [ ‘ हाये दोस्त दूल्हाम्हणजे हायहाय, मित्रा नवरदेवा ! असा मूळ अर्थ. हसन आणि हुसेन यांच्या लग्नानंतर लवकरच करबलाच्या लढाईत त्यांना मृत्यु आला. तेव्हां त्यासाठीं शोक करीत वरील उदगार मुसलमान लोक ताबुताच्या वेळीं काढतात. डोले या त्यांच्या कबरींचीं प्रतीकें होत. पण आज मुसलमान ताबूत मिरवीत नेऊन गोंधळ, धिंगामस्ती मात्र करतात. यावरुन वाक्प्रचार पडला.]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP