Dictionaries | References

भोंवरा

   
Script: Devanagari
See also:  भोवरा

भोंवरा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A wheel or a rotatory or whirling thing in general. Ex. कुला- लाचा भोवराजैसा भवे गरगरां ॥ कर्मवेगाचा उभारा जवरीं ॥. भोवऱ्यांत सांपडणें To fall into some vortex or perplexity.

भोंवरा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A whirlpool. A whirligig. A ring of hair (on the body)
भोंवऱ्यांत सांपडणें   fall into some vortex or perplexity.

भोंवरा

  पु. ( गो .) नदीच्या लगत राहणारा एक पांढरा पक्षी . - सह्या पा ३०६ .
  पु. 
   पु
   लहान मुलाचें , दोरी गुंडाळून गरगर फिरविण्याचें लाकडाचें एक खेळणें .
   भुंगा ; भ्रमर . विसीफ भोवर गोचिड जाण । - दा ३ . ७ . ७ .
   मंडलाकार फिरणारें पाणी ; आवर्त .
   भुंग्याच्या आकाराचा स्त्रियांच्या डोक्यांतील एक दागिना .
   ( गो . ) कलावंतिणीचा कुंडलाकृति नाच .
   शरीरावरील केसांची मंडलाकार रचना .
   भोंवरीचें फळ .
   नारळीच्या कोंवळ्या पानास लागलेली कीड . [ सं . भ्रमर ]
   मातींत खळी करुन त्यांत राहणारा एक क्षुद्र कीटक .
   शेंडीच्या भोंवतीं शोभेसाठीं राखतात तें केशवलय ; घेरा ; संजाप .
   गाय , म्हैस इ० च्या अंगाला स्पर्श झाला असतां त्वचेवर उत्पन्न होतें तें वर्तुळाकार स्फुरण .
   ( क्व . ) गिरकी ; चक्कर ; फेरा ; वळसा . ( क्रि० देणें ; घेणें ).
   एक वनस्पति ; तेड ; पांढरें निशोत्तर .
   ( काव्य ) चक्र ; ( सामा . ) चक्राकार फिरणारी कोणतीहि वस्तु . कुलालाचा भोवराजैसा भवे गरगरा । [ सं . भ्रमर ; अप . भवेर ; हिं . पं . भौंरा ]
०करणें   गाय , म्हैस इ० स स्पर्श झाला असतां त्यानीं वर्तुळाकार स्फुरण करणें . भोवर्‍यांत सांपडणें लवकर नाहींशा न होणार्‍या संकटांत , अडचणींत गुंतणें . पायाला भोंवरा असणें , भोंवरा असणें सारखें फिरत राहणें . भोंवरकडी स्त्री . गुरांच्या दाव्याला असते तशी फिरती कडी . भोवरजाळी स्त्री . भोवर्‍याची दोरी . भोवरी , भोंवरी स्त्री .
   एक प्रकारचा वेल .
   रानसालंमिश्री
   पायांत कांटा मोडल्यामुळें तेथें जी वाटोळी गांठ उत्पन्न होते ती ; चकंदळ . कणेकडाचें टोंक रुखाच्या ज्या पोकळ भागावर टेंकतें तो भाग .
   मंडलाकार भ्रमण ; गिरकी ; प्रदक्षिणा ; वळसा ; फेरा ( नाचणारा , भोंवरा इ० चा ). ( क्रि० घेणें ; देणें ).
   घोड्यांतील व्यंग ( केंसांचें वलय किंवा चकंदळ ).
   ( अशिष्ट ) मोहरीचें बीं .
   झालर . तो विणला पाट सुतानें । मोत्यांची भोवरी । - वसा १५ .
   एक प्रकारचा दागिना ; बुगडी . पै आकारा नाम भोंवरीयेर सोनें तें सोनें । - ज्ञा १० . ९०२ .
   ( ना . ) एक लहान पाखरुं .
   बैलगाडीचें चाक .
   ( कों . ) भोंवार पहा .
   ( गो . ) टकळी ; चाती .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP