Dictionaries | References

धिंड

   
Script: Devanagari

धिंड     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
; the state of being placed upon an ass or a camel, with one's face towards the animal's tail, and of being thus led around the village. v काढ, भोंवड, मिरव, फिरव g. of o. Hence 2 Exposure gen., any openly insulted or ridiculed state. v काढ g. of o.

धिंड     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Public exposure (of an offender).

धिंड     

ना.  अप्रतिष्ठा , उपहास , बदनामी , बदलौकिक , मानहानी , लाजिरवाणी मिरवणूक ( जाहीरपणे केलेली ).

धिंड     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
noun  सार्वजनिकरीत्या गुन्हेगाराची अप्रतिष्ठा करण्याची क्रिया   Ex. भ्रष्ट अधिकार्‍याची लोकांनी धिंड काढली.

धिंड     

 स्त्री. १ एक शिक्षेचा प्रकार . सार्वजनिकरित्या गुन्हेगाराची केलेली अप्रतिष्ठा . ( त्याला पांच पाट काढून गाढवांवर बसवीत व शेपटीकडे तोंड करीत व वाजतगाजत गांवांतून मिरवीत नेत ). ( क्रि० काढणे ; भोंवडणे ; मिरवणे ; फिरविणे ). २ अशी धिंड काढलेला माणूस . ३ जाहीर अप्रतिष्ठा ; मानहानि ; उपहास . ( शिव्यागाळी , मारहाण इ० प्रकारे ). ४ ( तिरस्कारार्थी ) वाईट माणसाच्या येण्याजाण्याच्या वेळी म्हणतात . या दुष्टाची धिंड बाहेर निघेल तेव्हां मी घरांत येईन . धिंडका पहा . धिंडका - स्त्री . ( धिंड काढण्यालायक व्यक्ति ) नेहेमी मिरवूं पाहणारी व पुढेपुढे करणारी तिरस्करणीय व्यक्ति . तिकडे जाऊन आपली धिंडका तेथे बसू द्या . - कीचकवध .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP