|
उ.क्रि. १ आंतुन बाहेर ; वर , घेणें ; ओढून घेणें . ' दाढी धरून ह्या मेल्याला बाहेर ओढून काढल्याशिवाय हा ताळ्यावर यायचानाहीं .' - बाय . २ . ४ . २ ( ल .) वळविणे ; उठविणें ( अक्षरें , ओळी , आकृति ). ३ मागावर वस्त्र इत्यादि तयार करणें - विणणें . ४ नवीन शोध करणेंज , जुळविणें , पाडणें . ( तर्हा , मार्ग , रीत , दूम ), ५ मिळविणें ; जिळविणें ; उप्तन्ना करणेम . ' या शेतांतून वर्षास दोन खंडी धान्य काढतो .' ६ मिळविणें ; श्रमानें संपादन करणें . ७ घेणें , कर्ज काढणे , उसनवारी घेणे . ( पैसा उपटणे .) ८ वादविवादाचा विषय , भाषण सुरु करणें ; ओघास आणणें ; मुद्दा पुढें मांडणें ; उपस्थित करणें . ९ शोधणें ; उजेडांत आणणें ; छडा लावणें ; दाखविणें ( दोष गुणधर्म ). १० कंठणे ; सहन करणें ; सोसणें ; लोटणें ; घालविणें ( दुःख आजार , क्लेश , काळ ) ' मी धान्यावांचून दोन दिवस काढले .' ' एका धोतरावर थंडी काढली .' ' गुरुं काढितें भूत आणि पोर काढितें दुःख ' ११ ( कों ) शिकविणें ; बठणीस आणणें ; कामायोग्य तयार करणें ( पशु ). १२ शुश्रुषा करणें , चाकरी करणें ( पोराची , दुखणेकर्याची ). १३ हुडकणें ; पत्ता काढणें ( रस्ता , पाहिजे असलेली वस्तु ). ' पुढे वाट काढणारी मंडळी होती .' - विवि ८ . १ . १८ . १४ उपटणें ( जोंधळ्याचें पीक ) १५ ( घोडा , बैल इ . नीं दुःखामुळें ) चालतांना पाय वांकडा टाकणें . १६ उपसणें ( तरवार ). ' मी तर वार काढली .' १७ दूर करणें . ' संसार काढूनियां कांटी । ' - ज्ञा १३ . ८६६ . ( सं . कृष् -( कृष्ट )- कर्ष . प्रा . कठ्ठ , आर्मेनिजमजि . कस ; पो . जि . कृल ; बं . काड , सि . कढ ( णु ) हिं काढ ( ना .), गु काढ ( बुं )) ( वाप्र .) कज्जा काढणें - बळेंच भांडण सुरु करणें , वर्दळ वर येणें , आणणें काढतें घेणें - स्वतःला सोडवून घेणें . पाय मागें घेणें ( भांडण , झगडा , लढाई यांमधून ). ' कृतवर्म्मा बलिभद्र काढिलें । जुंझतजुंझतां । ' - शिशु ९७६ . काम काढणें - १ काम लांबविणें . २ ( व .) ठार मारणें , नाश करणें , कांडांत काढणें - श्यश्रु करणें ( विश्षत ; विधवा स्त्रीची ). घोडी काढणें - घोडीस घोडा लावणें ( संभोगासाठीं ) दाणा - पीक काढणें - धान्य , शेत पीक कापून जमा करने . दुखणें काढणें -( व . प .) ( आजार्याची ) शुश्रुषा करणें . स्वतःचे दुःख सहन करणें . दैवप्रारब्ध - नशीब - काढणें - उदयास येणें , दैव उघडणें , पैसा मिळविणे . ' दैवचि मूर्तिमंत । येईल देखा काढत । तुम्हांपाठी । ' - ज्ञा ३ . १०१ . पाऊस - आभाळ - काढणें - वार्यानें पाऊस आणणें ; ढग भरणें . रडें काढणें - रडुं लागले . शेत - बनजर - नवेंरान - काढणें - नवीन जमीन लागवडीस आणणें , नांगरणें .
|