|
उ.क्रि. १ ( केरसुणी इ० नीं ) केरकचरा काढून साफ करणें ; जागा निर्मळ करणें . २ हसडणें ; झटकणें ; झटक्यानें हलविणें ( ओलें वस्त्र , शेंडी इ० ); ( हात , पाय , डोकें इ . कांस ) झटका देणें . झाडितां आपला हात । तंव आंगासि असे जडित । - परमा१० . १९ . ३ लोटून देणें . त्यांतें उडोनि झाडी झाले ते चूर्ण जेविं नगपातें । - मोवन १२ . २९ . ४ काढून टाकणें ; नाहीसें करणें . लोक पारखुन सोडावे । राजकारणें अभिमान झाडावे । - दा ११ . ५ ( विस्तव इ० कांस ) पंख्यानें वारा घालणें ; झडपणें . ६ खरडपट्टी काढणें ; खडसावणें ; निर्भर्त्सना करणें . बाळूला आणि नंद्याला लक्ष्मीकाकूंनीं चांगलेंच झाडलें . - सुदे ५२ . ७ ( मागणाराचा , भिकार्याचा ) निषेध करणें ; मनाई करणें ; साफ नाकारणें ; बंदी करणें . अंतींच स्मरावें श्रीरामराम । ऐसा कितेका जडला भ्रम । असो गृहस्थानें भजनप्रेम पाहोनि मस्तक झाडिला । - दावि २०२ . ८ ९ सरकार , सावकार इ० कांची ) बाकी काढून टाकणें ; देणें बेबाक करणें . धन्याची बाकी हळु हळु झाडा । - भज १३४ . ९ ( अंगातील भूत , पिशाच इ० ) काढणें ; हाकलून लावणें . १० ( बंदूक इ० ) उडविणें ; गोळी मारणें . - अक्रि . ( बंदूक इ० कांनी उडतांना हात इ० अवयवास ) हिसडा , झटका देणें . [ सं . झाटन ; प्रा . झाडण ; हिं . झाडना ; जुका . झडिसु = टाकणें , फेंकणें ; झाडणें = केरसुणी ; फेकणें ] ०झटकणें उक्रि . केरसुणी इ० कानीं झाडून , फटके देऊन , धूळ उडवून साफ करणें , निर्मळ करणें . झाडझपट , झाडझटक - स्त्री . १ ( व्यापक ) धूळ , केर इ० काढण्याचा , झाडण्याचा , झटकण्याचा व्यापार ; झाडडूड ; सडासंमर्जन . २ ( ल . ) ( व्यापक . ) चोरीच्या म्हणून समजल्या जाणार्या लुबाडणें लुटणें इ० सर्व क्रिया . त्यानें आजपावेतों झाडझपट करून पोट भरलें . ३ लुटालूट ; धूळधाण ; दाणादाण . पेंढार्यांनीं त्या गांवांत जाऊन झाडझपट केली . [ झाडणें + झपाटणें ] झाडझूड - स्त्री . झाडझपट अर्थ १ पहा . माझी झाडझूड होईतों तूं पाणी घेऊन ये . [ झाडणें द्वि . ] झाडपट्टी - स्त्री . १ जमीनीचा सारा किंवा घरपट्टी याबद्दलची बाकी चुकती करण्याची अखेरची मागणी . २ ( उप . ) खरडपट्टी ; खडसावणी ; बोडंती . ( क्रि० करणें ). [ झाडणें + पट्टी = कर ] झाडपाखड - स्त्री . १ ( धान्य इ० ) सुपानें पाखडण्याची , झटकण्याची , साफ करण्याची क्रिया . २ ( ल . ) कवडीकवडीचा हिशोब देणें - घेणें . [ झाडणें + पाखडणें ] झाडपिड , झाडपीड - स्त्री . झाडझूड ; झाडलोट . झाडपीडी करूनि मानऊं संताला । - दावि ३५३ . [ झाडणें द्वि . ] झाडपिडया - वि . देऊळ , मंदिर इ० कांची झाडझूड , साफसूफ करणारा . [ झाडपिड ] झाडपोतें - न . कर्जफेडीचा शेवटचा हप्ता . [ झाडणें + पोतें ] झाडफूक - स्त्री . ( ना . ) अंगारा ; धुपारा ; मांत्रिकाकडून करावयाचा मंत्रोपचार . ( क्रि० करणें ). [ झाडणें + फुंकणें ] झाडफेड - स्त्री . ( राजा . ) झाडझूड ; झाडलोट . [ झाडणें + फेडणें ] झाडफेड - स्त्री . ( राजा . ) झाडझूड ; झाडलोट . [ झाडणें + फेडणें ] झाडबाकी - स्त्री . १ ( कर्ज , अन्नसामुग्री इ० कांची ) पूर्ण नि : शेषता ; बेबाक ; निरानिपटा . २ कर्जफेडीचा शेवटचा हप्ता . ( क्रि० करून टाकणें ; करणें ). [ झाडणें + बाकी ] झाडलोट - स्त्री . केर काढणें , सारवणें इ० ; झाडझूड . [ झाडणें + लोटणें ] झाडवण - स्त्रीन . झाडण्याची क्रिया . - पु . ( काव्य . ) १ झाडणारा . चोखामेळा म्हणे मी तुमचा । झाडवण साचा म्हणवितों । २ केरसुणी ; झाडू . [ झाडणें ; प्रा . झाडवण ] झाडसारव , झाडवणसारवण , झाडसारवण - स्त्री . ( समुच्चयानें ); ( घर इ० ) झाडणें व शेणानें सारवणें इ० क्रिया ; साफसुफी . झाडसारवण ... वगैरे ... करतांना त्यांचीं अंगें उकिरडयासारखीं होत असतील यांत काय नवल ! - नाकु ३ . ९ . [ झाडणें + सारवणें ] झाडून - क्रिवि . एकंदर सर्व ; यच्चयावत ; एकूणएक ; एकहि न वगळतां . यदुसचिव पौरमुख्य द्रुत आणविले सभेंत झाडूनी । - मोमौसल २ . २९ . - पया ७९ . [ झाडणें ]
|