|
क्रि.वि. पायांचें दणदण आपटणें , तोफांचा धडाका , जड धोंडयांचे आघात , कांडण इ० च्या मोठया व दण अशा आवाजासारखा आवाज होऊन . [ ध्व ] दणदणणें - अक्रि . १ दणदण आवाज होणें ; मोठया गर्जनेनें धडाडणें ( गोफा , बंदुका इ० ). २ अंगावर जाऊन क्रोधानें ओरडणें ; ताव झाडणें , जळफळणें . ३ दणदण पाय वाजणें ; हादरणें ( माडीवरुण जलद चालतांना माडी ); दुमदुमणें ; प्रतिध्वनि उत्पन्न होणें ( तोफा , वाद्यें इ० कांच्या धडाक्यानें घर , गुहा इ० मध्यें ). ४ एकाच्या तोंडून दुसर्याच्या तोंडी जाणें ; सर्वत्र पसरणें ( स्तुति , निंदा ). ५ ( फोडणी इ० चा ) घमघमात सुटणें ६ . गलबला होणें गलका होणें ( सैन्य , लोकांची गर्दी इ० चा ). ७ धडधड जळणें ( शेकोटी , टेंभा ); प्रकाशणें ; धगधगणें ( सूर्य , ऊन्ह ). दणदणाट - पु . १ दणदण असा मोठा व एकसारखा होणारा आवाज ; दणका ( समारंभ , वाद्यें इ० चा ). २ फोडणी इ० च्या वासाचा घमघमाट तळलेल्या पदार्थाचा उग्र वास ; घमघमाट ३ . माडीवरुण चालतांना अनेक पावलांचा होणारा आवाज . दणदणीत - वि १ थाटामाटाचें ; धामधुमीचें ; दणक्यानें केलेलें ( लग्न , समारंभ ). २ उग्र ; तीव्र ; सर्वत्र पसरलेल्या ( फोडणी वगैरेचा वास ). ३ धडधडा जळणारा . ४ ( दिव्या , टेंभा ). दणदणणे पहा . दणदण्या - वि . दणदणां चालणारा .
|