Dictionaries | References

झाडा

   
Script: Devanagari

झाडा     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
. 3 Discharging the bowels.

झाडा     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A close and narrow search. A general clearance (of accounts). Discharging the bowels.

झाडा     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
See : जुलाब, झडती

झाडा     

 पु. १ ( कायदा , सामानसुमान इ० कांची सरकारी नोकरानें केलेली ) झडती ; बारीक तपासणी . ( क्रि० घेणें . ) २ ( सामा . ) हिशेब चुकता करणें ; हिशेब , देणें - घेणें मिटविणें . ३ ( ल . ) पूर्णपणें , कांहीं लपवून न ठेवतां उघड करणें ; खरें स्वरूप प्रकट करणें ; झडती देणें . अहंतादि भावां आपुलियां । झाडा देऊनि आघवेयां । - ज्ञा १५ . २७९ . ४ जुलाब ; मलविसर्जन ; मलशुध्दि . ५ फन्ना ; निकाल ; फडशा ; निरास . त्याच दिसीं झाडा द्रव्याचाही जाला । - रामदासी २ . ९९ . ६ ( गो . खा . ) ( भूत , पिशाच्च , विषार इ० काढण्याकरितां मांत्रिकानें ) टाहाळयानें , केरसुणीनें केलेली झाडणी . ( क्रि० घालणें ). [ सं . झाटन ; प्रा . झाड ; हिं . झाडा ; गु . सिं . झाडो ] ( वाप्र . )
 पु. कांबळ्याचें एक पट्टे . दोन्हीं पट्टी एकत्र जोडून कांबळें होतें .
०करणें   १ कर्ज फेडणें . झाडा करून देऊं . - भाअ १८३५ . २७५ . २ नाश करणें ; निकाल करणें . ऐसा द्वादश बाणें झाडा केला । - जै ३० . ३७ . ३ शौच करणें ; परसाकडे जाणें .
०घेणें   बारकाईनें कसोशीनें तपास करणें . छप्परबंदांच्या तळाचा झाडा बारकाईनें घ्यावा . - गुजा ४६ .
०सुचणें   विस्तारपूर्वक सांगणें . श्रोते म्हणती न सुची झाडें । लग्न निवाडें लागोंद्या । - एरुस्व १५ . १५९ .
०होणें   संपणें . आतां बातमी हरकारे झाडा झाले , लवकरी आणीक पाठविणें . - पेद १० . ९१ . झाडयास जाणें - शौचास जाणें . सामाशब्द - झटका - पु . ( व्यापक ) १ सरकारी नाकें इ० कांवर केली जाणारी झडती , तपासणी इ० . २ शौचमुखमार्जन ; परसाकडणें , तोंडधुणें इ० [ झाडणें + झटकणें ]
०झडती  स्त्री. १ ( व्यापक . ) झाडाझटका अर्थ १ पहा . २ ( एखाद्याकडून ) कवडीकवडीचा हिशेब घेणें ; हिशेबाची कसून केलेली तपासणी , विचारणूक . ( क्रि० घेणें ). [ झाडा + झडती ]
०पत्र   पत्रक - न . मामलतदारानें ठेवावयाचें वसुलाच्या झाडयाचें मासिक पत्रक . निकालपत्र पहा . [ झाडा + पत्र = कागद ]
०पवाडा   पवापाडा - पु . १ कसून हिशेब मागणें ; कडक रीतीनें जाब विचारणें . २ अशा तर्‍हेनें दिलेला हिशेब , जाब , झडती ( सामान्यत : अनेकवचनीं प्रयोग ). ( क्रि० करणें ; देणें ; घेणें ; होणें ; येणें ). न सुटेचि बाकी नव्हें झाडापाडा । - तुगा १५४३ . ह्या कामाविषयीं कोठें झाडेपवाडे द्यावे लागतील काय कोण जाणें . [ झाडा + पवाडा = पाडा ]
०बाकी  स्त्री. ( कर्जाच्या ) बाकीचा निकाल , फडशा . नामदेवा म्हणती घ्यावा जन्म तुम्हीं । झाडाबाकी आम्ही करूं येथें । - रामदासी २ . १४३ . [ झाडा + बाकी ] झाडावा - पु . तपासणी ; शुध्दि . - शर . [ झाडा ]
०वारंट  न. ( कायदा ) जंगम माल शोधून काढून मॅजिस्ट्रेटकडे हजर करण्याबद्दल पोलीस अंमलदारास दिलेला हुकूम . ( इं . ) सर्चवॉरंट . [ म . झाडा + इं . वॉरंट = आज्ञा , परवाना ] झाडेकार - पु . ( गो . ) भूतबाधा घालविणारा , विष इ० उतरविणारा मांत्रिक . [ झाडा + करणें ] झाडेभवांडे - पुअव . ( व . ) १ अळंटळं ; हयगय ; दिरंगाई . आतां का झाडेभवांडे देता . २ हाल ; हालअपेष्टा ; भोग . आमच्या जिवाचे झाडेभवांडे आहेत . [ झाडा + भोंवांडा ]

झाडा     

झाडा करणें
कर्ज फेडणें
व्याजमुद्दल सुद्धां सर्व बाकी फेडणें. -भाअ १८३५.२७५.
नाश करणें
साफ करणें
सफ्फा उडविणें. ‘ऐसा द्वादशबाणे झाडा केला।’ जै ३०.३७.
शौचविधि करणें.

झाडा     

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali
See : अतिसार

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP