Dictionaries | References

कंवठ

   
Script: Devanagari

कंवठ     

 स्त्री. एक फळझाड . हें दमट प्रदेशांत होतें . झाड मोठें असून यांच्या फळास कंवठ म्हणतात . हें फळ वाटोळें असून यांच्यावरील कवच कठिण असतें . हिरव्या कवठाच्या मगजाचें सर आणि पिकलेल्याचा मुरंबा करतात . - वगु २ . ३० . कवठ हत्तीस फार आवडतें . पाल्याचा रस पित्तविकारावर उपयोगी आहे . झाडा पासून उत्तम गोंद निघतो . - कृषि ७३८ . - स्त्री . २ आणिक एक निराळें झाड ; याचें फळ कवठासारखेंच असतें . परंतु हें फळ कडु असतें म्हणुन खात नाहींत . याच्या बिया सुपारीएवध्या असतात व त्यांच तेल काढतात . तें खरजेवर औषधी आहे . हें झाड कोंकणांत होतें . - न . ( कोंबडींचें ) अंडें . ( सं . कपिथ्थ ; प्रा . कतित्थ ; कपिथ्थ - कविट्ठ - कवीठ - कवठ - रा . ग्रंथमाला हिं . कैथ ) - ठाचा तकू - पु . ( व .) कवठाची चटणी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP