Dictionaries | References उ उगाणा Script: Devanagari See also: उगाना Meaning Related Words उगाणा A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . Ex. संताचे अवगुण आणितां पैं मना ॥ केलासे उ0 सुकृताचा ॥ उगाणा महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. उपदेशपर भाषण ; उलगडा ; स्पष्टीकरण . नाना प्रमेयांचे उगाणे । काय श्रवणाचेनि आंगणें । बोलों लाहाती । - ज्ञा ७ . १९८ . [ उगवणें ] पु. कारकून ; हिशेबनीस ; उग्राणी करणारा . सरिसा उगाणा कोठी , चाटे बहुवे तैसे निगाले । - ऋ १३२ . [ सं . उदग्रहण ; प्रा . उग्गाहण = तगादा ; परत मागणें ] पु. दातव्य ; बयाणा ; विसार . आचाराचा उगाणा जी कवणासि दिधला . - भाए १०९ .गणना ; झाडा ; परीक्षा ; हिशोब . तेथ फलहेतूचा उगाणा । कवणु चाळी । - ज्ञा ७ . १२९ . नाणीं कांहीं मना । करुनी पापाचा उगाणा । - तुगा ५५७ .मुक्तता ; सोडवणूक . तुवावीण योगिया उगानावेढा कवण करील । - भाए १०५ .कर्जाऊ रकमेची फेड ; तोंडमिळवणी . बहिणी म्हणे मना हेतूंचा उगाणा । करुनि निर्वाणा पहातसे । - ब १२९ . कीं होय उगाणा - राला ३८ .चव ; रुचि ; अनुभव . रसवृत्तीसी उगाणे । घेऊनि जिव्हाग्र शहाणें । - अमृ ६ . ९० . मानावमाना समदृश्य उगाणा । - देप १६ .नाश ; नागवण . कोप येतांच जाणा । करी उगाणा तपाचा । - एभा ४ . ७८ . २३ . ६५९ .०काढणें ( बायकी ) कोणतेंहि धान्य कांडतांना अगर कुटतांना उखळांत खालीं राहिलेला जिन्नस वरचेवर खालचा वर व वरचा खालीं करणें . [ उद + ग्रहण ] उगाणा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 उगाणा काढणेंधान्य कांडतांना किंवा कुटतांना उखळात खाली न कांडता राहिलेला भाग वरखाली करणें. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP