|
पु. जरीच्या उभ्या काडया असलेलें अरुंद व लहान पागोटें ; मंदील . शिरीं बांधियेला चिरा । खोंवी मोतियाचा तुरा । - अमृत १२७ . मिरविसिल चिरा , शिरावर तुरा । - अमृत ५३ . [ सं . चीर = वस्त्र ] पु. कौमार्य ; ज्वानी ; कुमारीदशा . पु. १ वाफा . २ इमारती घडीव दगड ; खाणींतून सुरुग लावून उडविलेला दगडाचा , खडकाचा तुकडा , खपला ; दगड . शिळा . हरिनें कामा घातला चिरा । वित्तवरा मुकविलें । - तुगा १२३ . ३ बांधावरील हद्दीचा दगड . ( वाप्र . ) ०उखळणें उतरणें - कौमार्य नष्ट करणें ; वेश्येच्या अनुपभुक्त मुलीशीं प्रथम संभोग करणें . चिरा उखळा माझा राव नशा । घेऊन तुम्ही पलंगावर बसा । - पला ४ . २५ . ०उलथणें ( कोणी लठ्ठ मनुष्य ) एकाएकीं मरण पावणें . ०घालणें सक्रि . धोंडा घालणें ; नाहीसें करणें ; नष्ट करणें . तुका महणे घालूं जिवपणा चिरा । जाऊं त्या माहेरा निजाचिया । - तुगा २५५४ . ०पडणें १ धोंडा , दगड पडणें . २ ( ल . ) ( एखादी क्रिया ) बंद पडणे . शरीरा येणें सरे । किंबहुना येरझारे । चिरा पडे । - ज्ञा १२ . १३६ . ( वाप्र . ) - चिर्यांचा पाया - पु . १ दगडी पाया . २ ( ल . ) ( स्त्रीसंततीहून विरुध्दगुण , भिन्न अशी ) पुरुष संतति ( स्त्रीसंतति दुसर्या कुळांतच जाते आणि पुरुषसंतती मूळच्या कुळांत कायम राहते म्हणून पुरुषसंततीस चिर्यांचा पाया असें म्हणतात ). ३ ( ल . ) स्थैर्य , भक्कमपणा असलेलें राज्य , मालमत्ता , हुद्दा , उद्योग , मसलत इ० चिर्यावरची रेघ - स्त्री . १ दगडावरील लेख . २ ( ल . ) कधीं न पुसलें जाणारें लिखाण . ३ कधींही न मोडली जाणारी चाल . ४ इराणी लोकांचा एक कायदा .
|