Dictionaries | References

सांध

   { sāndha }
Script: Devanagari

सांध     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
: also, generally, to fall into oblivion or obscurity.

सांध     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 f  Joint. A cleft. A knuckle.

सांध     

 स्त्री. १ जोड ; सांधा ; सांध्याचा बिंदु , रेषा . २ भेग ; फट ; चीर ; तडा ; खांच ; खिंड . ३ पेरें ; ग्रंथि ; खीळ ; सांधा . ४ ( विणकाम ) हातमागांतील ताण्याचा तिडा , वेढा , कातरा ( क्रि० पडणें ). [ सं . संधि ] सांधीस बसणें , सांधींत पडणें - १ एकांतांत राहणें , पडणें ( पतिमरणानंतर बारामास विधवा इ० ). २ ( सामा . ) मागें पडणें ; लोकांच्या स्मरणांतून जाणें . सामाशब्द -
०क वि.  सांधकाम करणारा ( शिवण इ० तील ). सांधकाला कर्तन व सौचन या दोन्ही विषयांत गति पाहिजे . -( काकडे ) शिवणकाम .
०काम  न. सांधण्याचें , जुळविण्याचें , योग्य रीतीनें एकत्र करण्याचें काम . [ सांधणें + काम ]
०कोंद  स्त्री. कानाकोंपरा ; खांचखळगा ; बीळ ; फट ; ( सामा . ) सर्व आडबाजूच्या बारीकसारीक जागा . दिवा घेऊन म्यां सांधकोंद पाहिली . ( अव . उपयोग ).
०मोड  स्त्री. ( बांधकाम करतांना ) एका थरांतील दगड , किंवा विटा यांचे सांधे वरच्या थरांतील दगडविटांच्या सांध्याशीं सरळ रेषेंत न येतील असें करणें ( क्रि० करणें ). सांधमोड ३ इंचापेक्षां कमी नसावी . - मॅरट १५ .
०रुख  पु. एक झाड . अस्थिभंगावर औषधी . याचें लाकूड चिरलें तरी पुन्हां सांधलें जातें . अव्वल प्रकारच्या झाडाला लवंगी सांधरुख म्हणतात .
०वण  स्त्री. पायतणाची दुरुस्ती . - बदलापूर १८७ . सांधणी - स्त्री . १ ( विणकाम ) परमणीमुळें साफ झालेलीं सुतें एकत्र वळणें , जोडणें . २ मागावरील सुतांशीं नवीं सुतें जोडणें . ३ या कामीं वापरावयाचें हत्यार , साधन . सांधणी , सांधणूक - स्त्री . १ जोडणी ; जुळणी ; एकीकरण ( शिवणें , झाळणें , चिकटविणें इ० नें ). २ समेट ; एकी . सांधणें - उक्रि . जोडणें ; एकत्रित करणें ; संयुक्त करणें ( शिवणें , झाळणें , चिकटविणें , गांठणें इ० क्रियेनें ) - अक्रि . एक होणें ; जडणें ; जुगणें . सांधन - न . जोडणी ; सांधणूक . सांधप - न . ( राजा . ) सांधण्याचा व्यापार . सांधणें पहा . सांधा - पु . १ ग्रंथि ; पेरें ; संधि ; सांध . २ जोड ; संधिरेषा - बिंदु ; दरज . ३ जोडलेला तुकडा ; जो जोडला असतां वस्तु लांब होते किंवा वाढली जाते तो तुकडा . दोरीस दाहा हात सांधा लाविला तेव्हां पाणी काढावयाचे उपयोगी झाली . ४ मिलाफ ; एकी . आणि शुक्रशोणिताचा सांधा । मिळतां पांचांचा बांधा । - ज्ञा १३ . १०६ . ५ ( नाविक ) खाडींतील होडया लावण्याची सोईची जागा . ६ ( ढोरधंदा ) दोन तुकडे एकत्र जोडणें ; लाग . ( क्रि० शिवणें ). [ सं . संधि ]
०बसणें   जम बसणें ; जुटणें ; जमणें ; बेतशीर , सोईचें होणें . सांधासांध - स्त्री . १ अनेक वस्तू एकत्र येणें , जुळणें ; अनेक लोकांनीं एकत्र करणें , जोडणें . २ ( ल . ) समेट ; तडजोड . ३ दुरुस्ती ; सुरळीत चालणें . सांधित - वि . सांधलेलें ; जोडलेलें ( शिवण्यानें , झाळल्यानें इ० ). सांधी - स्त्री . १ जोड ; सांधा . २ चिरण ; फट ; भेट . सांध पहा . सांधीकोंदी - स्त्रीअव . जोड , सांधे , चिरा , फटी इ० संबंधीं व्यापकार्थी शब्द ; कानेकोपरे . सांधीकोंदीचा - वि . १ घरांत कोठें तरी आडबाजूस , कोपर्‍यांत बसणारा ; बिळांत राहणारा . २ क्षुद्र ; महत्त्व नसलेला ; अज्ञात ; गल्लीकुचींतील . सांधीकोनी , सांधीकोनीं - क्रिवि . कोनाकोपर्‍यांत ; आडसंधींत ; आडबाजूस . जो तो दडे सांधीकोनी । - र वि . १९ . १७० . सांधीचा , सांधीतला - वि . १ कोंपर्‍यांतला ; आडबाजूचा . २ अज्ञात ; क्षुद्र ; हलका . ३ कोंपर्‍यांत , आडबाजूस , गुप्त जागीं असण्यास योग्य , लायक . सांधीचा पदार्थ पहा . सांधीचा पदार्थ , सांधींतली वस्तु - स्त्री . १ टाकाऊ , निरुपयोगी वस्तु . २ ( ल ) विधवा . ३ गुप्त किंवा खाजगी ठिकाणींच फक्त उपयोगी पडणारी वस्तु . ४ वेगळी काढून ठेवलेली , मोठया , नैमित्तिक प्रसंगीं वापरण्यांत येणारी वस्तु ( अलंकार , पागोटें , शेला इ० ). सांधींतला व्यवहार - पु . कोंपर्‍यांत , आडबाजूस , गुप्त , स्थळीं चालणारा व्यवहार ; गुप्त , खाजगी व्यवहार . सांधींतली गोष्ट - स्त्री . अज्ञात , खाजगी , गुप्त व्यवहार , गोष्ट . म्ह० सांधींतली गोष्ट उजेडांत आणूं नये . सांधींतलें मडकें - न . ( निंदाव्यंजक ) विधवा . सांधीभानेचा - वि . सांधीकोंदीचा . [ सांध + भानवस ] सांधीव - वि . १ सांधलेलें ; जोडलेले ( विभाग , तुकडे ). २ तुकडे जोडून केलेली ; विभागांची बनलेली ( वस्तु , गोष्ट ). सांधोरी - स्त्री . १ मोठा किंवा अव्यवस्थित सांधा , चीर . २ गल्ली ; बोळ . सांधोरी कोनदोरी , सांधोरी कोन्दोरी - सांधीकोंदी पहा . सांधोसांधीं - क्रिवि . कोनाकोपर्‍यांतून . सांदोसांदीं पहा .

सांध     

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English
सांध  mfn. mfn. (fr.सं-धि) situated at the point of contact, [Megh.] Sch.

सांध     

सांध [sāndha] a.  a. Situated at the point of contact.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP