Dictionaries | References र रुळणे Script: Devanagari Meaning Related Words रुळणे मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 verb वापराने सुखकारक वा सोयीचा होणे Ex. टेबलासारखे काही इंग्रजी शब्द मराठीत रुळले रुळणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. लोळणे ; लोंबणे ; सैल किंवा मोकळेपणे हालणे . ऋद्धिसिद्धि पायधुळीमाजी रुळती सर्वदा । - मुआदि ३९ . १५ .( अलंकार , केस इ० ) शोभा देत हालणे ; झुलणे . कस्तुरी मळवळ चंदनाची उटी । रूळे माळ कंठी वैजयंती । - तुगा २ . भाळी कुरळीत केश रुळती ।शोभिवंत दिसणे ; शोभणे ; सुंदर दिसणे .( वस्त्र , दागिना इ० ) वापरण्याने चोळवटणे ; मळणे ; चुरगळणे . कांही रुळला दिसे चिरा मस्तकीचा श्रीरंगा । - होला १४ .मळणे ; झाकणे ; लोपणे . म्हणोनि ज्ञाने उजळे । कां अज्ञाने रुळे । - अमृ ४ . १७ .परिचय होणे ; सराव होणे ; वहिवाटणे ; एकाद्या कामांत किंवा नोकरीवर किंवा कांही मंडळीत अभ्यस्त किंवा परिचित होणे ; भीड मोडणे ; परिपाठ पडणे .एखाद्या विषयांत सफाई प्राप्त होऊन प्रगति होणे , होऊं लागणे .सक्रि . गुंडाळणे ; घडी घालणे ; चुरगाळणे . [ सं . रुट ] रुळलेला - वि . वहिवाटलेला ; परिचित ; वापराने सोयीचा किंवा सुखकारक झालेला ; ज्याच्या आंगवळणी एखादी गोष्ट पडली आहे असा ; एखाद्या शास्त्रांत , कामांत अगर कलेत वहिवाटलेला . रुळला मळला - वि . ( कपडा , दागिना इ० ) वापराने मळलेला ; वापरुन घाण झालेला . [ रुळलेला आणि मळलेला ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP