Dictionaries | References

ईश्वरी

   
Script: Devanagari

ईश्वरी

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

ईश्वरी

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : दैवी

ईश्वरी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 

ईश्वरी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  ईश्वरासंबंधीचा   Ex. त्याचा ईश्वरी शक्तीवर विश्वास आहे.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
 adjective  ईश्वराशी संबंधित   Ex. हा एक ईश्वरी चमत्कार आहे.
ONTOLOGY:
संबंधसूचक (Relational)विशेषण (Adjective)
Wordnet:
kanದೇವರ ಅನುಗ್ರಹದ
tamதெய்வீகத் தன்மையுள்ள
urdخدائی , الہی
   see : दैवी

ईश्वरी

  स्त्री. शक्ति ; दुर्गा ; लक्ष्मी , सरस्वती ; आदिमाया इ० देवता . - वि .
   ईश्वरासंबंधींचा .
   ( काव्य ) अतिशय भव्य , उदात्त , विपुल , अद्वितीय वगैरे अर्थीहि वापरतात . जसें :- ईश्वरी आनंद ; ईश्वरी नाश ; ईश्वरी बल , लाभ , सोहळा . अशा तर्‍हेचा याचा उपयोग शुध्द आणि अभिजात असून ईश्वर अर्थप्रमाणें तो सदोष नाहीं . [ सं . ]
०आनंद  पु. 
   परमेश्वरस्वरुपांत मानिलेला आनंद , सुख ; ईश्वराच्या ठिकाणीं वाटणारा आनंद .
   परमेश्वरापासून मिळणारें सुख .
   अत्यंत सुख ; दैवी सुख ; ब्रह्मानंद .
०उत्पात  पु. दैवी आपत्ति चमत्कार ; भयंकर स्वरुपाचा सृष्टचमत्कार ( वीज , धूमकेतु इ० )
०ऋणानुबंध  पु. परमेश्वरी , दैवी घटना ; ईश्वरी नेमानेम ; विधिघटना .
०करणी   कृत्य कर्तृत्व - स्त्री . न . परमेश्वरी लीला ; ईश्वरकृत गोष्टी . ईश्वरकृति पहा .
०कळा  स्त्री. ईश्वरीलीला ; परमेश्वरी कृत्य ; देवाचें कौशल्य , चातुर्य .
०कौतुक  न. ईश्वरी लीला ; ईश्वरानें घडवून आणलेला चमत्कार ; परमेश्वराची सृष्टिरचना , नियमनप्रारब्धाधीन गोष्टी यांना हा शब्द योजितात .
०गादी  स्त्री. न्यायासन ; धर्मासन .
०चेष्टा  स्त्री. परमेश्वरी कृत्य , खेळ ; ईश्वरी लीला , कला .
०जीव   प्राणी - पु .
   सृष्टींतील प्राणी .
   योगी ; तापसी .
०तंत्र   ईश्वरी घटना , योजना , कार्य , पध्दति ; सृष्टिव्यापार चालण्यासाठीं ईश्वरानें करुन ठेवलेली योजना .
०तेज  न. 
   सत्यशील माणसाचें तेज ; सात्त्विक माणसाच्या ठिकाणीं दिसून येणारी कांति , प्रभा .
   ( थट्टेनें ) तूप ; सोनें .
०देणें   देणगी - नस्त्री .
   ईश्वरानें दिलेली देणगी ; प्रसाद .
   जन्मजात गुण ; दैवी गोष्ट .
०नाश  पु. 
   महाप्रलय ; जगाच्या शेवटीं होणारा मोठा जलप्रलय .
   ( ल . ) महासंकट ; अरिष्ट ; अनर्थ ; दैवी आपत्ति .
०नियम   नेम नेमानेम - पु . दैवी घटना ; ब्रह्मलिखित ; सृष्टिनियम
०न्याय  पु. देवाच्या घरचा न्याय ; खरा , वास्तविक न्याय .
०पराक्रम  पु. दैवी सामर्थ्य , शक्ति .
०पसारा  पु. ईश्वरनिर्मित सृष्टि , जग ; जगदुत्पत्ति .
०पुरुष  पु. 
   साधु , वैराग्यशील , पुण्यपुरुष .
   भोळा , सरळ वृत्तीचा माणूस .
०प्रसाद  पु. ( प्र . ) ईश्वरप्रसाद ; देवाची कृपा .
०फळ  न. 
   देवानें दिलेली वस्तु ; देवाची देगणी .
   पुत्र .
०बल   बळ - न . अचाट शक्ति ; असाधारण बळ ; ईश्वरी पराक्रम ; अलौकिक , अमानुष सामर्थ्य .
०भावना  स्त्री. सत्प्रवृत्ति ; पुण्यशीलता ; साधुवृत्ति ; परमार्थनिष्ठा . महिमा पु . ईश्वराचें सामर्थ्य , श्रेष्ठत्व .
०माया   ईश्वरमाया पहा .
०मुद्रा  स्त्री. दैवी , तेजयुक्त , अत्यंत सतेज , तेज : पुंज अशी चर्या . ईश्वरी तेज पहा .
०यंत्र  न. 
   सर्व सृष्टी ; ईश्वरी तंत्र पहा .
   प्राणी , जीव , वनस्पति वगैरे ईश्वरनिर्मित वस्तुजात .
०लाभ  पु. अकल्पित , अत्यंत मोठी प्राप्ति .
०लाल   ईश्वराचा लाल पहा .
०लीला  स्त्री. ईश्वरी कृति , खेळ ; परमेश्वरी कृत्य .
०वाचा  स्त्री. देववाणी ; आकाशवाणी , साक्षात्कार वगैरे स्वरुपानें किंवा एखाद्या महात्म्याच्या मुखाच्या द्वारें प्रगट होणारी वाणी ; ज्ञान .
०संकल्प   संकेत - पु . विधिघटना ; नेमानेम ; प्रारब्ध .
०साक्षात्कार  पु. देवाचें प्रत्यक्ष दर्शन ; देवानें दाखविलेला चमत्कार ; दृष्टांत . ईश्वरसाक्षात्कार पहा .
०सूत्र   ईश्वरसूत्र पहा .
०सोहळा  पु. 
   अत्यंत थाटाचा , शोभायुक्त उत्सव ; आनंददायक प्रसंग ( समाराधना , खेळ , मिरवणूक वगैरे ).
   कोणत्याहि देवाप्रीत्यर्थ केलेला उत्सवसमारंभ .
   परमेश्वराच्या या सृष्टींतील घडामोडी , मनुष्याच्या आयुष्यांतील प्रकार वगैरेंच्या चिंतनानें वाटणारा आनंद .
०क्षोभ  पु. दैवी आपत्ति ; अरिष्ट .

ईश्वरी

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP