|
पु. यमनगरीतील विष्टा , रक्त , पू इ० घाण पदार्थांनी भरलेली , पापी लोकांना यातना भोगण्याची जागा . याचे ८४ प्रकार आहेत . पापी लोकांसाठी मृत्युनंतरचे स्थान , लोक . २ ( ल . ) विष्टा ; मल ; घाणीचा संचय ; ( सामा . ) विष्टा ; गू . ३ विष्णूने मारलेला एक राक्षस . ४ ( ख्रि . ) ईश्वरी सहवासाचा व तज्जन्य आध्यात्मिक अनुग्रहाचा अभाव . विरह तुझारे नरक भयंकर । भासे प्रलयानल पेटे । - उसं २९३ . ५ ( ख्रि . ) सैतान व दुरात्मे यांचे वसतिस्थान . तुझे संपूर्ण शरीर नरकांत टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा यांत तुझे बरे आहे . - मत्त ५ . २९ . [ सं . ] ( वाप्र . ) ०अंगावर - ( एखाद्याचे ) वाईट , दुष्कीर्तिकारक काम अंगावर घेणे . घेणे - ( एखाद्याचे ) वाईट , दुष्कीर्तिकारक काम अंगावर घेणे . ०उपसणे ( एखाद्याच्या ) घाणेरड्या गोष्टी , कृत्ये बाहेर काढणे ; ( एखाद्या ) घाणेरड्या गोष्टीची , प्रश्नाची शहानिशा , चर्चा करणे . ०तोंडात - तोंडांत नेहमी अपशब्द , ग्राम्य शब्द भरलेले असणे ; नेहमी ग्रामस्थ , अश्लील , शिविगाळीचे भाषण करणे . - काची वाट दाखविणे - ( एखाद्यास ) दुर्मार्गप्रवृत्त करणे ; वाईट उदाहरण घालून देणे . - काची सामुग्री - स्त्री . १ ( नरकवासास पात्र करणार्या ) दुष्कृत्यांचा समुदाय . २ ( रागाने ) संसार . ३ ( रागाने ) नकोशी , तिरस्करणीय , गोष्ट , काम . - काचे खापर - टोपले - न . १ विष्टेने भरलेले टोपले . २ खापर . ३ ( ल . ) कर्ज ; आंतबट्ट्याचा धंदा ; तिरस्करणीय , नकोशी गोष्ट , काम , लोकापवाद , अपकिर्ति इ० . ( क्रि० येणे ; फुटणे ; डोईवर येणे ; फुटणे ; घेणे ). - कांत जीभ घालणे - १ खोटे बोलणे . २ घाणेरड्या गोष्टींचे अभिवचन देणे . - कांत धोंडा टांकून शिंतोडा घेणे - १ घाणेरडी कृत्ये करण्यांत पुरुषार्थ , समाधान मानणे . २ वाइटाशी संबंध ठेवून त्याचा वाईट परिणाम भोगणे . - कांत पचणे - घाणेरड्या , किळसवाण्या जागेत , परिस्थितीत खितपत पडणे . - काने अंग भरणे - ( ल . ) कर्जाखाली बुडणे ; पराकाष्ठेचे कर्जबाजारी होणे . - कासारखा घाणेरा - वि . नरकाप्रमाणे तिरस्करणीय , नकोसा वाटणारा ( दारुड्या , तगादेदार , धरणेकरी , गळप्रह , नकोशी , गोष्ट इ० ). - कासारखे घाणणे - ( एखादी गोष्ट , व्यक्ति इ० ) नरकाप्रमाणे तिरस्करणीय वाटणे . - की धजा - ध्वजा लावणे - ज्यामुळे नरकांत श्रेष्ठपणा गाजेल अशी घाणेरडी कृत्ये करणे . लोकांच्या नरकांत बुडणे - लोकांचे पराकाष्ठेचे देणे होणे ; लोकांच्या कर्जात बुडणे . सामाशब्द - सांठविणे - तोंडांत नेहमी अपशब्द , ग्राम्य शब्द भरलेले असणे ; नेहमी ग्रामस्थ , अश्लील , शिविगाळीचे भाषण करणे . - काची वाट दाखविणे - ( एखाद्यास ) दुर्मार्गप्रवृत्त करणे ; वाईट उदाहरण घालून देणे . - काची सामुग्री - स्त्री . १ ( नरकवासास पात्र करणार्या ) दुष्कृत्यांचा समुदाय . २ ( रागाने ) संसार . ३ ( रागाने ) नकोशी , तिरस्करणीय , गोष्ट , काम . - काचे खापर - टोपले - न . १ विष्टेने भरलेले टोपले . २ खापर . ३ ( ल . ) कर्ज ; आंतबट्ट्याचा धंदा ; तिरस्करणीय , नकोशी गोष्ट , काम , लोकापवाद , अपकिर्ति इ० . ( क्रि० येणे ; फुटणे ; डोईवर येणे ; फुटणे ; घेणे ). - कांत जीभ घालणे - १ खोटे बोलणे . २ घाणेरड्या गोष्टींचे अभिवचन देणे . - कांत धोंडा टांकून शिंतोडा घेणे - १ घाणेरडी कृत्ये करण्यांत पुरुषार्थ , समाधान मानणे . २ वाइटाशी संबंध ठेवून त्याचा वाईट परिणाम भोगणे . - कांत पचणे - घाणेरड्या , किळसवाण्या जागेत , परिस्थितीत खितपत पडणे . - काने अंग भरणे - ( ल . ) कर्जाखाली बुडणे ; पराकाष्ठेचे कर्जबाजारी होणे . - कासारखा घाणेरा - वि . नरकाप्रमाणे तिरस्करणीय , नकोसा वाटणारा ( दारुड्या , तगादेदार , धरणेकरी , गळप्रह , नकोशी , गोष्ट इ० ). - कासारखे घाणणे - ( एखादी गोष्ट , व्यक्ति इ० ) नरकाप्रमाणे तिरस्करणीय वाटणे . - की धजा - ध्वजा लावणे - ज्यामुळे नरकांत श्रेष्ठपणा गाजेल अशी घाणेरडी कृत्ये करणे . लोकांच्या नरकांत बुडणे - लोकांचे पराकाष्ठेचे देणे होणे ; लोकांच्या कर्जात बुडणे . सामाशब्द - ०कुंड न. १ पापी मनुष्य मरणोत्तर ज्यांत खितपत पडतो असे नरकाचे कुंड . अशी ८६ . कुंडे आहेत . २ ( ल . तिरस्कारार्थी ) स्त्रीचा गर्भाशय . नऊ मासपर्यंत प्राण्यास नरककुंडात वास घडतो . [ सं . नरक + कुंड ] ०केंस पुअव . ( मुलास ) उपजत असलेले , गर्भावस्थेत आलेले , जन्मल्यापासूनच असलेले केंस . [ नरक + केस ] ०चतुर्दशी स्त्री. विष्णूने नरकासुराचा वध केला तो आश्विन वद्य चतुर्दशीचा दिवस . या दिवशी पहाटेस अभ्यंगस्नान करुन यमतर्पण करावयाचे असते . [ नरक = नरकासूर + चतुर्दशी ] ०पाल पाळ - पु . यम . स्तुत होय स्वःपाळा केव्हां जी जी म्हणे नरकपाळा । - मोसभा ६ . ९१ . [ नरक + सं . पाल = रक्षण करणे ] ०वणी न. घाणेरडे व दुर्गंधयुक्त पाणी . [ नरक + पाणी ] ०वास पु. १ नरकांत राहणे . २ ( ल . ) गर्भवास . ३ ( एखाद्या ) घाणेरड्या किंवा आपत्ति भोगाव्या लागणार्या जागेत राहणे . ४ अधर्मस्थल . [ नरक + वास = राहणे ] नरकाड , नरकाडी , नरकड स्त्री . घाणीची दुर्गंधयुक्त जागा ; गुखाडी . सोंगाच्या नरकाडी । तुका बोडोनिया सोडी । - तुगा २८१९ . [ नरक ]
|