Dictionaries | References
अं

अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार

   
Script: Devanagari

अंधळ्या मनीं आयतवार (सोमवार) बहिरा (किंवा पांगळा) म्हणतो माझी बायको गर्भार     

कांहीं ठिकाणीं अंधळ्यांना ठराविक वारीं भिक्षा घालण्याची पद्धत आहे. अंधळ्या मनुष्यास दिवस रात्र बरोबर समजत नसल्यामुळें व पाहण्याचें साधन नसल्यामुळें नेहमींच वाराची निश्चित आठवण राहणें शक्य नसतें
पण त्यास भिक्षा मिळणार्‍या वाराची मात्र आठवण वरचेवर येते व भलत्याच वारीं तोच वार असल्याचा भास होतो. तसेंच पांगळ्या मनुष्याला मुलाची कितीहि हौस असली तरी त्याची बायको गरोदर राहणें कठिणच
त्याला उत्कट इच्छा असल्यामुळें तसा त्याला नेहमीं भास होत राहतो. आपल्या मनांत जी उत्कट इच्छा असते तशीच वस्तुस्थिति आहे असा भास मनुष्यास होणें स्वाभाविक आहे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP