मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|वामन पंडित| चित्सुधा वामन पंडित अनुभूतिलेश भागवत रामायण ब्रम्हस्तुति द्वारकाविजय श्रीहरिगीता कर्मतत्व वामनपंडित कृत स्फुट काव्यें नाम सुधा साम्राज्यवामनटीका वेणुसुधा राजयोग मुकुंदविलास ध्यानमाळा प्रियसुधा तत्वमाळा शुकाष्टक स्फूटश्लोक गीतार्णव चरमगुरुमंजरी. वामनचरित्र विश्वास वध दंपत्य चरित्र भरत भाव रुक्मिणी पत्रिका सीता स्वयंवर रामजन्म अहिल्योद्धार लोपामुद्रा संवाद यज्ञपत्न्याख्यान कंसवध रुक्मिणी विलास भामाविलास चित्सुधा गजेंद्र मोक्ष वामन पंडित - चित्सुधा कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख. Tags : poetvaman panditकवीवामन पंडित चित्सुधा Translation - भाषांतर विनामृत्तिका कुंभ जेव्हां दिसेना विना मृत्तिका कुंभ कांहीं असेना दिसेना असी ज्याविणें मृत्तिकाही नसे मृत्तिकाही तयावीण कांहीं ॥१॥ घटाकार ज्या मृत्तिकेनेचि भासे असी मृत्तिका ज्यास्वरुपीं उभासे न कोण्ही तया स्वप्रकाशा प्रकाशी म्हणूनि श्रुती बोलती सत्य त्यासी ॥२॥ घटीं एक माती तसें सर्व पाहे दिसेना जयावीण तें तेंचि आहे असें तें तुझें तूंचि होऊनि पाहें धरी अंतरीं श्रीगुरुची कृपा हे ॥३॥ अलंकार सृष्टीमधें काय आहे सुवर्णाविणें हें विचारुनि पाहें मधें तेंचि जें जें जया आदि अंतीं असें विश्व हें देखिलें ब्रह्म संतीं ॥४॥ जगीं ब्रह्म दीसे तरीं आकृतीचा नव्हे नाश जों काळ आहे स्थितीचा करें निर्मिला तो करें नाशिजेतो अलंकार सोने जर्हीं देखिजेतो ॥५॥ जिये दृष्टिनें रज्जुचा सर्प केला तिनें दोर देखूनि तो नाशियेला करें निर्मिलें तें करें भग्न व्हावें तसें काळ कर्तृत्व काळेंचि जावें ॥६॥ मनें निर्मिलें तें करें तोडवेना करें निर्मिलें तें मनें मोडवेना न हें दृश्य मोडे विना काळ शक्ती विदे हें जर्हीं पावले - जीत - मुक्ती ॥७॥ प्रपंचें प्रपंचीं सुखें कां असेना स्वरुपांत तो आठवीतां दिसेना दिसे पंचभेदें जयां इंद्रियांसी प्रपंचींच पाहें निराळा तयासी ॥८॥ पहातांचि का चोपनेत्र - प्रसंगें निळीं दीसती गौरवर्ण प्रसंगे तसें आपण ब्रह्म सर्वत्र आहे मनें इंद्रियें घेउनी विश्व पाहें ॥९॥ निळीमा दिसे जेविं काचोप नेत्रीं दिसे पाहतां देह गोरा स्वनेत्रीं असें इंद्रियांतें दिसे विश्व नाना स्वरुपांत तों भेद दृष्टी दिसेना ॥१०॥ मना इंद्रियां इंद्रियार्थासि एक प्रकाशीच तें सत्य मिथ्या अनेक अनेकां घटीं सत्य ते एक माती असें ब्रह्म सर्वत्र योगी पहाती ॥११॥ घटीं भूषणीं आणि वस्त्रांत वस्तु दिसेना विना मृत्तिका हेम तंतु विना वस्तु जी दीसता हे तिरुपें नसे सत्य शिंपीवरी जेविं रुपें ॥१२॥ घटादीक कार्यें करीताति नाना तरी सत्य त्यांतें कधीं बोलवेना असीं देह सर्वत्र कर्में करीती तरी सत्य मिथ्या तयांतें पहाती ॥१३॥ क्रिया शक्तिनें वर्तती हीं शरीरें जसीं अंतरिक्षांत पर्णें समीरें करी बाहुलें नृत्य सूत्रें करुनी तया चाळितो सूत्रधारी धरुनी ॥१४॥ अयस्कांत - पाषाण - सान्निध्य मात्रें फिरे लोह हें देखती लोक नेत्रें क्रियाशून्य चैतन्य तत्संनिधानें शरीरीं जडे कर्म शक्ति प्रधानें ॥१५॥ अशा ज्ञानशक्ति स्वयें ज्ञानहीना स्वयें ज्ञान जें वृत्ति त्याला असेना जशा अग्निच्या ज्योतिनें चंद्र ज्योती प्रकाशात्मिका येरिती ज्ञान शक्ती ॥१६॥ जशा द्रव्य भेदें दिसोनीचि आल्या प्रभा अग्निच्या लोचनीं वेगळाल्या तसें आत्म चैतन्य चिच्छक्ति - भेदें दिसे भिन्न बुद्धीस माया - विनोदें ॥१७॥ प्रकाश स्वयें दूसर्यातें प्रकाशी सबात्द्यांतरीं बोलिजे सत्य त्यासी तयामाजि जें दूसरें दीसताहे तयावीण मिथ्याच होऊनि राहे ॥१८॥ प्रकाशी जर्ही सूर्य तो एकदेशी खरें हेम बात्द्यांतरीं भूषणासी तसें सूर्य तेजासही जें प्रकाशी सबात्द्यांतरी बोलिजे सत्य त्यासी ॥१९॥ पटाच्या सबात्द्यांतरीं तंतु जैसा चिदात्मा जगीं एक सर्वत्र तैसा मृषा स्थावरें जंगमें तोचि वस्तु पटाकार मिथ्या खरा त्यांत तंतु ॥२०॥ तसा तंतु चैतन्य तूं शिष्य राया पटाकार हें सर्व तूझीच माया असत्यांत सत्ता तुझी एक आहे असी बुद्धि आलिंगुनी तसी पाहें ॥२१॥ स्वयें निर्मिली हे असे सर्व सृष्टी जसें स्वप्न पाहे बरें सूक्ष्म - दृष्टी मनें स्वप्निंचे देह निर्माण झालें स्वयें जीव होऊनि तें वर्तवीलें ॥२२॥ मना आपणा वांचुनी काय तेथें निजोनी स्वयें निर्मिसी विश्व जेथें मनें जागरीं विश्व जें कल्पियेंलें खरें सांग कोण्या जिवें वर्त्तवीलें ॥२३॥ मनें जागरीं विश्व जें कल्पियेलें असें ईश्वरें विश्व निर्माण केलें तुही होय जागा मनीं कल्पिलें हें अनंत स्वरुपामध्यें विश्व पाहें ॥२४॥ नसे भिन्न आत्मा तुझा ईश्वराचा असें बोलती सर्वही वेदवाचा उपाधी सही पाहतां द्वैत नाहीं निजेलीच ते ऊठते बुद्धि पाहीं ॥२५॥ जसी झोंप बुद्धीसि तैसी अविद्या तसी जागृती तेच बुद्धी सुविद्या जसा एक आत्मा तसी एक माया नसे द्वैत पाहें बरें शिष्यराया ॥२६॥ उपाधि स्वयें जागतो चित्स्वरुपीं नसे भिन्न तो राम - कृष्णादिरुपीं स्वयें शुद्ध तो भेद तेथें न दीसे अशुद्धांत शद्धीविणें भेद भासे ॥२७॥ जसें एक नाना - नगीं शुद्ध सोनें पुढीं घालितां हीण तें त्यासमानें स्वयें शुद्ध सर्वेश्वराच्या उपाधी तशा ज्ञानियांच्याहि सर्वात्म बुद्धी ॥२८॥ स्वयें शुद्ध तो ब्राह्मण श्रेष्ठ जैसा सदा शुद्ध सर्वेश्वरोपाधि तैसा करी शुद्ध विप्रेंद्र विप्रा अशुद्धा असा सोडवी श्रीहरी नित्य बद्धा ॥२९॥ सदा जागतां ईश्वराचे उपाधीं सदा स्वप्न हें देखते देह बुद्धी तिये जागृतीनेंचि झालासि जागा स्वयें निर्मिलें हें न पाहेसि कां गा ॥३०॥ घडे भ्रंशही स्वप्नकाळीं मतीचा तर्ही आपुला देह हा जागृतीचा जरी पावल्या जीव बुद्धी अविद्या तर्ही ते तयाचीच कीं शुद्ध विद्या ॥३१॥ तुझें स्वप्न जाऊनि झालासि जागा न सांभाळिसी आझुनी कां स्वयोगा जगीं स्वप्न हें जागरीं वर्त्तवावें सदां नित्य तूर्येत जागें असावें ॥३२॥ जगीं बुद्धि हे पूर्वसंस्कार योगें यथापूर्व पाहे मनावृत्तिवेगें विवेकें तिला सर्वदा आवरावें जसें स्वप्न या जागृतीतें पहावें ॥३३॥ स्वयें स्वप्निचे सर्वही देह केले तर्ही आपणा वेगळे मानियेले तयाचे सवें जीव होऊनि पाहीं अहो मानितो आपणा एक देही ॥३४॥ असे दृश्य हें सर्व माझीच माया असे विश्व हें सर्व माझीच काया समस्तांत आत्मा स्वयें नांदता हे असें विश्व हें नित्य तूर्येत पाहें ॥३५॥ स्वयें ब्रह्म मी तेध तो धर्म नाहीं दिसेना विना विश्व हें बुद्धि कांहीं तयामाजि हे पावते बुद्धि जेथें प्रकाशूनि साक्षी तिचा मीचि तेथें ॥३६॥ स्वरुपीं तया बुद्धि सर्वत्र धांवे अनंतामधें अंत त्याचा न पावे तदाकार होऊनि त्यामाजि राहे जगीं वर्त्ततांही दुजें तें न पाहे ॥३७॥ समाधी मधें जाण ते शुद्ध तूर्या जसी पाहतां दृष्टि एकाच सूर्या न ते बुद्धि जागी न तेव्हां निजेली न तेव्हां सुषुप्तींतह्यी लीन झाली ॥३८॥ विना कल्पना जागृती स्वप्न मोडी स्फुरे आत्मता ते सुषुप्तीस सोडी अवस्था त्रयातीत ते शुद्ध तूर्या प्रपंच स्फूरे मिश्र तें शिष्यवर्या ॥३९॥ नको तूं भिऊं देखतांही प्रपंचा मृषा स्वप्न हें यास तों ठाव कैंचा तुझी जागृतीं जोंवरी दृष्टि धांवे असें स्वप्न तें जेथ तेथें नपावे ॥४०॥ मनीं देखिलें विश्व तें आठवीसी मनी आड दृष्टीस तेंही पहासी दिसे दृष्टिही ते तदन्यत्र जातां घडे स्वप्न तेंहीं मनीं आठवीतां ॥४१॥ असा चित्सुधाग्रंथ हा दीप हातीं धरुनी प्रपंचासही जे पहाती दिसे शुद्ध जें ब्रह्म तेंही प्रपंचीं नगीं शुद्ध सोनें दिसे वस्तु कैंची ॥४२॥ स्वयें चित्सुधाग्रंथ केला मुकुंदें मुखें वामनाच्या निजानंदकंदें तदात्मत्वपावोनिही दास्वभावें तया अर्पिला चित्सुधाग्रंथ नावें ॥४३॥ N/A References : N/A Last Updated : July 04, 2009 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP