वामन पंडित - चरमगुरुमंजरी.

कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.

चरम - गुरु मुकुंद श्रीपती श्रीहरी तो
चरमपण - जडत्वें भ्रांति जेव्हां हरीतो
चरम - परम - बोधें जेविं आत्मत्व दावी
चरमतनुमुखें ते रीति वाटे वदायी ॥१॥
जडीं ब्रम्हाऽद्वैतप्रद गुरु म्हणावा चरम तो
अपूर्णाचा शिष्य स्थिर - चर - जडत्वींच रमतो
जडें नाना पाहे श्रुति म्हणति तों तों मरतसे
नजातां पूर्णातें शरण मरती पामरतसे ॥२॥
नानात्व अज्ञ अवघेचि सदा पहाती
त्यांला असेचि यम दंड धरुनि हातीं
हे गोष्टि तों प्रगट जाणति लोक सारे
ठावेंचि तें कथिल वेदहि तो कसा रे ॥३॥
म्हणोनी हा अर्थ श्रुति कथिल हे गोष्टि नघडे
वदे आत्मज्ञानी विषय म्हणतां तत्व नुघडे
कळे आत्मा तोचि स्थिरचरजगीं तों नगवसे
जडें पाहे नाना तरि मरण - वत्क्रांतचि बसे ॥४॥
जयातें आद्यंतीं इतरपण त्यासीं नगवसे
सुवर्णा स्वर्णत्वें स्फुरतचि मधीं हेम गवसे
जगाचे आद्यंतीं जग नग तयावीण नकळे
गुरु तो जो दावी उकलुनि असा पावळ - कळे ॥५॥
न होतें हें काहीं गुणमय तई ब्रम्हचि असें
तथापासूनी हें जग म्हणति वेदागम असे
सुवर्णापासूनी उपजत तदैक्यें नग वसे
पहातां यारीती अवसरचि भेदा न गवसे ॥६॥
सुवर्णापासूनी उपजति अलंकार जितुके
सुवर्णत्वें लोकीं मिरवनि न संदेह तितुके
जग ब्रम्होत्पन्न श्रुति म्हणतिं कीं भेद नघडे
सुवर्णा मातीचे श्रुति वदति कीं दृष्टांत  उघडे
उपादानीं ब्रम्हीं श्रुति म्हणति कीं भेद नघडे
सुवर्णा मातीचे श्रुति वदति कीं भेद उघडे
उपादानें कार्ये दिसति म्हणतां विश्वरचना
पहावी ब्रम्हत्वें तरि सकळता वेदवचना ॥८॥
सुवर्णावांचूनी दिसति न अलंकार जितुके
स बात्द्यत्वें स्वर्ण स्फुरति नग सोनेंचि तितुकें
श्रुति - प्रोक्त - न्यायें श्रुतिच अवघें ब्रम्ह म्हणती
असें दावी त्याची करिती गुरुवर्यात गणती ॥९॥
उपादान मातीच जैसी घटातें उपादान तंतूच जैसा पटातें
विनाब्रम्ह येना जग प्रत्ययातें उपादान तें नेंमिलें सत्य यतिं ॥१०॥
नगाच्या सबात्द्यांतरीं भाव दावी नगीं ते उपादान - सत्ता वदावी
सबात्द्यांतरी हेम जैसे नगानें सबात्द्यांतरीं ब्रम्ह तैसें जगातें ॥११॥
स्फुरे ज्याणें आणी स्फुरणचि जयावीण नघडे
असे अंतर्बात्द्य प्रगट दिसतो तत्व उघडें
जडीं आत्मा ऐसा परि विरळ ऐसें अनुभवी
जड द्रष्टा मात्र स्फुट वदति भेदज्ञहि भवी ॥१२॥
दसोडी जे देखे तिस न वळखे वाळक पटीं
कळोनीहि स्वात्मा अकळ नकळे विश्वकपटी
दसोडी पासोडी रचुन उरली प्रौढ सम जे
जडी आत्मा ऐसा परि विरळ सर्वज्ञ समजे ॥१३॥
जडें - तत्वें देहीं गुरु निरसतां तें उरतसे
जडीं त्या चैतन्वाविण जग न कांहीं स्फुरतसे
नपावे या बोघेंकरुनिहि तिचे पावनकळे
जडाऽळंकारीं जों निजकनक तें व्याप्त नकळे ॥१४॥
शरीरीं या एक जड निरसतां जें उरतसे
स्व - चित्त - सिंधू तोचि स्थिरचरतरंगीं स्फुरतसे
चिदब्धीमध्यें त्या स्व - तनुसह भूतें गबसती
गुरु जो तो शिष्या करि अनुभवें विश्ववसती ॥१५॥
चिदात्मत्वें दाबी गुरुवर जडें सर्व शरणा
गुरुत्वाची सीमा हरि करितसे त्याच चरणा
पहासी तूं पार्था स्थिरचर चिदब्धींच लहरी
असें ज्ञान ज्ञानी वदतिल म्हणे आपण हरी ॥१६॥
उदंड क्ष्मालोकीं जड अजड तत्वें निवडिती
शरीरात्म - भ्रांती श्रुति अनुभवेंही दवडिती
परंतु स्वात्मत्वीं सकळ जग दावी स्वशरणा
गुरुत्वाची सीमा हरि करितसे त्याच चरणा ॥१७॥
दिसे एक सर्वत्र आत्माच सारा
दिसे त्यांत तेव्हां जडाचा पसारा
मृषा हीं जडें चित्समुद्रीं तरंगीं
दिसों लागती तेधवां अंतरंगीं ॥१८॥
भावें अशा हरि म्हणे जड भाग सारा
तूं आत्मयांत अवलोकिसि हा पसारा
कीं आत्मभाव कळतां तुज अंतरंगीं
चित्सिंधु देखसिल तोचि जडातरंगी ॥१९॥
आत्मयांत म्हणती जरि भूतें
तीं खरीं गमति काय विभूतें
चित्समुद्र - लहरीच कळाया
सूचवी स्ववचनांत कळा या ॥२०॥
गणावीं जरी हीं खरीं सर्व भूतें
तरी भिन्नता व्यापका ये विभूतें
असत्या जगीं ब्रम्ह जो भिन्न मानी
खरा मूढ तो ब्रम्हशब्दाभिमानी ॥२१॥
सत्याश्रयाविण विवर्त नसे असत्य
जें आंत बात्द्य उघडें निज एक सत्य
सत्या मृषासि जरि भेद वदे असाधू
मिथ्या नगासि कनकासिहि भेद साधू ॥२२॥
अधिष्ठान बात्द्यांतरीं जें असावें
विवर्ते तयाच्या प्रकाशा दिसावें
गुरुतें जडीं ब्रम्ह ऐसें पुसावें
न दाऊं शके त्या गुरुसी रुसावें ॥२३॥
ब्रम्ह सर्व - खलु निश्वित्त साच स्पष्ट हा श्रुतिमुखार्थ असाच
वामनें गुरुमुखें कळला हो सर्वदा अनुभवें फळ लाहो ॥२४॥
जरी सर्व ब्रम्ह श्रुतिविहित हें केवि घडतें
जडत्वीं चैतन्य स्थिरचर विकारीं बिघडतें
असे सर्वामध्यें म्हणुनि म्हणती सर्वहि असे
श्रुतीचे स्पष्टार्थ त्यजुनि कथिती कल्पक असें ॥२५॥
सरा ब्रम्ह असे न सर्वहि असे ऐसें घडे जेधवां
सर्वा व्योम असे न सर्वहि असे ऐसें घडे तेधवां
एवं व्योमचि सर्व तो नर म्हणे जो भ्रांतिफांसां पडे
प्रामाण्य श्रुति मस्तकास वदतां ऐसें कसें सांपडे ॥२६॥
उत्पत्ति हेमींच जशी नगातें
प्रवेशही येचरिती जगातें
ब्रम्हींच दोन्हीं घडतां प्रकार
ब्रम्ह स्वयें सर्वहि निर्विकार ॥२७॥
ब्रम्हीं प्रपंच - लय - उद्भव वेद वर्णी
दृष्टांत सूचवुनि येरिति मृत्सुवर्णी
होऊनि शांत करितीच उपासनाही
ऐसें वदे श्रुति विकल्प ययास नाहीं ॥२८॥
सर्वी ब्रम्ह असो समस्त न असो तें ब्रम्ह कैसे वदा
कीं साचें अथवा असत्य म्हणतां सर्वीच या सर्वदा
त्याचे सर्व म्हणेल त्यास सहसा अद्वैत तें अंतरे
तें मिथ्या म्हणतांच साधत असे सर्वैक्य - सिद्धांत रे ॥२९॥
खरें नीर नाना असत्यां तरंगीं
असत्या नगीं हेम बात्द्यांतरंगीं
विना व्यापक व्याप्य आकार सारे
न कांहीं नव्हे सर्व आत्मा कसा रे ॥३०॥
मुखें व्याप्य मिथ्या म्हणे बोध मानी
असत्यांत त्या व्यापक ब्रम्ह मानी
निषेधी पुन्हा ब्रम्ह सर्वत्र वाणी
नसे मूर्खतेची तयामाजि वाणी ॥३१॥
सर्व ब्रम्हपणा न मान्य करिती अद्वैत तें बोलती
ब्रम्ह व्यापक सत्य कारण असें वर्णूनेही डोलती
विश्वव्याप्य असत्य कार्य म्हणती इत्यादिकें भूषणें
सर्व ब्रम्ह न मानितां सकळ तीं होती तयां दूषणें ॥३२॥
सत्या व्यापक कारणास अनृता व्याप्यास कार्यास जी
बोला एकचि युक्ति योजुनि अशी कीं द्वैत दोघां सजी
नीर क्षीर खरींच दोनिहि जग दयोमोपमा ही खरी
सर्व ब्रम्ह न मानितां जग मृषा बोले वृथा वैखरी ॥३३॥
आतां रज्जु विवर्त सर्प लटिक्या व्योमेंचि तो व्यापिला
आम्ही कोरुनि युक्ति काढुनि जरी तो पक्षही स्थापिला
कार्य व्याप्य नव्हे न कारण तथा व्यापूनि कार्या जसें
सर्व ब्रम्हपणास सर्व गवसे दृष्टांत वेदीं असे ॥३४॥
रज्जु व्यापक सत्य कारण असे व्याथ्या भुजंगा कृती
त्यातें कार्य मृषाचि कीं जड असें ज्ञानी पहाती कृतीं
सोनें व्यापक सत्य कारण असे व्याप्या नगांभीतरी
तें मिथ्या नगकार्य चिज्जड असें कांहो न नाना तरी ॥३५॥
पाणी व्यापक सत्य कारण असे व्याप्या तरंगाकृती
मिथ्या आणिक कार्य चिज्जड असें ऐक्यें पहाती कृती
हे दृष्टांत न अस्मदादि रचना शास्त्रें श्रुती बोलती
श्रीव्यासादि सुनींद्र याच उपमा देतां सुखें डोलती ॥३६॥
श्रुती सर्व ब्रम्ह स्फुट वदति तें जे रिति पडे
प्रतीतीतें येना तिळ नयन तेथोनि बिघडे
प्रतीतीतें येना म्हणुनि बिघडेना म्हणतसा
गुरु नाहीं केला तुम्हिं अनुभवी ब्राम्हण तसा ॥३७॥
न वेदा पुराणांत दृष्टांस - वाणी
असी ते जगीं शंकराचार्यवाणी
वदे कारणत्वेंचि दृष्टांत नाना
नुरे ज्या पुढें शाब्दिकांचा तनाना ॥३८॥
प्रपंचाचें उपादान विना ब्रम्ह असेचिना
कार्य ब्रम्हचि कीं तेव्हां दुजें कांही न बोलवे ॥३९॥
तरंगाच्या आकृतीनें पाणीच स्फुरते जसें
पात्ररुपें स्फुरे तांबें ब्रम्हांडी आत्मता असी ॥४०॥
घटनामें जशी पृथ्वी पटनामेंचि तंतुही
जगनामें तसा आत्मा असे आत्मा नसे जग ॥४१॥
बळें हातीं माती कलश धरितां सांपडतसे
पहातां केयूर स्फुट कनक दृष्टी पडतसे
प्रतीती येरीती विविध घडतां ब्रम्ह गंवसे
शिश्रू नेणो तंतू परि पटपणीं तंतुचि वसे ॥४२॥
हेमापासुनि होति जे नग तयां प्रत्यक्ष हे हेमता
ब्रम्हापासुनि विश्व या अनुभवें याला असी ब्रम्हता
ऐशा स्वानुभवें निजाःद्वय सुखें सर्वज्ञ ते डोलती
श्रीमच्छंकरभाष्यकाराहि असे शास्त्रीं तयां बोलती ॥४३॥
जगनगा म्हणती जरि नश्वर
श्रुति म्हणे कन कोपम ईश्वर
तसि न शंकित शंकर - वैखरी
कनकशाश्वतता वदते खरी ॥४४॥
आकार जाय परि शाश्वत हेन राहे
प्रत्यक्ष गोष्टि नकळे कसि पामरा हे
तैंसीच आकृति घडे बिघडे न कांहीं
हेमत्व हें निवडिलेंच श्रुकादिकांहीं ॥४५॥
हिरण्य म्हणतां स्वयें सुकृत श्रुद्ध वाचा हरी
मनामधिल संशय प्रभुच उद्धवाचा हरी
दिसे कृत तरी असे अकृत शाश्वतीं हेमता
अगा सुकृत येरिती असि असे जगीं ब्रम्हता ॥४६॥
झालेंचि नश्वर तरी जडता असत्य
जो जो असत्या नगआश्रय त्यास सत्य
चित्स्वर्ण जो जड - नगीं गुरु सत्य दावी
त्यालाचि पूर्ण गुरुची पदवी वदावी ॥४७॥
घडे मोडे माया घडत घड मोडी न कनकीं
नमोडे हेमत्व क्वचिदपि खरें हें वचन कीं
दहीं होतां जैसें त्वरित अति दुग्धत्व बिघडे
घडे ना मोडेना कनक नग मोडे मग घडे ॥४८॥
नगा एकाचे ते दिसति तुटतां चारि तुकडे
न भेद स्वर्णत्वीं समचि मिरवें जें चहुंकडे
न ते चारी स्वर्णे नग न म्हणवे चारि शकलें
घडेना मोडेना कनकपण इत्यादि उकलें ॥४९॥
व्याप्य आणि जग कार्य असत्य
ब्रम्ह सर्वगत कारण सत्य
ब्रम्ह सर्व म्हणतांचि घडावें
अन्यथा सकळ हें उघडावें ॥५०॥
दिवांधाच्या दृष्टीं दिसति रवि - रश्मी न उघडे
न सर्व ब्रम्ह त्वीं तसि उघडही दृष्टि उघडे
अपूर्णे पूर्णत्व्वें म्हणति सकळ ब्रम्ह न घडे
विना सर्वात्मत्व - स्फुरण परिपूर्णत्व बिघडे ॥५१॥
स्वयें ब्रम्ह हें सर्व दृष्टांत नाना
वृथा तों अविद्यावृतांच्या तनाना
दिसे सर्वही ज्यास आत्माच सारा
न बोलेल गोष्टी अशा तो असारा ॥५२॥
चिदंशास देहामधें भिन्न पाहे
अपूर्वा गुरुची तयातें कृपा हे
गुरु जो न सर्वत्र आत्मत्व दावी
गुरुत्वाचि सीमा कसी ते वदावी ॥५३॥
असें प्रसुतें पंडुपुत्रास देवें
क्रमें बोलिलें हें पहावें सदैवें
गुरु तोचि कीं स्वात्मयामाजि सारा
चिदैक्येंचि दावी जडाचा पसारा ॥५४॥
अशा भावें पार्थाप्रति हरि वदे कीं जड जगा
पहासी आत्मत्वीं वदसिल असें ज्ञान तुज गा
असत्यें सत्यांत स्फुरति नग अन्यत्व न घडे
पुढें गीतेमध्यें प्रगटहि असे शब्द उघडे ॥५५॥
अगा ज्ञेय तें सांगतों सव्यसाची
तया जाणतां मुक्ति ते दिव्य  साची
वदोनी असें आदिपद्यांत दावी
अनिर्वाच्च सत्ताच ते तों वदावी ॥५६॥
परब्रम्ह आधीं असें देवदेवें
म्हणे तें अनादि स्वसत्तादि भावें
तया विश्व होणें अनादि स्वभावें
असें  बोलिलें ज्ञेय जें वासुदेवें ॥५७॥
म्हणे सर्वतः पाणिपादं म्हणोनी
जडोर्मीस चित्सिंधुरुपें गणूनी
वदे केवळ ब्रम्ह बारावियांत
जगद्रूप हें ज्ञेय तेरावियांत ॥५८॥
जसें पाणि - पादादि हें सर्व कांहीं
म्हणे ज्ञेय वर्णीतसे व्यापकांहीं
जरी ऊर्मि हे तोयरुपें वदावी
तरी आकृती व्याप्य हा भाव दावी ॥५९॥
मृषा भोगही त्याचपासूनि होतो
म्हणोनी असे सर्व आत्मा अहो तो
कळे ब्रम्ह कीं सर्व तेव्हां असाच
स्फुरे सर्वदा बोध अद्वैत साच ॥६२॥
तेरावा जो श्लोक तेरावियाचा
बोले आत्मा सर्व - गोसांवियांचा
वेदप्रोक्त ज्ञेय तें जो नदावी
त्याची येथें काय वार्ता वदावी ॥६३॥
जे जडीं अजड वैभव दावी तेचि एक गुरुमूर्ति वदावी
अक्षर क्षरचि एक कळाया वेद शास्त्रहि वदेच कळा या ॥६४॥
जडावेगळा कोण आत्मा नमानी म्हणे द्वैत हें इष्ट भेदाभिमानी
असा बोधही भेद फांसा भवाचा वदे येरिती शंकराचार्य वाचा
देहादिक ब्रम्हचि सर्व वाटे तो लागला अद्वय - बोध - वाटे
म्हणोनि देहात्म - विवेक - रीती बोलोनिही तुच्छ पुन्हा करीती ॥६६॥
नये सर्वही ब्रम्ह हें प्रत्ययातें नसे तोंवरी ज्ञान हें सत्य याते
कळे सर्वही ब्रम्ह तेव्हां भवाचा तुटे पाश बोले असी वेद वाचा
पर अबर म्हणावें थोर लहान सारें
सुर - नृप - सुशरीरें सर्व सारें असारें
पर अबर असे जें ब्रम्ह तें ब्रम्ह पाहे
मन अनुभवि जेव्हां श्रीगुरुची कृपा हे ॥६८॥
दिसे ऐसें जेव्हां पर - अवर - त्दृद्वंथि सुटती
दिसे ऐसें तेव्हां पर - अबर - संदेह तुटती
दिसे ऐसें जेव्हां पर - अवर - कर्म - क्षय घडे
दिसे ऐसें तेव्हां चरमग तिचें द्वार उघडे ॥६९॥
श्रुती ब्रम्हज्ञानें करुनि म्हणती मुक्ति जितुक्या
अशा सर्वाद्वैतें स्फुट करिति तात्पर्य तितुक्या
दुहावें जेथूनी मथन वरि सर्वानुभव दे
न हें बोलोनीही परि नर उगें गोधृत वदे ॥७०॥
परि प्रथम - पायरीवरिच ठेवितो जो पदा
क्रमें चरमपायरी वरुनि तो चटे त्या पदा
चढेल म्हणती तया धरुनि भावना अंतरीं
स्वरुप कळतो असा वदति मोक्ष वाक्यांतरी ॥७१॥
कसा मोक्ष अद्वैत - बोधाविनाहीं विना बोध अद्वैत सर्वत्र नाहीं
म्हणोनीच जें ब्रम्ह सर्वत्र मानें न वेदांतवाक्यें दुजीं त्यासमानें ॥७२॥
आत्मा जडांत सकळांत अतर्क्य वाटे
श्रुत्यर्थ यावरुनि लाविति अन्यवाटे
त्याचें नसे नवल तो कुमताऽभिमानी
तैसेंचि हें वदति अद्वय - बोध - मानी ॥७३॥
असे सर्वा तायी म्हणुनि म्हणती सर्वहि असें
जड ब्रम्हद्वैत श्रुतिविहितही मोडिति असें
अशा या शिष्यांला कसि जड चिदद्वैतरचना
कळे साक्षात्काराविण विफळता वेदवचना ॥७४॥
नहो सर्व सर्वी तया व्यापकाच्या न जो प्रत्यय - प्राप्त तो बोध काचा
असी गोष्टीं तो त्यासही मान्य साची वदों तत्प्रतीति स्वयें मानसाची ॥७५॥
प्रतीति जसि आपुले तनुमधें स्वयें सांपडे
सचेतन - अचेतनी जरि ठसाच ऐसा पडे
जडोर्मि मग ते दिसे निज चिदंबु - सत्ता खरी
जडैक्य नघडे असी म्हणु निघेल कां वैखरी ॥७६॥
प्रतीति आहे म्हणऊनि वाणी वदेल शब्दीं नकरुनि वाणी
परंतु मानूनि मृषा जडाला न ब्रम्ह मानी तरि तो उडाला ॥७७॥
कीं ठाव कीं व्यापकता म्हणोनी बोले जई व्याप्य मृषा म्हणोनी
तेव्हां अधिष्ठान - विवर्त्त - सिद्धी रज्जूचि कीं सर्प असी प्रसिद्धी ॥७८॥
एवं जई व्यापकता कळावी जडैक्यता निश्चि आकळावी
जो हें घडेना म्हणतो स्ववाणी त्याला असे व्यापक बोधवाणी ॥७९॥
असा सर्वस्वाचा निगम न तया स्वानुभव दे
असे सर्वा देहीं विदित नसतां कल्पुनि वदे
जडोर्मी व्यापी जो चिटुधधि निजात्माचि समजे
स्व - सर्व - ब्रम्हत्वीं पुरुष मग कां तो न उमजे ॥८०॥
न ज्या सर्व ठावें न सर्वत्व ठावें न ज्या द्वैत ठावें कसें हो उठावें
जडावेगळा जो स्वदेहींच पाहे अपूर्णा गुरुची तयातें कृपा हे ॥८१॥
गुरु स्वात्मता जो स्वशिष्यास दावी अहो काय ते एकदेशी वदावी
स्वदेहांत आत्माच या प्रत्ययातें दिसावेंच सर्वत्र ते सत्य यातें  ॥८२॥
एका स्वदेहींच जसा कळावा तैसाचि सर्वत्रहि आकळावा
तरीच आत्मा कळला म्हणावा तो आत्मवेत्ता गुरु हा गणावा ॥८३॥
जिज्जडाद्वय जसें उडवीती व्यापकत्वहि तसें बुडवीती
ते गुरु म्हणुनि केविं म्हणावे वेष मानुनिच सत्य गणावे ॥८४॥
मृषा व्याप्या तेव्हां म्हणति लटिकें व्यापकपण
स्व आचार्यत्वा ते मिरविति असे येचि कृपण
न या चित्सिंधूता स्थिर चर तरंगांत दिसती
वदावें हें तेणें इतर वदती गोष्टि नुसती ॥८५॥
स्वदेहींच आत्मत्व ये प्रत्ययातें न सर्वत्र तैसें दिसे सत्य यातें
असे प्राप्ति एकाच देहात्मयाची नसे सर्वथा भेटि सर्वात्मयाची
ममैवांशो जीव प्रबु म्हणतसे पांडुतनया
चिदंश - ज्ञानी तो करित निजदेहीं जतन या ॥८६॥
जसे नाना भानू प्रतिघटजळीं भिन्न दिसती
अहंसत्वीं तैसे प्रतितनु चिदात्मे गवसती ॥८७॥
जया ज्योति रुपें रधी नीर - भेदे दिसे भिन्न भेटे पुन्हा ते अभेदें
आसा क्षेत्रभेदी असे वासुदेव श्रुती बोलती जाणती हें सदैव ॥८८॥
सचेतन - तनूमधें वसति चित्प्रकाश द्वय
स्वरुप सचराचरीं विषय - वर्ज तें अद्वय
तदंशचि चिदंग ते जग तरु फळें भक्षिती
तयां जड निषेधुनी जन अपूर्ण ते लक्षिती ॥८९॥
तया जो या देहीं जड - तनु - निरासें समजला
गमे त्याला झालें अधिगत परब्रम्ह मजला
पुसेना कीं ब्रम्ह श्रुति म्हणति सर्वत्र वसतें
मला काया - ऐक्यें जडतनुचमध्यें गवसते ॥९०॥
तयातें तो नेणें मुख म्हणतसे जो प्रतिमुखा
मुखा नेणें जेविं प्रतिमुखपणें जाणत मुखा
मिळे सर्वात्मत्वीं मति मग न तो अंश गवसे
तट स्पर्शे नीर प्रतितट न नीरीं नगवसे ॥९१॥
द्विधा चैतन्याचा अनुभव नसे तो न समजे
पहाती सर्वज्ञ स्थिर - चर - जगामाजि समजे
स्वकर्माचें भोगी कृतफळ गुणीं तोंवरि वसे
अशेषात्म - ध्यानीं इतरपण त्याचें न गवसे ॥९२॥
जया बंध भोक्तृत्व याही भवार्ता तया लागिं मोक्षाचिही लाभ वार्ता
जया रोग आरोग्य त्याला प्रसिद्ध श्रुती - प्रोक्त सिद्धांत हा क्षिप्र सिद्ध ॥९३॥
भोग यास्तवचि चित्प्रति बिंबी भेद ऐक्यहि तया निज - बिंबीं
ब्रम्ह तें म्हणुनि जो गुरु दावी भोक्तृता तरि तया न वदावी ॥९४॥
गुरुच्या मुखें आयके ब्रम्ह कांनीं पदी दुःख त्यातें चित्वा कंटकानीं
तयावीण भोक्ता दुजा सांपडेना परब्रम्ह तो भोग - फांसा पडेना ॥९५॥
उक्रामंत स्थितं वा म्हणउनि हरि हा श्लोक बोले स्ववाचे
कां देखे ज्ञानचक्षूकरुनि अनुभवी भोग अंशाचि वाचे
ज्ञानी सर्वात्मवेत्ते निजतनुच भवीं भोगितां अंश सारे
साक्षित्वें जो पहातो तुझिं इतरपणें तो पहाना कसा रे ॥९६॥
तुम्हां ब्रम्ह वाटे तथा भोग सारे दिसेना तुम्हांलागिं तोही असा रे 
अशा संकटें प्राकृत - ग्रंथकारीं मनीं मानिला भोग नाना प्रकारी ॥९७॥
प्रकृति माजितिचे गुण भक्षितो प्रकृतितें प्रकृतीस अपेक्षितो
प्रकृतिनें प्रकृतींतचि धांवतो विविध देह म्हणूनिच पावतो ॥९८॥
म्हणे श्रुति शरीर हें रथ चिदंश आत्मा रथी
इह द्विविध इंद्रियें फिरवि बुद्धि हे सारथी
ह्यांसम न दोर हे विषय ज्यामध्यें तोलती
तयांसहित भोक्तृता कुशळ आत्मया बोलती ॥९९॥
प्रगट करि मनीम वीशब्द येथें विचार
श्रुतिविण वदणें ते सर्व वेडे विचार
धरुनि निगम दीजे बोलणें युक्तिसिद्ध
त्रिभुवन करि त्यातें मान्य ऐसें प्रसिद्ध ॥१००॥
श्रुतितरि म्हणते कीं आत्मया भोग साच
स्फुट मनन - विचारें अर्थ साधे असाच
असुखमय सुखाचा रोग हा ज्या भवार्ता
सुमति गणति त्याला मोक्ष - आरोग्य - वार्ता ॥१०१॥
मनासि जे भोगति भोग सारे त्यांला पुसीं मोक्ष मना कसा रे
ते बोलती कीं तरि कोण बुद्ध म्हणाल आत्मा तरि तें अबद्ध ॥१०२॥
जया भोग हा रोग हा बद्धवार्ता चिदंशा तया मोक्ष - आरोग्य वार्ता
मनांशा जयाला म्हणे चक्रपाणी विवेकाऽब्धिचें या वहू खोल पाणी ॥१०३॥
कळे निःशब्दत्वें स्फुरण उरणें कारणपणें
दिसे चित्सिंधूचें उघड जळऊर्मीत लपणें
चिदंगीं स्वांशाचें स्व - कृत - फळ - भोगीमच फिरणें
सदा तो बिंबैक्यें तरि जितचि दुःखाब्धि तरणें ॥१०४॥
चिदंश ज्ञ सर्वत्व नेणेम कदापी स्वअज्ञान शौर्य तई एकदा पी
म्हणे इंद्रियाऽतीत - आत्म - स्वरुपीं नदेखों जगद्रूप कांहीं अरुपीं
स्वरुपीं त्या आत्मा जग सकल आकाश सुमना
प्रतीतीमध्यें त्या बुडवुनि असों नित्य सुमना ॥१०५॥
अविद्या तों गेली अजड निज सत्ताच कळली
वदे गोष्टी ऐशा चतुर परि विद्या न फळली ॥१०६॥
बुद्धीस ज्या जग दिसोनि नसे स्वरुपीं
सत्यत्व तीस उरलें दृढ विश्वरुपीं
विक्षेप - शक्ति उरलीच तिची अविद्या
ठावा न सर्वगत तो म्हणवे न वेद्या ॥१०७॥
नसोनी सर्वत्व स्वसुख जरि देहींच असतें
तुझें तें स्वाऽज्ञान स्वतनुभरि बोधें निरसतें
स्वदेहीं देहाचा स्व - कृत - फळ - भोक्ताच कळला
अगा ब्रम्हज्ञान - द्रुम अजुनि नाहींच फळला ॥१०८॥
इंद्रियें धरुनिही उपनेत्रें देखसी जग अगा मतिनेत्रें
त्याविणें जग दिसे न मतीतें व्योमपुष्प म्हणुही भयतीतें ॥१०९॥
रव पुष्प झालें मग विश्व सारें देहादिकें ही लटिकीं असारें
चित्सिंधु देखे न जडा तरंगी तों ते जड भ्रांतिच अंतरंगी ॥११०॥
चिदंबुत्वें पाहे स्थिर चर जडोर्मी बुडबुडे
चिदब्धीमध्यें त्या जग जड समूळीं तरि बुडे
तरंगाचीं रुपें जळ निवडितां व्योमसुमनें
रवपुष्पत्वें बापा मग जग पाहावें स्व सुमनें ॥१११॥
स्वांशत्वें कृष्ण बोले श्रुति - गण - सलिलीं भिन्न आत्मार्क भेदें
भोक्ता भिन्ना उपाधीप्रति म्हणतअसें अंशअंशीं अभेदें
अंशातें ज्ञानचक्षू करुनि अनुभवी भोग - काळीं पहाती
भुंजानं वा म्हणोनी प्रभु म्हणत असे अंश सद्रश्मि होती ॥११२॥
गुरु दावी देहीं शरण तनुमध्येंच समजे
नदेखे चित्सत्त स्थिरचर जगामाजि सम जें
कृतार्थ ज्ञानें त्या म्हणति गुरु सर्वज्ञ नकरी
धनाच्या आशेनें अधन अधन - स्थान नुकरी ॥११३॥
शशी जातां अस्ता भ्रमर कुमुदामाजि गवसे
तया मंदाराचा कुसुम - रसही केविं गवसे
शशी जिज्ञासूचा गुरु करुनि अल्पज्ञ बुडवी
सपूर्णत्वें गाजे मग जड चिदद्वैत उडवी ॥११४॥
तृप्त एक नकरी मधुपानें पुष्प हें धरियलें मधुपानें
आणिका शरण त्यासम जाया योग्य शिष्य - समता समजाया ॥११५॥
परब्रम्ह - नामें चिदंशास दावी असो ते किती भिन्न वार्त्ता वदावी
निषेधूनि देहा अहंप्रत्ययातें गुरु सांगतो ब्रम्ह तें सत्य यातें ॥११६॥
बुडविती शरणासह आपणा निखिल मानित तत्व अहंपणा
गुरु शिळा अप्ति गाढ गळा पडे तरि भवाऽब्धि थडी कसि सांपडे ॥११७॥
नवाटे स्व - देहात्मता सत्य यातें असें बोधुनीया अहंप्रत्ययातें
म्हणे केवळ ब्रम्ह हें सर्व सारें जडाच्या मनीं बोधतो सर्व सारे ॥११८॥
शाखा सशब्द निरसूनि शशांक दावी
सत्ता स्वशब्द निरसूनि असी वदावी
ते आत्मता गणिति सात्विक मीपणातें
बोधें अशा म्हणविती गुरु आपणातें ॥११९॥
असो या प्रसंगांत कां दंभवार्ता जड ब्रम्ह दावी गुरु तो भवार्ता
जडीं व्यापकत्व स्वशिष्यास दावी कसी पूर्ण ऐक्यार्थता ते वदावी
अशब्दाच्या शब्दाविण गुरु जरी स्वाऽनुभव दे
अविद्या नासेना जरि जड जगीं त्यास नवदे ॥१२०॥
चिदंश - ज्ञानें त्या कसि निज - अविद्या निरसते
जड ब्रम्हाऽद्वैताविण विकळ विद्या निरस ते ॥१२१॥
दिसे सर्वा ठायीं तरिच निज चिद्वम्ह गवसे
चिदात्मत्त्वें एके निजतनुमधें अंशहि वसे
न तो चारी वाचा प्रकृतिहुनि तोही पर असे
न देहाबाहेरी प्रतिति तनुमध्यें बहु असे ॥१२२॥
कळे ब्रम्ह तेव्हांच ते ब्रम्हविद्या अहं देह हे भावना ते अविद्या
परब्रम्ह ज्याला म्हणे वेदवाचा घडावा बरा बोध त्या वैभवाचा ॥१२३॥
सत्यज्ञान अनंत वेद म्हणती तीं लक्षणें ज्याकळे
तेंचि ब्रम्ह परंतु शब्दचि तिन्हीं शब्दों न तें आकळे
तेव्हां विश्व विलक्षणें विविधही हीं लक्षणें साधिती
कीं मिथ्या जड अंतर्वत जग हें ऐसें गुरु बोधिती ॥१२४॥
सत्य ब्रम्ह मृषा प्रपंच परि तो सत्याविणें नाकळे
ज्ञानीं लक्षण हें द्वितीय गुरुच्या बोधें अहो तें कळे
तेतों सर्व अनंत हें गुरु वदे यालागि ती लक्षणें
तेव्हां श्रीगुरुराज दाखवि जयीं पाहे कृपाईक्षणें ॥१२५॥
परम गुरुपदाची कीर्ति लोकीं कळाया
परम - परम - बोधें दाखवी तो कळा या
चरम मुख जयाचें शेषशायी हरी तो
चरम - कुमत - वादा वामनात्मा हरीतो ॥१२६॥

N/A

References : N/A
Last Updated : June 27, 2009

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP