वामन पंडित - स्फूटश्लोक
कवी वामनपंडितांचे काव्य वाचन म्हणजे स्वर्गीय सुख.
त्रिभुवना जननीजनकास या विसरुनी भ्रमले जन कासया
हरिचिया धरिता नर कास रे ननिरखी दृढ तो नरकास रे ॥१॥
करुनि निश्वळ मानस श्रीहरी रघुपती भजतां दुरितें हरी
जनकजापतिसाठि घडींत रे पळभरी स्मरता भव तो तरे ॥२॥
नदेतो द्विजां सेचिती पाप - राशी दित्या जोडत्ये स्वर्गलोकीं मिराशी
असें जाणुनी अन्न देई भुकेल्या तदा ते नसोडी रमा कांहिकेल्वा ॥३॥
दिल्या जाते लक्ष्मी म्हणुनि म्हणताती नर कपी
नदेतां अप्राप्तीस्तव सतत अंतीं नरक पी
कृपा केल्या रामें त्वरित धनधर्मी व्यय किजे
द्विजांतें पूजावें विनवणि मनाते अइकिजे ॥४॥
पूर्वी त्वां धर्म केला म्हणुनि कलियुगीं प्राप्त लक्ष्मी तुला जे
झाली आतां नदेतां पुनरपि कमला राहुं यालागि लाजे
जाणोनी सर्वकाळीं द्विज - हरि - भजनी सज्जनीं अन्नदानीं
वेचीं द्रव्यास भावें तरि तुज सगुणा मोक्ष लाभे निदानी ॥५॥
देणार एक मन - कल्पित राम लोकीं
त्याकारणें वदति बोल दिठी विलोकी
आहे जरी कवण शक्ति तुझ्या सुवाचे
वर्णी अखंड मनुजा गुण राघवाचे ॥६॥
मुखें ब्रम्हज्ञाना कथिति कर जोडोनि सकाळी
जगा दावी ती ते कुशळ कविता गायनकळा
स्वयें आशाबद्धें सततचि धनालागिं यजिजे
नव्हे ते गोसांवी विविध - जन - भोंदू समजिजे
पदें ओव्या नाना - विविध - पथिंचे श्लोक शिकुनी
कथा कीजे तेणें धन मिळविती लोक ठकुनी
नसे प्रेमा चित्तीं अभिनष महा दाविति जना
असे हे गोसांवी रहित समजा रामभजना ॥८॥
भले साधु ज्ञाते निरखुनि तयां द्वेष करिती
सदा गर्वी नीचां नमुनि स्तविजे लौकिकरीती
नलावीती दृष्टी क्षणभरि चिदानंद - स्वरुपीं
असे हे गोसांवी उदरभरणाचे बहुरुपी ॥९॥
आहाहा चौर्यांशी क्रमुनि मनुजा सुंदर कशी
तनू हे श्रीरामें दिधलि भजनालागुनि असी
तितें कैसें मुर्खा क्षणिकविषयाधीन करिसी
अनर्घ्या रत्नोतें त्यजुनि करिं गारेशि धरिशी ॥१०॥
अहो येतां जातां बसतउठतां कार्य करितां
सदां देतां घेतां वदनिं वदतां ग्रास गिळितो
घरीं दारी शय्येवरि रतिसुखाचे अवसरी
समस्तांची लज्जा त्यजुनि भगवचिंतन करी ॥११॥
N/A
References : N/A
Last Updated : June 27, 2009
TOP