घनश्याम श्रीहरी सावळा । पाहूं वेळोवेळां गे० ॥धृ०॥
भक्ति सोनें घेऊनी हातीं । सुंदर अंगठी बनवूं प्रीति ।
हीरा चैतन्य सगुण मूर्ती । बसवुन पाहूं निजडोळा ॥घनश्याम० ॥१॥
ध्यान धारणा करुनी दूरी । अंगठी घालूं विवेक करीं ।
प्रेमें पाहूं वरचेवरी । मना लागला जिव्हाळा ।घनश्याम० ॥२॥
दशांगुलीं घालितां अंगठी । सत्वर प्रगटें तो जगजेठी ।
चैतन्य स्वरुपीं त्या घालूं मिठी । वारी म्हणे करुं सुखसोहळा । घनश्याम० ॥३॥