येई येई रे कृष्णा मम सदनीं ॥धृ०॥
वाजवी मंजुळ मुरली तुझी ती ।
तन्मय वृत्ती होई तिनी । येई येई० ॥१॥
तव स्वरुपीं मन गुंतुनी गेलें ।
पाहीन तुज मी कधी नयनीं ।येई येई० ॥२॥
येई कृष्णा झडकरी आता ।
अलिंगीन तुज प्रेमानी । येई येई० ॥३॥
आस धरुनीया वाट मी पाहतें ।
वारी लीन ही तव चरणीं । येई येई० ॥४॥