मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
आनंदाचा कंद हरी हा गोविंद...

भक्ति गीत कल्पतरू - आनंदाचा कंद हरी हा गोविंद...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


आनंदाचा कंद हरी हा गोविंद गावा ।

प्रेमानंदे गावुन छंदें धरुनी दृढभावा ॥धृ०॥

भावावांचुनी देव न भेटे निःसंशय जाणा ।

म्हणुनी हृदयीं भाव धरुनी प्रेमें करी भजना ।

बळकट धरिसी भाव तरी तो प्रगटे देवराणा ।

दर्शन देवुनी भक्तांच्या त्या पुरवी कामना ।

भक्तिवांचुनी प्रिय न वाटे जगीं दुजें देवा ।

प्रेमानंदें गावुनी छंदें धरुनी दृढभावा० ॥१॥

नाम किती हें गोड हरीचें गातां प्रेम येतें ।

स्वानंदाने गातां तनु हो रोमांचित होते ।

सद्गदीत तो कंठ होवुनी प्रेमाश्रु वाहाते ।

भजनानंदीं तल्लीन होतां देहबुद्धी जाते ।

ऐसी प्रेमलक्षणा भक्ति आवडे देवा ।

प्रेमानंदें गावुनी छंदें धरुनी दृढभावा० ॥२॥

विभक्ती नाही तीच भक्ति सर्वाहुनी मोठी ।

त्या भक्तीच्या योग वश तो होतो जगजेठी ।

त्या भक्तीला सोडुनी देव तो जाये न वैकुंठी ।

योगक्षेम चालवी त्याचा प्रेम धरुनी कंठीं ।

वारी म्हणे हा भक्तीमेवा प्रिय असे देवा ।

प्रेमानंदें गावुनी छंदें धरुनी दृढभावा० ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP