मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
हरि तव अघटीत लीला । वर्णा...

भक्ति गीत कल्पतरू - हरि तव अघटीत लीला । वर्णा...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


हरि तव अघटीत लीला । वर्णायाला मति नाही मजला. ॥धृ.॥

मच्छ कच्छ हो होवुनी । पृष्ठीं धरिली ती मेदिनी ।

दैत्य असुर मर्दुनी । सुखी केलें भक्त हो मुनी ।

हरी तव विपरीत करणी । अवतार धरिसी भक्‍त तारायाला ।

हरी तव अघटीत लीला० ॥१॥

वराह रुप झालासी । पृथ्वी दाढेवरती धरिसी ।

नरहरी प्रगटलासी । भक्‍त रक्षीला प्रल्हादासी ।

वामन बटुरुप होसी । दान देउनी बळीचा द्वारपाळ झाला । हरी तव० ॥२॥

परशुराम तूं जाहला । पाळीयलें पितृ वचनाला ।

मातृवध तो केला । पुनरपी मागुनी वर पित्याला ।

जिवंत करिसी मातेला । निःक्षत्रीय पृथ्वी एकवीस वेळां ।हरी तव० ॥३॥

रामरुप तें धरुनी । रावण कुंभकर्ण मर्दुनी ।

बिभीषण राज्यीं स्थापुनी । वानरांहातीं सेतु बांधुनी ।

धरीलें व्रत एकपत्‍नी । दास भक्त तो हनुमंत केला ।हरी तव० ॥४॥

आठवा अवतार पूर्ण । गोकुळीं प्रगटला श्रीकृष्ण ।

मोहिलें सर्वांचें मन । असंख्य दैत्य कंस मर्दुन ।

केला राजा उग्रसेन । सोडविलें देवकी वसुदेवाला ।हरी तव० ॥५॥

सोळा सहस्त्र त्या नारी । भोगुनी अससी ब्रह्मचारी ।

गोकुळी केली हो चोरी । परी दोष न त्याचा तुज तिळभरी ।

ऐसा तूं निर्विकारी । वर्णूं किती तुझ्या अनंत गुणाला ।हरी तव० ॥६॥

अनंत रुपाने नटसी । अंत न लागे श्रृति वेदासी । गूढ पडलें शास्त्रासी ।

परी भक्ताच्या अंकीत होसी । निजरुप त्या दाविसी ।

स्वानंद मेवा तो द्या वारीला । हरी तव० ॥७॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP