सुंदर माझें बाळ ग राधे । सुंदर माझें बाळ० ॥धृ॥
नाना परीचे आरोप करुनी । घेसी चोरीचे आळ ग राधे० ।
सुंदर माझें बाळ० ॥१॥
तूंच ग त्याला घेवुन जाशी । नाचविसी बांधुनी चळ ग राधे० ।
सुंदर माझें बाळ० ॥२॥
खेळ खेळाया कृष्णा नेतसे । परी बाई नीट संभाळ ग राधे० ।
सुंदर माझें बाळ० ॥३॥
पूतना मावशी नटुनी आली । माराया माझें बाळ, ग राधे० ।
सुंदर माझें बाळ० ॥४॥
अपार विघ्नें येती म्हणुनी । धाडितें वनीं गोपाळ ग राधे० ।
सुंदर माझें बाळ० ॥५॥
वारी म्हणे हा मनमोहन ग । करी भक्ता प्रतिपाळ ग राधे ।
सुंदर माझें बाळ० ॥६॥