राधा प्यारी तुजसी हरी । सांग कां तरी ॥धृ०॥
अर्पुनीया तन मन धन । झालें तुझ्या पायीं शरण ।
तुजविण मज सांग कोण । करीसी कां दुरी । राधा प्यारी० ॥१॥
तुजविण मज एक क्षण । वाटे बा युगसमान ।
अर्पुनी तुज पंचप्राण । प्रेम अंतरीं । राधा प्यारी० ॥२॥
काय तिने दिलें तुजला । तें तूं हरी सांग मला ।
देह पदीं अर्पियला । नुरे आता वारी । राधा प्यारी० ॥३॥