मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|भजन|भक्ति-गीत कल्पतरू|भक्तीपर पदें|
तव भक्तीविण कांही नको मज ...

भक्ति गीत कल्पतरू - तव भक्तीविण कांही नको मज ...

खास हितचिंतक व प्रेमळ भगिनींसाठी श्रीमती हरिभक्तपरायण वारूताई कागलकर कृत भजनांची " कल्पतरू " सुमनावली.


तव भक्तीविण कांही नको मज । हेंच देई मज श्रीहरीरे ।

हृदयीं भक्ति प्रेमपुरामधे । वृत्ती विरुनी जावोरे ॥धृ॥

विषयाची ती विस्मृती पडो । तव स्वरुपीं वृत्ती बुडोरे ।

बाहेर येतां नामस्मरणीं । अखंड वृत्ती ही जडोरे । तव भक्तीविण० ॥१॥

जिकडे तिकडे आस्ती भाती । म्हणुनी वृत्ती विवरोरे ।

नामरुप हें मिथ्या करुनी । स्वानंदांत वृत्ती मुरोरे । तव भक्तीविण० ॥२॥

दृष्य भासा स्पर्श होतां । प्रेमालिंगन नित्य घडोरे ।

विश्वरुप हें सर्व जाणुनी । ऐक्य भाव हा जडोरे । तव भक्तीविण० ॥३॥

सोहं शद्बें नाद ब्रह्मीं । वृत्ती रंगुन गुंगोरे ।

बाहेर येतां वैखरी नांदे । तालसुरामधे ढोलोरे । तव भक्तीविण० ॥४॥

अहंब्रम्हास्मी रसस्वाद हा । वृत्तीला गोड लागोरे ।

वारी म्हणे वृत्ती बाहेर येतां । विसर पडो देहबुद्धीचारे । तव भक्तीविण० ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : May 07, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP