उमरावती हो शहर । तिथे राम असे मनोहर० ॥धृ०॥
चला जाऊं दर्शनाला । आनंद होतो मनाला ।
पाहातां हो श्रीरामाला. ॥चाल ॥
दिसे मूर्ती बहु सुंदर । तिथे राम० ॥१॥
जागा रम्य स्टेशानासमोर । बांधिलें सुबक मंदीर ।
लहानसें दिसें टुमदार ॥चाल॥
लावील्या हंडया झुंबर । तिथे राम० ॥२॥
किती सुंदर तनु ही गोरी । सीताबाई सुकुमार भारी ।
लक्ष्मण उभे शेजारीं ॥चाल॥
मारुति जोडुनी कर । तिथे राम० ॥३॥
हातें पुराण संध्याकाळीं । आनंद होतो त्यावेळीं ।
प्रेमाने हरीला न्याहाळी ॥चाल॥
आदिमाया बैसली वर । तिथे राम० ॥४॥
करिताती भजन सोमवारीं । मिळूनिया अवघ्या नारी ।
गाणीं गाती परोपरी ॥चाल॥
भजनाचा करिती गजर । तिथे राम० ॥५॥
शके अठराशे एकवीस । ज्येष्ठ शुद्ध तृतीयेस ।
पुनर्वसु नक्षत्रास ॥ चाल॥ जन्म दीन असे रविवार । तिथे राम० ॥६॥
पांडुरंगाचि पाहुनी भक्ति । प्रगटले रघुपती । ताराया दीनाप्रती ॥चाल॥
कृपा करा वारीचे वर । तिथे राम० ॥७॥