भजनीं रस रंगा ॥ हरीच्या ॥ भजनीं रस रंगा ॥धृ.॥
देव भक्त आणि नाम हरीचें । त्रिवेणी गंगा ॥
हरीच्या॥ नामें रस रंगा० ॥१॥
नामस्मरणें पापें सर्वही । होतील तीं भंगा ॥
हरीच्या॥ नामें रस रंगा० ॥२॥
नामस्मरणीं रत होण्याला । धरा साधुसंगा ॥
हरीच्या॥ नामें रस रंगा० ॥३॥
वारी म्हणे तुज पावन करी ही । हरीनाम गंगा ॥
हरीच्या॥ नामें रस रंगा० ॥४॥