दत्तात्रय अवधूता ॥ अवधूता ॥ भक्ति दे मम चित्ता ॥धृ०॥
त्रिविध ताप हे षड्वैरी । कलीयुगीं बलवत भारी । दत्तात्रय० ॥१॥
तुजवीण ह्या शास्ता । त्रिभुवनीं नाही कोणी ॥ दत्तात्रय० ॥२॥
तव भक्तीयोगें गुण माया । अवघी जाईल विलया ॥ दत्तात्रय० ॥३॥
ज्ञान वैराग्य मज देई । शांती सुख तें देहीं ।दत्तात्रय० ॥४॥
अखंड तव पदीं जडो वृत्ती । द्वैत न स्फुरो चित्तीं । दत्तात्रय० ॥५॥
सद्गुरुनाथा हो तव पायीं । अभेद वारी होई । दत्तात्रय० ॥६॥