शिखरिणी
नृपाळाच्या मांडीवरि बसुनि मांडी हरिख ते ।
तया पाहू आले जन सकळ जाले हरिखते ।
महावाद्ये नाना निनदहि तनाना मग घडे ।
पिता तीचा पांटीभर धनहि वांटी बहु विडे ॥२५१॥
अनुष्ठुप
भाली रंगीत टिकले चंदनाची उटी उरी ।
होता संगीत टिकले करिती चाउटी बरी ॥२५२॥
वोव्या
नानापरीचे मिष्टान्न । चारी दिवस भोजन ।
वधूवर मिरवोन । घरभरण केली ॥२५३॥
राजा निरोपाते घेत । दमयंतीसमवेत ॥
आपुल्या नगराते येत । नांदे आनंदभरे ॥२५४॥
समाप्त