दमयंती स्वयंवर - पृष्ठ २४

रघुनाथ पंडित यांच्या काव्यात इतके माधुर्य व इतका रस आहे की, ते आरंभापासून शेवटापर्यंत वाचल्यावाचून मनाची तृप्ति होत नाही व एकदा वाचले म्हणजे पुनः वाचावेसे वाटते.


वोव्या

इंद्रादिक तेह हूप । धरूनि आले नळरूप ।

सभे बैसले अमूप । जेथे भूप शोभती ॥२३२॥

आला नळही भूपाळ । कीर्तिरूपे जो विशाळ ।

तदा दमयंती वेल्हाळ । सखियांसी बोलते ॥२३३॥

पद

नळराजहिरा वरिला । सखे म्यां तोचि मनी धरिला ॥धृ०॥

कुलिशास धरी बलशासन तो, वळशासच हेतु दिसे ॥

जलशास महाजलशालि, शिखावल शांत कसा विलसे? ।

कलशोद्भवशोभि दिशाधिपतीस वशायित चित्त नसे ।

कलशाब्धिगभीर विशाल यशा निषधेंद्र खुशाल करोनि वसे ॥१॥

वरचेल नृपांस करोनि कृपा, वरचेल दिले फिरुनी ।

वितराच; भली चतुराई करा, उतराइ तेणे करुनी ।

अहिराजहि राजसभेत विराजत त्या पय पाजवुनी ।

असुराळि, सुराळि निराळि, निरोपि, तियेसहि राजउनी ॥२॥

अरविंदविलोचन कुंदरदद्‌युति मंदरसा धीर जो ।

गुणमंदिर जो शरदिंदुसमान नवमन्मथसुंदर जो ।

श्रितवृंद जया हरिचंदन मानित गतिजित-सिधुर जो ।

रघुनंदन पंडित वंदित ज्यास वळित्रय-बंधुर-कंधर जो ॥२३४॥

वोवी

ऐसे बोलोनि सुंदरी । बैसे शिबिके-भीतरी ॥

आली राजसभांतरी । बरोबरी शारदा ॥२३५॥

मालिनी

विमलतर तदंगी ते सभालोक सारे ।

अनुफलति कराया काय तेथेच थारे ? ॥

फलित-जन तनू ही फारसा भार जाला ।

तरि धरि चपला हे उत्तरीयांबराला ॥२३६॥

वोवी

बोले शारदा तिजला । ऐक राजांच्या नामांला ॥

मना येईल तयाला । माळ घाली सुंदरी ॥२३७॥

शा०वि०

हा राजा ऋतुपर्ण-नाम धरिता हारावली कंधरी ।

हा राहे शरयू-समीप नगरी हा राजसे आदरी ॥

हा राजीव-सुह्रत्कुलांबुधिशशी; फारा जनाचा पहा ।

थारा हाच, धरी रिपूंसि परते सारावया चाप हा ॥२३८॥

वसंत तिलका

येणेपरीच बहु भूप निवेदिजेले । ईच्या मनासच न येत उगेच ठेले ॥

जेथे वळी धरुनि पंचनळी बसे ते । तेथे विरंचितनयेसमवेत येते ॥२३९॥

वोवी

बोले शारदा वचन । "येथे बाई सावधान ॥

बरे घालूनिया मन । वरलाभे सुखी हो ॥२४०॥

N/A

References : N/A
Last Updated : October 11, 2012

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP