मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|सिध्दान्तबोध| अध्याय ३८ वा सिध्दान्तबोध प्रस्तावना अध्याय १ ला अध्याय २ रा अध्याय ३ रा अध्याय ४ था अध्याय ५ वा अध्याय ६ वा अध्याय ७ वा अध्याय ८ वा अध्याय ९ वा अध्याय १० वा अध्याय ११ वा अध्याय १२ वा अध्याय १३ वा अध्याय १४ वा अध्याय १५ वा अध्याय १६ वा अध्याय १७ वा अध्याय १८ वा अध्याय १९ वा अध्याय २० वा अध्याय २१ वा अध्याय २२ वा अध्याय २३ वा अध्याय २४ वा अध्याय २५ वा अध्याय २६ वा अध्याय २७ वा अध्याय २८ वा अध्याय २९ वा अध्याय ३० वा अध्याय ३१ वा अध्याय ३२ वा अध्याय ३३ वा अध्याय ३४ वा अध्याय ३५ वा अध्याय ३६ वा अध्याय ३७ वा अध्याय ३८ वा अध्याय ३९ वा अध्याय ४० वा अध्याय ४१ वा अध्याय ४२ वा अध्याय ४३ वा अध्याय ४४ वा अध्याय ४५ वा अध्याय ४६ वा अध्याय ४७ वा अध्याय ४८ वा अध्याय ४९ वा अध्याय ५० वा श्रीसिध्दान्तबोध - अध्याय ३८ वा ‘श्रीसिध्दान्तबोध’ हा संतकवि श्रीशहामुनि यांचा ग्रंथ म्हणजे मराठी साहित्याच्या खाणींतील एक तेजस्वी हिरा आहे. Tags : pothisiddhant bodhaपोथीसिध्दान्त बोध अध्याय ३८ वा Translation - भाषांतर श्रीगणाधिपतये नम: ॥ श्रीदत्तात्रेयाय नम: ॥ युगांमाजी चौथा कली ॥ त्यांत पापें फार जाहलीं ॥ पंढरी पेठ वसविली होळी ॥ दोषगोंवर्या जाळावया ॥१॥पंढरपुरीं उदेला हेली ॥ कलिदोषनिशा ग्रासिली ॥ किंवा गिरिअग्नीचे ज्वाळीं ॥ भस्मलीं पातकें पतंग ॥२॥नातरी पापसागराप्रती ॥ पंढरी प्राशनीं महा अगस्ती ॥ दोषनिशाचरां मारुती ॥ किंवा भवसर्पी खगेंद्र ॥३॥मिळे संतांची मंडळी ॥ वाजे स्वानंदाची टाळी ॥ कीर्तनघोषाची आरोळी ॥ पळे काळ पाहोनी ॥४॥भीमरथी दक्षिणतीरीं ॥ परब्रह्म उभें वीटेवरी । कर ठेवोनि कटावरी ॥ ध्यान दिगंबर साजिरें ॥५॥चंद्रभागा वाळवंटी ॥ होय पवित्र यात्रेची दाटी ॥ एकमेकां भेटती ॥ पायीं मिठी पडतसे ॥६॥सर्वांनीं देवास भेटावें ॥ ऐसी कोठें चाल घडे सांगावें ॥ नलगे दाढीमिशीस भादरावें ॥ तीर्थउपासना तीहि नलगे ॥७॥ऐसी नामाची गर्जना ॥ त्रैलोक्यांत नाही जाणा ॥ अठरा वर्षांचा पाहुणा ॥ करी उंच निचासी ॥८॥सर्वामुखीं नामाची कडकी ॥ बैसे कृतांतसी धडकी ॥ पाप जगावया जागा हुडकी ॥ जाहलीं रडकीं इतर तीर्थें ॥९॥अभिमान पळे सीमेबाहेरी ॥ प्रेम संचरे अंतरीं ॥ अश्रु स्त्रवती नेत्रीं ॥ विस्मय सुरनरां होतसे ॥१०॥पंढरीस संतांचा अखाडा ॥ रोग दरिद्र जाय पीडा ॥ देव दर्शन देतो रोकडा ॥ तुटे झगडा कर्माचा ॥११॥पंढरीस माझें नमन ॥ घालोनि संतांसी लोटांगण ॥ श्रीगुरुचे पाय पाहून ॥ अर्थ गीतेचा आरंभिला ॥१२॥द्वादश अध्यायीं भक्तीचा योग ॥ वदला स्वयें श्रीरंग ॥ क्षेत्रक्षेत्रज्ञ विभाग ॥ ज्ञानहि सांगे विख्यात ॥१३॥हरि म्हणे कुंतीपुत्रा ॥ जो ओळखे या क्षेत्रा ॥ कैसें रचलें जाणें सूत्रा ॥ ओळखे क्षेत्रज्ञ कोणतो ॥१४॥क्षेत्रक्षेत्रज्ञाचें ज्ञान नाहीं ॥ त्याचें देखणें व्यर्थ पाहीं ॥ पक्षी अंध उडे देहीं ॥ शाखा फळ दिसेना ॥१५॥उदरींच्या गर्भासीं ॥ बाहिरील व्यवसाय श्रुत नाहीं त्यासी ॥ मर्कटें घेतलें श्रीफळासी ॥ आंतील पदार्थ कळेना ॥१६॥क्षेत्रक्षेत्रज्ञांची ओळख ना होय ॥ ज्ञान त्याचें मानूं नये ॥ बहुत ऋषींचा निश्चय ॥ करितां तर्क फांकला ॥१७॥बहुतां पंथीं नुगवे गुंथीं ॥ जेवीं चक्षुहीना वाचवेना पोथी ॥ आतां मीच महामती ॥ आहे तैसें सांगतों ॥१८॥पंचभूतें अहंकार ॥ बुध्दि माया दशइंद्रिय साचार ॥ दशविषयांचा विकार ॥ मनासहित एकुणतीस ॥१९॥इच्छा द्वेष धृति चेतना ॥ सुख दु:ख सांगतां जाणा ॥ ही छत्तीस तत्त्वांची गणना ॥ क्षेत्र यासी म्हणावें ॥२०॥छत्तीस तत्त्वें मिळून ॥ यास देह म्हणावें जाण ॥ यास चालवी सांभाळून ॥ क्षेत्रज्ञ त्यासीं बोलती ॥२१॥क्षेत्रक्षेत्रज्ञ ओळखीसाठीं ॥ ज्ञान पाहिजे किरीटी ॥ ज्ञान थोर ती हतवटी ॥ वर्तणूकेची सांगतों ॥२२॥जयास सन्मानाची चाड नाहीं ॥ दंभाचार सांडिला देहीं ॥ लोभिया ऐसा अनुभव पाहीं ॥ जतन करी तो ज्ञानी ॥२३॥हिंसेसारिखें पाप नाहीं ॥ यालागीं कोणास दु:ख नेदी पाहीं ॥ विश्व आपुले अवयव पाहीं ॥ त्यानें केलें तें आपणची ॥२४॥सर्व जीवांसी कनवाळू ॥ मायबाप तैसा मवाळू ॥ सद्गुरुसारिखा दयाळू ॥ मानस रक्षी सर्वांचें ॥२५॥दुसरियाचे अपराध क्षमा करुन ॥ तयावरी दया करणें आपण ॥ हें क्षमेचें लक्षण ॥ उपद्रव सोसणें क्षितीसी ॥२६॥आर्जव करावया ऐसें ॥ पाणी सर्वांसी मिळे जैसें ॥ चोरा सावा समचि असे ॥ दीपप्रकाश पांडवा ॥२७॥ब्राह्मण शूद्र अनामिका घरीं गेली ॥ धेनु सारिखाचि पान्हा घाली ॥ फुलें कोणें एकें हुंगिलीं ॥ सुगंध वोपी सारिखा ॥२८॥पाहतांचि दर्पणासे ॥ सारिखें बिंबोनि दावी सर्वास ॥ आर्जवाची जाती ऐसी ॥ प्राण सखे विश्व हें ॥२९॥सद्गुरुसेवा करावी कैसी ॥ गंगा मिळे सिंधूसी ॥ किंवा कांता पतीसी ॥ अनुसरे सर्वस्वें ॥३०॥बाळकासी जैसी जननी ॥ चकोर लक्षी चंद्रालागोनी ॥ चातक मेधा लागूनी ॥ चकोर लक्षी चंद्रमा ॥३१॥अस्त पावल्या तरणीसी ॥ किरणें जाती त्यापरिसीं ॥ तेवीं सद्गुरुपासी ॥ सर्व वृत्ति लाविजे ॥३२॥दारा पुत्र कन्या धन ॥ प्रवृत्ति निवृत्ति शहाणपण ॥ देह गेह पंच प्राण ॥ करी अर्पण गुरुसी ॥३३॥गुरु तोचि तीर्थव्रत ॥ गुरु तोचि परमार्थ ॥ क्रिया कर्म कुळदैवत ॥ गुरुवांचोनि जाणेना ॥३४॥गुरु एक परब्रह्म ॥ ऐसा आचरला हृदयीं नेम ॥ गुरुचे ठायीं दृढ प्रेम ॥ गुरुविण मंत्र जपेना ॥३५॥गुरुनाम सर्वदा मुखीं ॥ पवित्र काया तेणें सुखी ॥ सर्वत्र पाहे गुरु कीं ॥ हे परम सेवा गुरुची ॥३६॥शुचि जैसा हिरा ॥ कीं सूर्यबिंबींचा गाभारा ॥ नातरी शुक्राचा तारा ॥ अथवा चंदन मैलागिरी ॥३७॥स्थिर तरी जेंवीं मेरु ॥ अढळ जैसा धुरु ॥ उभें असे ज्यापरी अंबरु ॥ बैसली धरा चळेना ॥३८॥मरो दारा पुत्र जावो धन ॥ बुडो संसार उठो अरिष्ट दारुण ॥ न सांडी भक्ति नव्हे कंपायमान ॥ आत्मनिग्रह या नांव ॥३९॥ऐशा वर्तणुकेच्या राशी ॥ ज्ञान वसे तयापासीं ॥ तैसेंचि वैराग्य मानसीं ॥ अद्भुत अंगीं असावें ॥४०॥विषय तितुका वमन ॥ विटे प्रपंची त्रासे मन ॥ उदासवृत्ति समाधान ॥ अहंकार दम उन्मळिला ॥४१॥तोडोनि जन्ममरणांसी ॥ जिंकोनियां मृत्यूसी ॥ पुढती जरा आणोनियां मानसीं ॥ सावध होय अनुतापें ॥४२॥वृध्दपण महा कठिण ॥ दमा खोकला कफाची दाटण ॥ वदन बोळकें दंत भग्न ॥ बधिर कर्ण चक्षु मंद ॥४३॥हात पडवळें पायांच्या नळ्या ॥ कांपे मान त्वचेवर सुरकल्या ॥ शिरा दिसती सढिल्या ॥ भके सैरा भलतेंचि ॥४४॥ऐसी पुढील अवस्था पाहोनि ॥ तरुणपणीं सावध होऊनि ॥ निवृत्तिपदातें साधूनी ॥ कल्याण करी जो आपुलें ॥४५॥जो देहीं गेहीं दारापुत्रीं उदास ॥ माझ्या ठायीं अर्पीं मानस ॥ जैसा कां पतिव्रतेस ॥ पतिविण दुजा नाठवे ॥४६॥एक अध्यात्मज्ञानावांचून ॥ दुसरा ध्यास न करी मन ॥ जेवीं श्वपचालागून ॥ ब्राह्मण स्पर्श करीना ॥४७॥आत्मविद्या सेवी सुधारस ॥ इतरविद्या मानी कांजी फोर्स ॥ अध्यात्मविद्येवांचोनि मानस ॥ काय चतुर जेवीं काग बक ॥४८॥जैसें सृगालाचें शहाणपण ॥ कीं वेश्येचें श्रृंगार लेणं ॥ तेलफणी घाली अंजन ॥ आंत दु:खें भरली असे ॥४९॥चंबु बाहेर सोज्वळ ॥ हृदयीं त्याच्या भरला मळ ॥ पाहतां बकाचें अंग ढवळ ॥ मन मलिन हिंसक ॥५०॥तैसें ज्ञान ज्यापुरुषास नाहीं ॥ त्याची ब्रह्मक्रिया व्यर्थ पाहीं ॥ जैसी कोल्हाटीण जाहली शिपाई ॥ शिरीं पागोंटें देह स्त्रियेचा ॥५१॥विधवेनें कुंकुम लाविलें ॥ चक्षुहीनें अंजन घातलें ॥ किंवा राधा करिती मुलें ॥ बोळ्याचे स्तन करोनी ॥५२॥एक आत्मज्ञानावांचून ॥ जें करावें तें मूर्खलक्षण ॥ त्यासीच म्हणावें अज्ञान ॥ ज्ञानहीन मतिमंद ॥५३॥आतां ज्ञेयाची जाती ॥ तेही परिसें गा सुमती ॥ जे सर्वांची शक्ती ॥ सर्वांत भरुन उरलीसे ॥५४॥श्रवणाचें श्रवण ॥ जो नयनाचे नयन ॥ जें घ्राणाचें घ्राण ॥ जो रसनेचा रस ॥५५॥तो त्वचेची त्वचा ॥ जो वाचेची वाचा ॥ जो व्यवसाय करांचा ॥ जेणें गमन पदांसी ॥५६॥जो मनाचें मन ॥ जो बुध्दि प्रकाशून ॥ चित्तातें चेतवून ॥ अहंकार उठे ज्यापासी ॥५७॥जे मतीचे मती ॥ जें अंत:करणीं स्फूरे स्फूर्ती ॥ जेणें चंद्रसूर्य प्रकाशती ॥ जेणें राहाटी सुराअसुरां ॥५८॥जेणें पृथ्वीसी आवरण ॥ जें उदकाचें जीवन ॥ जेणें वन्हीसी दाहकपण ॥ जेणें चलन वायूसी ॥५९॥जो आकाशाचा गर्भ ॥ जो आकाशाचा स्तंभ ॥ जो सर्वांठायीं स्वयंभ ॥ जो बिंबला सर्वांघटीं ॥६०॥आतां प्रकृतिपुरुष ॥ तोही दाविला विलास ॥ जो एकएकास ॥ न विसंबे क्षणभरी ॥६१॥तो पुरुष ती शक्ती ॥ तो दिवस ते राती ॥ तो निराकार ती आकारती होती ॥ तो ईश्वर ती माया ॥६२॥तो भ्रतार ती कांता ॥ तो अभोक्ता ही भोक्ता ॥ तो अकर्ता तिला कर्तव्यता ॥ तो निश्चळ ती चंचळ ॥६३॥ती बोलती तो मुका ॥ ती गुणमयी ती गुणातीत देखा ॥ ती नादबिंदु मातृका ॥ तो नि:शून्य निरामय ॥६४॥तो कांहीं न करी ती सर्व करी ॥ तो निद्रित ही जागृत संसारीं ॥ तो निर्व्यापार ती चराचर करी ॥ सृष्टीचा खटला चालवी ॥६५॥दुसरें त्यास कांहीं नसे ॥ तीस सर्व जग भासे ॥ त्यास कामक्रिया वर्ण नसे ॥ ती धर्माधर्म वाढवी ॥६६॥सूर्यास कोठें रात्र नसे ॥ रात्रीमाजी सूर्य नसे ॥ ब्रह्म पाहतां माया नसे ॥ मायेतें ब्रह्म दिसेना ॥६७॥त्या प्रकृती पुरुषांची खुणा ॥ जाणे तो पुरुष शाहणा ॥ तोचि ज्ञानियांचा देखणा ॥ द्वारकेचा राणा बोलिला ॥६८॥यापरी संपला प्रसंग तेरावा ॥ पुढती परिसा चौदावा ॥ मग हरि म्हणे पांडवा ॥ गुणनिधी बरवा तूं एक ॥६९॥आतां परिसें कुंतिसुता ॥ जो जाणे प्रकृतिपुरुषावस्था ॥ तोचि ज्ञानियांचा सविता ॥ इतर खदयोत देखणें ॥७०॥स्वर्ग नरक चारीयुगें जाणा ॥ जन्ममरणा चौर्यांशीं पतना ॥ पापपुण्यां गणना ॥ अज्ञानजनित जाणावी ॥७१॥उदयो पावल्या गभस्ती ॥ चंद्र नक्षत्रें लोपतीं ॥ तेवीं अद्वैतज्ञानदीप्ती ॥ ग्रासी पापपुण्यांसी ॥७२॥स्वर्गनरक जोंवरी ॥ जैसा स्वप्नीं राजा दरिद्री ॥ तैसा मी एक चराचरीं ॥ विश्वामाजी कोंदलों ॥७३॥शाखापल्लव एक वृक्ष ॥ तैसा मी स्वयंभ देख ॥ शर्करेचा खडा एक ॥ काय टरफल काढावें ॥७४॥माझे मित्र अवघे जन ॥ जनातीत मी निरंजन ॥ म्यांच आपणास बंधन ॥ कैसें केलें तें ऐका ॥७५॥शुकनळीकेच्या न्यायें ॥ मीच गुंतलों आहें ॥ तोही कैशा अन्वयें ॥ तूतें सांगों सुजाणा ॥७६॥म्यांचि धरिली कल्पना ॥ माया महत्तत्व जाणा ॥ ती प्रसवली पंचभूत त्रिगुणां ॥ केली रचना सृष्टीची ॥७७॥विराट हिरण्य अविकृत माया ॥ स्थूल सूक्ष्म कारण महाकारणराया ॥ यामाजी अविदया संचरोनियां ॥ गोविलें माते जीव म्हणे ॥७८॥त्यावर त्रिगुणांचे फांसे ॥ बळकट बैसले कैसे ॥ एकासी बांधिले तिघांसरसे ॥ सत्वरजतमानें ॥७९॥सत्व ओढी पुण्याकडे ॥ रज ओढी पापाकडे ॥ तम स्वतांचि करी गडबडे ॥ भोगवी डोंगर दु:खाचे ॥८०॥शांत क्षमाशीळ ॥ नम्र आणि प्रेमळ ॥ शास्त्रें संग्रहीं पुष्कळ ॥ करी संग संतांचा ॥८१॥हे सत्वगुणाची रीती ॥ ईश्वरभजनीं लागे मती ॥ आतां रजाची जाती ॥ तेही परिसे संज्ञा ॥८२॥लोभ आशा हांव मोठी ॥ मनीं विषयाची राहाटी ॥ रात्रंदिवस खेळे सोंगटीं ॥ पोथीचें पान ऐकेना ॥८३॥आळस निद्रा फार सुस्ती ॥ ही तामसाची प्रकृती ॥ दांडपट्टा घ्यावी कुस्ती ॥ उन्मत्त मद्यपी व्यसनी ॥८४॥सत्वगुणी सुखी राहे ॥ रजी विषयीं सोस वाहे ॥ तामस स्वतां मूर्ख आहे ॥ भलतेंच करी अन्याय ॥८५॥सत्वगुणी ज्ञानी मती फांके ॥ शास्त्र तितुकें ऐके घोके ॥ जे करावें तें विवेकें ॥ जेणें संतोष सर्वांसी ॥८६॥तळें मळें घरें बांधी ॥ मेळवी कुसंगाची मांदी ॥ टवाळी चेष्टा असत्यवादी ॥ करी निंदा संतांच्या ॥८७॥तामसी धड प्रपंची ना परमार्थी ॥ स्वार्थी न निराश चित्तीं ॥ करी कलहो अविचारउत्पत्ति ॥ धर्म अधर्म सुचेना ॥८८॥जो सत्वगुणाचे आचरणीं ॥ मृत्यु पावला प्राणी ॥ तो जन्म पावे मनुष्ययोनी ॥ पवित्र देह भगद्भक्त ॥८९॥जो रजोगुणाचे आचरणीं ॥ मृत्यु पावला प्राणी ॥ तो जन्म पावे मनुष्ययोनीं ॥ होय कैकाडी कोल्हाटी ॥९०॥जो तमोगुणीं निमाल्यावर ॥ होय श्वान सूकर वृश्चिक विखार ॥ तो भोगीदु:खाचे डोंगर ॥ ऐसा जन्म तो पावे ॥९१॥सत्वगुणास अमृतफळें ॥ रजोगुणास वृंदावन निपजलें ॥ तमाचें अंगीं झाड जाहलें ॥ कांचकुहिरी हिंगण ॥९२॥सत्वाची क्रिया स्वर्गप्राप्ती ॥ रजाचीं मनुष्यें अधम होतीं ॥ तमाचे नरका जाती ॥ एवं त्रिगुणावृत्ती निरुपिल्या ॥९३॥तिहीं माजी सत्व श्रेष्ठ ॥ जेणें पाविजे वैकुंठ ॥ दोघांस जन्म-मरणांचें तिहीं माजी सत्व श्रेष्ठ ॥ जेणें पाविजे वैकुंठ ॥ दोघांस जन्म-मरणांचें कचाट ॥ भोगितां दु:ख दारुण ॥९४॥यापरीं जाण त्रिगुणीं ॥ बंधन पावले प्राणी ॥ जो चवथा शुध्दसत्वगुणी ॥ तो ना फसे यामध्यें ॥९५॥जाणें मी अजरामर ॥ पुरातन अनादि अविचार ॥ विश्व माझाचि अलंकार ॥ ब्रह्मगुण कैंचा ॥९६॥सूर्य अंधारीं कोंडेल ॥ वायु कूपांत पडेल ॥ पाषाणाचें पोट दुखेल ॥ तै मज घडेल बध्दता ॥९७॥ऐसा जो जाणे आपणा ॥ तोचि कैवल्याचा राणा ॥ इतुकें वर्ततां जनार्दना ॥ प्रसंग चतुर्दश समाप्त ॥९८॥न करितां अभ्र रचिलें ॥ उदक नसतां मृगजळ संचलें ॥ सर्प नसतां रज्जूवर भासले ॥ तेवीं माया काल्पनिक ॥९९॥तीही मेघांची गर्जना ॥ नगारा वाजवितां दिसेना ॥ स्वप्नीं आलिंगी कामिना ॥ सत्य किंवा असत्य ॥१००॥यापरी उमजें वीरेशा ॥ नसतां मायेचा उमटला ठसा ॥ तिणें घातलासे वळसा ॥ वेड भरविलें सुरनरां ॥१॥ना कल्पिता उठे स्वप्न ॥ तो ऊर्ध्वमूळ वृक्ष जाण ॥ महत्तत्व आलें अज्ञान ॥ अहंकार कोंभ उदेला ॥२॥पंचभूतें त्रिगुण ॥ आंत लोक निघाले जाण ॥ चौखाणीं शाखा पसरोन ॥ चौर्यांशीं लक्ष पत्रें कीं ॥३॥सत्वगुणाची फळें गोमटीं ॥ रजोगुणाचीं तुरटीं ॥ तमोगुणाचीं कुहिलीं ॥ गळती कुहिटी कनिष्ठ ॥४॥सुर असुर निराचर ॥ गणगंधर्व विद्याधर ॥ जळचर वनचर खेचर भूचर ॥ पशुपक्षी उरगादी ॥५॥चारी वर्ण अठरा पगड याती ॥ अनेक कित्येक फांटे असती ॥ असंख्य सृष्टीची उत्पत्ती ॥ किती गणती सांगावी ॥६॥सांगीतला विस्तार वीरा ॥ हा मृगजळींचा पसारा ॥ निजेल्या स्वप्नाभास खरा ॥ जागृतीस मिथ्यां कीं ॥७॥जो बैसे सूर्याचे रथीं ॥ त्याते दीपाची नलगे गुंती ॥ ज्ञान उदेल्या गभस्ती ॥ अविदयाराती मग कैंची ॥८॥काढोनि घेतां नये जळांतील बिंबी ॥ घेऊं नये छायेसी झोंबी ॥ खरडूं नये काजळ नभीं ॥ समीर मोजितां मूर्खता ॥९॥अगा आपुली कल्पना ॥ तोचि संसारवृक्ष जाणा ॥ वांझपुत्राचा मेहुणा ॥ रुसला कोण समजावी ॥११०॥अगा बागुलचि आला नाहीं ॥ त्यासी मारणें तें काई ॥ पोटीं पुत्र जन्मलाचि नाहीं ॥ स्नुषा शोधितां मूर्खता ॥११॥ब्रह्मीं दुसरें जाहलेंचि नाहीं ॥ त्याचा विचार पुससी काई ॥ ऐसें ज्ञान ज्याचें हृदयीं ॥ त्यासीं कैंचें भवभय ॥१२॥केली समुद्रावर पेरणी ॥ धान्य निपजेल कोठूनी ॥ वैश्वानरीं कर्पूर ठेऊनी ॥ पुढती व्यवहारा येईल काय ॥१३॥मार्तंडासि शर्वरी पुसतां ॥ येऊं पाहे मूर्खता ॥ चंद्रासि उष्मा मागतां ॥ मिळेल काय विचारीं ॥१४॥मी अमूप अपार निरंजन ॥ शुध्द स्वानंद चैतन्यधन ॥ चंद्रसूर्याचे नयन ॥ पाहा दिपती मजकडे ॥१५॥कोटीवन्हींच्या प्रकाशासी ॥ नये नखाग्रींच्या तेजासी ॥ अलक्ष असे ब्रह्मादिकांसी ॥ तें माझें परमधाम ॥१६॥आतां माझा अंश जीव ॥ जैसा समुद्रीं बुदबुदांचा उद्भव ॥ देह इंद्रियांचा समुदाव ॥ माझा म्हणोनी नाचती ॥१७॥दरडीवर ठाकोनि पाहे सलिलीं मी ॥ बुडलों देई आरोळी ॥ ऐसी पावोनि भुली ॥ जीवदशा ती नांव ॥१८॥यालागीं ज्ञानाचा उल्लेख ॥ पावे तोचि उत्तमलोक ॥ अज्ञानें वधावले देख ॥ जेवीं मीन शोधी उदकातें ॥१९॥अगा निजलिया जागलिया ॥ बैसलिया चालतिया ॥ निमालिया आणि जीवितया ॥ ज्ञान अज्ञान तो पाड ॥१२०॥अगा जन्मास जीव आला ॥ तो कोणीं दृष्टीं देखिला ॥ अथवा निमोनियां गेला ॥ त्यासि कवणें लक्षिलें ॥२१॥डबक उदकें भरला ॥ तेथें चंद्र दिसे बिंबला ॥ उदक आटतां अदृश्य जाहला ॥ इतुकेन नाश कल्पावा ॥२२॥मी गंधरुपें पृथ्वीतें ॥ म्हणोनि आवर असे तीतें ॥ रसरुपें प्रवेशलों जळातें ॥ यास्तव लागे स्वादिष्ट ॥२३॥रुप अंशें तेजी देख ॥ म्हणोनि दिसे लखलख ॥ पवनीं प्रवेशलों सम्यक ॥ यालागीं प्राण सर्वांचा ॥२४॥नभांत मी हृषीकेशी ॥ यालागीं सर्वांत वस्ती त्यासी ॥ चंद्रसूर्यांच्या तेजांसी ॥ माझ तेजें प्रकाशती ॥२५॥मी सूर्य होऊनि तपें ॥ मी चंद्र होऊनि दिपें ॥ पर्जन्य होऊनि झरपें ॥ करी सुकाळ धान्याचा ॥२६॥सर्वांघटीं जठराग्नी ॥ होऊनि पचवीं चतुर्विध अन्नीं ॥ हे अवघी माझी करणी ॥ मजविण दुजा असेना ॥२७॥मी सर्वांचें अंतरीं ॥ तुझ्या मीपणामाझारीं ॥ मीच गा सूत्रधारी ॥ जड तेंही मीच कीं ॥२८॥यावरी तीनप्रकार ॥ क्षर आणि अक्षर ॥ दोहींपरीस पर ॥ उत्तम पुरुष बोलिजे ॥२९॥मायामहत्तत्वापासोन ॥ पंचभूतें आणि त्रिगुण ॥ क्षेत्र उर्ध्व मूळ गवसून ॥ क्षर पुरुष जाणावे ॥१३०॥स्वर्ग नरक पाप पुण्य़ ॥ चार खाणी चौर्याशीं जमा धरुन ॥ पिंडब्रह्मांड अविदयाबंधन ॥ हा विस्तार क्षराचा ॥३१॥ज्यास म्हणावें अक्षर ॥ तो कुटस्थ प्रकार ॥ जैसा निद्रित नर ॥ जिवंत परी बोलेना ॥३२॥जैसा नपुंसक प्राणी ॥ नसे स्त्रीपुरुषांचें मिळणीं ॥ किंवा सिंधूचें पाणी ॥ नासेना उपयोगा नये ॥३४॥ना शुध्दपणें निर्गुणीं मिळे ॥ ना प्रपंचीं भेसळे ॥ उगाच कारणदेहांत लोळे ॥ अक्षर त्यास म्हणावें ॥३५॥उत्तम दोहींहून वेगळा ॥ जैसा बाप नातळे लेंकींला ॥ किंवा वन्हिपाण्यांला ॥ आकाश स्पर्श करीना ॥३६॥साधु नातळे पुण्यपापां ॥ ध्रुव न करी प्रदक्षिणेच्या खेपा ॥ प्रभंजन धांवत न भरे धापा ॥ तेवें दोहींहून उत्तम ॥३७॥मृगज काय मार्तंडा बुडवील ॥ तेवीं उत्तम प्रपंचीं गवसेल ॥ दर्पणांत पुरुष अडकेल ॥ हें केवीं घडों शकेगा ॥३८॥महाप्रळयीं कोण पुसे नदनदी ॥ अस्त उदय महातेजीं शोधी ॥ तेवीं उत्तमाच्या उदयामधीं ॥ क्षर अक्षर दिसेना ॥३९॥तोचि गा उत्तम पुरुष ॥ पवित्र जगन्निवास ॥ जेथें असेना आभास ॥ नसे लेश द्वैताचा ॥१४०॥तोचि जाण गा परमात्मा ॥ जो विश्वाचा आत्मा ॥ यावरी बोलावयाची सीमा ॥ उरली नाहीं सांगावया ॥४१॥यापरी उत्तमपुरुषाची मात ॥ मुखें वदला श्रीअनंत ॥ ऐकोनि पार्थ मनांत ॥ अष्टभावें निवाला ॥४२॥अपूर्व उपदेशाची हतवटी ॥ देवें निवेदिली किरीटी ॥ अर्थ पाहोनि धूर्जटी ॥ तोही माथा डोलवी ॥४३॥वेदांसि न सांगावें गोष्टी ॥ तो अर्थ आणिला गीतेच्या पोटीं ॥ मायबाप जगजेठी ॥ पाठी थापटी पार्थाची ॥४४॥मग अवलोकूनी अर्जुन ॥ कृष्णें दीधलें आलिंगन ॥ म्हणे तुझें समाधान ॥ जाहलें कीं सांग किरीटी ॥४५॥अर्जुन म्हणे यापरता ॥ उतराई व्हावया कैंची योग्यता ॥ क्षीरसिंधूसि कांजी अर्पितां ॥ कवण्या उचिता येईल ॥४६॥त्वां दीधलें मोक्षराज्यासी ॥ तनुमन ठेविला प्राशितां रोगियास ॥ केवीं नकोसें होईल ॥४८॥धेनु नसावी जवळ ॥ वत्सा मनोदय होईल ॥ चंद्रकिरणें द्रवतां कोमल ॥ वीट मानी चकोर ॥४९॥तुझिया कृपेचा लागला झरा ॥ पुरे कोण म्हणेल दातारा ॥ या उत्तरें शारंगधरा ॥ बहु संतोष वाटला ॥१५०॥श्रीकृष्णब्रह्मसागरीं ॥ हेलावे कृपेची प्रेमलहरी ॥ त्याचा तुषार श्रोतयांवरी ॥ स्वानंदाचा होतसे ॥५१॥तोचि प्रसंग गीतेचा ॥ निवेदी शेषबिंदु तीर्थाचा ॥ शहामुनि सेवक संतांचा ॥ सद्भावें तुळसी पत्र वाहिलें ॥५२॥इति श्रीसिध्दांतबोधग्रंथे अध्यात्मनिरुपणतत्वसारनिर्णये अष्टत्रींशत्तमोध्याय: ॥३८॥ अध्याय ॥३८॥ ओव्या ॥१५२॥ श्रीकृष्णार्पणमस्तु ॥ N/A References : N/A Last Updated : November 24, 2020 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP