अध्याय पांचवा - श्लोक २१ ते ३०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

गोपित: सर्वशास्त्राणां विस्तर: कथ्यते मया ॥
सर्वेषामधिकं तत्वं द्दष्टांतरं च द्दश्यते ॥२१॥
सर्व शास्त्रांतील गुह्यार्थ मी सांगतो त्यामुळे सर्वांहून अधिक तत्व व प्रसिद्ध अशा या द्दष्टाहून जे भिन्न द्दष्ट तत्व ते दिसेल ॥२१॥
ज्ञातव्यमंतरंगस्थं बहिरंगं च पश्यति ॥
प्रत्यक्षं चैव पश्यंति द्दष्टांतरं च द्दश्यते ॥२२॥
अंतरंगात तत्व समजण्याला योग असताना अन्यजन बहिरंग तत्व पहातात. प्रत्यक्ष दिसेल त्यांस मान्य होते; परंतु आमचा
उपदेश अंतरंगतत्व दाखवितो ॥२२॥
प्रथमं नादलुब्धश्च बिंदूश्वैव तदुच्यते ॥
तृतीयं च कला प्रोक्तं ज्योतिरुपं च पश्यति ॥२३॥
साधक प्रथम-नादलुब्ध, नंतर बिंदु, मग कला व शेवटी ज्योतिरुप पहातो ॥२३॥
अकारं नादरुपं च ह्युत्कारं बिंदूरुपकं ॥
मकारं तु कला पोक्ता ओंकारं ज्योतिरेव हि ॥२४॥
अकार नादरुप असून उकार बिंदूरुप आहे आणि मकार कलारुप असून ॐकार स्वत: ज्योति: आहे ॥२४॥
लुब्धो नागस्वरै: सर्पो घंटानादै: कुरंगक: ॥
पतंगो लुभ्यते दीपैर्मनो नादेन लुभ्यते ॥२५॥
सुरावर जसा नाग लुब्ध होतो अथवा हरिण घंटानाद अथवा पतंग दीपज्योतीवर लुब्ध होतो त्याचप्रमाणे मन हे ॐकार नादावर आसक्त होते ॥२६॥
पतंगमीनहरिणगजालयाप्यातक्रमी: ॥
इंदिर्याणि मनुष्यरुप भज्यंते किपु चिंतया ॥२६॥
पतंग, मासा, हरिण, हत्ति व भ्रमर हे पांच प्राणी अनुक्रमें - रुप,रस, शब्द, स्पर्श आणि गंध या पांच विषयांकरिता आपले जीव देतात;
परंतु मनुष्याला त्या पांचही विषयांचा भोग एकट्याला घेण्याचीं इंद्रियरुप साधनें असतां-त्यांचे नियमन न केल्यास त्यांचे कसे
काय होईल याबद्दल फारसा विचार करीत बसण्याचे कारणच नाही ॥२६॥
कुहूश्च नर्मदा ज्ञेया तापी स्याच्छंखिनी तथा ॥
गांधारी चापि कावेरी वारुणी गौतमी तथा ॥२८॥
कुहु हीच नर्मदा, शंखीनी हीच तापी,गांधारी हीच कावेरी, वारूणी हीच गौतमी ॥२८॥
ताम्रपर्णी सुबानाडी सिंधुर्ज्ञेया च हस्तिनी ॥
गोमत्यतंबुषा चैव पूर्णा पूर्णपयस्विनी ॥२९॥
चक्षुषा हीच तम्रपर्णी, सिंधु हीच हस्तीनी आणि पूर्णपयस्विनी हीच गोमत्यलंबुषा जाणावी ॥२९॥
इति नाडी नदी प्रोक्ता शरीरे वर्तते सदा ॥
पवनं च तुरीयं च सर्वत: स्नानमुच्यते ॥३०॥
एणें प्रमाणे नाड्यांच्या ठिकाणी नद्यांची कल्पना करावी आणि त्या नद्या आपल्या शरीरांत आहेत असे समजावे. योगमार्गाने
जाऊ लागले असतां आत्म्याचे तुर्य-साक्षिस्वरूप होते आणि सर्व तीर्थांचे स्नान घडते ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP