मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कपिल गीता| श्लोक ३१ ते ४० कपिल गीता श्लोक १ ते १० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ७० श्लोक ७१ ते ८० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६६ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० अध्याय तिसरा - श्लोक ३१ ते ४० कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात. Tags : gitakapilकपिलगीता अध्याय तिसरा - श्लोक ३१ ते ४० Translation - भाषांतर एवं ब्रम्हात्मसंकाशं वर्धयेज्जगदुद्भवम् ॥प्रथमं तारकं ब्रम्ह द्वितीयं दण्डरुपकम् ॥३१॥या प्रमाणे हे ब्रम्ह सर्व जगाला उत्पन्न करिते पहिले ब्रम्ह तारक असून दुसरे दंडक आहे ॥३१॥तृतीयं कुण्डलाकारं चतुर्थमर्धचन्द्रकम् ॥पंचमं बिन्दुसंकाशं प्रणव: शून्य्ररुपकम् ॥३२॥तिसरे कुंडलाकार असून चवथे अर्धचंद्रक आहे व पांचवे बिंदुरुप आहे. स्वत: प्रणव तर शून्यरुप आहे ॥३२॥अव्ययं च्तद्भुतं ब्रम्ह सहजाव्यक्तरुपकम् ॥अव्यक्तोद्भवमाकाशमाकाशान्मारुतस्तया ॥३३॥असे हे जे अव्यय, अद्भुत, अच्युत आणि सहजाव्यक्तरुपब्रम्ह त्यापासून आकाश उत्पन्न होऊन, आकाश वातोत्पत्ति होते ॥३३॥मारुताज्जायते तेजस्तेजसापस्तथैव च ॥अद्भधश्च जायते पृथ्वी पृथ्व्या विश्वं च जायते ॥३४॥वायुपासून तेज आणि तेजापासून पाण्याची उत्पत्ती होऊन, पाण्यापासून पृथ्वी व पृथ्वीपासून सर्व भूतमात्रांची उप्तत्तीहोते असे जाणावे ॥३४॥ घिश्वगं ब्रम्ह ज्ञातव्य़ं क्षराक्षरमनामयं ॥एवं ब्रम्ह जगदधाप्तं न ज्ञातं पशुमानवै: ॥३५॥याप्रमाणे ते क्षराक्षररूप ब्रम्ह विश्वव्यापी व निरुपद्र्व असून, त्याचे ज्ञान पशुतुल्य मानवांसही होत नाही ॥३५॥सुज्ञार्त सर्वमाचार्यै: सबाह्याभ्यन्तरोदितम् ॥द्दश्यनाशे परं ब्रम्ह चाखण्डमव्ययं स्थितम् ॥३६॥आजपर्यंत होऊन गेलेले व सध्याही जे आचार्यश्रेष्ठांनाच ते सबाह्याभ्यंतर असलेले तत्व- द्दश्याच नाश झाला म्हणजेअखंड व अव्यय परब्रम्ह अवशिष्ट रहाते, हे पूर्णपणे समजलेले असते ॥३६॥एवं ते दीक्षिता लोका: सर्वदेहवर्जिता: ॥दीक्षया ब्रम्हरुपाश्च तत्वज्ञास्ते व्यवस्थिता: ॥३७॥अशा त्या आचार्यास शरण जाऊन त्याची दीक्षा घेतली असता सर्व संदेहांचा नाश होऊन ते स्वत: ब्रम्हरुप व तत्वज्ञ होतात ॥३७॥पार्वत्युवाच ।कथं मात्रा: कथं देव: कथं वर्णा वद प्रभो ॥पृथकपृथड्मातृकायां के के वर्णा: प्रतिष्ठिता: ॥३८॥पार्वती म्हणते:- प्रभो, मात्रा कोठे व कशा असतात, देव आणि वर्ण कोठें असतात व निरनिराळ्या मात्रांतवर्ण कसे आहेत तेअ आतां मला सांगा ॥३८॥ईश्वर उवाच ।तारकं मूलभूतं स्याद्काराख्या च मातृका ॥ब्रम्हा तु दैवतं प्रोक्तं रक्तवर्णविराजितम् ॥३९॥ईश्वर म्हणतात:- तारक मूलभूत असून त्याची मात्रा अकारात्मक आहे ॥३९॥पृथग्वर्ण तथा देवि रक्तपीतं सुशोभितम् ॥त्रयं सार्धं स्वहस्तानां प्रगाणं दहलक्षणम् ॥४०॥हे देवी, रक्तपीत हा त्याचा स्वतंत्र वर्ण असून, तो फार सुशोभीत आहे व प्रत्येकाच्या हाताने साडेतीन हात हे प्रत्येकाच्या देहाचे प्रमाण आहे ॥४०॥ N/A References : N/A Last Updated : December 31, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP