अध्याय तिसरा - श्लोक ५१ ते ६०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

इदं सर्वशिर: पीतशिखं केवलराजितं ॥
पीत: शिखाबिंदुरत्र ब्रम्हसायुज्यकारक: ॥५१॥
हे सर्व श्रेष्ठ ब्रम्ह पीतवर्णाच्या शिखरे भूषित असून, ब्रम्हसायुज्य देणारा जो पीतवर्ण शिखा बिंदू तो यांत झळकत असतो ॥५१॥
बिंदुगर्भस्य मध्यस्थं शुद्धश्वेतं सुलक्षणं ॥
सोऽहं मात्रा मुख्यबीजं सर्वांतर्गर्भचारि यत्‍ ॥५२॥
त्या बिंदुच्या मध्यभागी- शुद्ध ,श्वेत, सुलक्षण आणि सर्वांत अंतर्भागात असणारे ‘सोऽहं हे मुख्य बीज असते ॥५२॥
सोऽहंबीजस्य मध्यस्थ: श्रीराम: परमो महान्‍ ॥
सोऽहं राम इदं ज्ञात्वा अत ऊर्ध्वं न किंचन ॥५३॥
या ‘सोऽहं’ बीजाच्या मध्यभागी परम आणि महान्‍ आत्मा जो श्रीराम तो असून, तोच मी हें सर्व चराचर आहे
असे जाणल्यावर शिल्लक काहीच रहात नाही ॥५३॥
पार्वत्युवाच ।
सोऽहं तारकब्रम्ह्यैव राममंत्रं वद प्रभो ॥
एतच्छ्र्वणमात्रेण कृतकृत्या‍ऽस्मि सर्वदा ॥५४॥
पार्वती म्हणते :- ‘सोऽहं’ हेच तारक ब्रम्ह ’राममंत्र’ आहे तर तो आतां मला सांगा म्हणजे त्याच्या श्रवणाने
मी नेहमी कृतकृत्य होईन ॥५४॥
ईश्वर उवाच ।
न देयं यस्य कस्यापि प्राणा: कंठगता यदि ॥
देयं सद्भक्तियुक्ताय शांताय समचेतसे ॥५५॥
ईश्वर म्हणतात :- हा मंत्र प्राण जाण्याची वेळ आली तरी वाटेल त्याला देवू नकोस तर फक्त - सद्भक्तियुक्त,शांत आणि
सर्वांभूति समान द्दष्टि ठेवणारा जो असेल त्याला दे ॥५५॥
गुरुभक्तिरिता नित्यं विरक्तो य: समोहित: ॥
भक्तिर्ज्ञानं वितक्तिश्व ह्यदि तिष्ठेत्सनातनी ॥५६॥
नेहमी गुरुभक्तिरत, विरक्त, स्माहितचित्त असा जो असतो त्याच्यांच ह्यदयांत - भक्ति,ज्ञान आणि विरक्ति ही नेहमी राहतात ॥५६॥
तस्मै देयं च देवेशि अन्यथा न प्रकाशयेत्‍ ॥
प्रकाशितं च दुष्टेऽपि निष्फलं जायते ध्रुवं ॥५७॥
म्हणून हे देवि, अशास हा मंत्र द्यावा; इतराला देऊ नये. कारण, अनधिकार्‍याला जर दिला तर तो खात्रीने निष्फल होतो ॥५७॥
अथ मंत्र प्रवक्ष्यामि मोक्षदं सर्वदेहिनां ॥
ॐद्वंस:सोहं तथा देवि इत्यादौपाठ्येत्सुधी: ॥५८॥
आता, सर्व देह धारण करणार्‍यांना मोक्ष देण्याला मंत्र तुला सांगतो. ‘ॐ हंस: सोऽहं’ असे हे दोन्ही मंत्र
घेणार्‍याकडून म्हणवावे ॥५८॥
पश्चाच्छ्रीरामरामाय नमश्वैवाभिनिश्वितं ॥
एवं च तारकं ब्रम्ह राममंत्रमिति स्मृतं ॥५९॥
नंतर ‘श्रीराम रामायनम:’ असा उच्चार करण्यास त्याला सांगावे. याप्रमाणे हा राममंत्र तारक ब्रम्ह आहे असे सांगितले आहे ॥५९॥
अथ मंत्राधिकारस्तु सर्वस्याऽत्र न संशय़: ॥
ब्राम्हण: क्षत्रियो वैश्या: शूद्रो वा ह्यंत्यजोऽपि वा ॥६०॥
ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र अंत्यज या सर्वांस ह्या मंत्रानुग्रहाचा अधिकार आहे यांत संशय नाही ॥६०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP