मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|कपिल गीता| श्लोक २१ ते ३० कपिल गीता श्लोक १ ते १० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ३५ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ७० श्लोक ७१ ते ८० श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० श्लोक ३१ ते ४० श्लोक ४१ ते ५० श्लोक ५१ ते ६० श्लोक ६१ ते ६६ श्लोक १ ते १० श्लोक ११ ते २० श्लोक २१ ते ३० अध्याय तिसरा - श्लोक २१ ते ३० कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात. Tags : gitakapilकपिलगीता अध्याय तिसरा - श्लोक २१ ते ३० Translation - भाषांतर कुण्डल्यं दक्षिणे भागे अर्धचन्द्रं तथोत्तरे ॥बिन्दुरुर्ध्वदिशि प्रोक्त: प्रणवे पंच वै दिश: ॥२१॥कुडल्य दक्षिणेकडे असून उत्तरेकडे अर्धचंन्द्र आणि बिंदु उर्ध्व दिशेला असतो. याप्रमाणे प्रणवांत पांच दिशा असतात ॥२१॥एवं देवं हि चात्मानं विज्ञाता स विचक्षण: ॥नैऋत्य तारकाकारमीशान्यं दण्डकस्तथा ॥२२॥या प्रमाणे देवाला व आत्म्याला जाणणारा पुरुष फारच विचक्षण होय. नैऋत्य दिशा तारकाकारक असून ईशान्य दिशा दंडक आहे ॥२२॥कुण्डल्यमग्निदिक्चैव वायव्यामर्धचन्द्रकम् ॥बिन्दुश्वाधो दिशा प्रोक्ता प्रणवे पंच वै दिश: ॥२३॥अग्नेय दिशा कुंडल्य असून वायव्य दिशा अर्धचंन्द्र आहे आणि अधरदिशा बिंदुमय आहे. याप्रमाणे प्रणवांत राहिलेल्या पांच दिशांचा अंतर्भाव ही होतो ॥२३॥सर्वाकारमिहोच्येत सर्वगं सर्वतोमुखमऽ ॥तारकं सद्योजास्ताय वामदेवाय दण्डकम् ॥२४॥हा ॐकार सर्वाकार, सर्वगामी आणि सर्वतोमुख असून, तारक हेंच त्याचे समोजात मुख आणि दंडक वामदेव आहे ॥२४॥कुण्डल्यं तत्पुरुषाय ईशानायार्धचन्द्र्कम् ॥अघोरेभ्यो बिन्दुरिति प्रणवे मुखपच्चकम् ॥२५॥कुंडल्य तत्पुरुष अर्धचंद्र ईशान आणि बिंदू हे अधोरमुख होय. याप्रमाणे प्रणवाची पांच मुखे आहेत ॥२५॥विश्वावस्थां समाह्यत्य विश्वभोगपरायण: ॥तारकं चैव ऋग्वेदो यजुर्वेदो हि दण्डकम् ॥२६॥विश्वावस्था व्यापून, तो सर्व भोग भोगतो. तारक हाच ऋग्वेद असून, दंडक यजुर्वेद आहे ॥२६॥कुण्डल्यं सामवेदोऽयमर्धचन्द्रो ह्यथर्वण: ॥बिन्दुश्व सूक्ष्मवेदाऽयं प्रणवो वेदबीजकम् ॥२७॥कुंडल्य सामवेद, अर्धचंद्र अथर्वण वेद, विंदु सुक्ष्म वेद आणि प्रणव हा वेदबीज होय ॥२७॥क्षरं च अक्षरो देव: कूटस्थात्मा च क्षत्रवित् ॥अध: शून्यं तारकं च ऊर्ध्वशून्यं च दण्डकम् ॥२८॥ते क्षराक्षराला व्यापणारे कूटस्थ वीजच क्षेत्रज्ञ होय.खालील शून्य आहे. तारक असून वरील शून्य दंडक होय ॥२८॥कुण्डल्यं मध्यशून्यं च सर्वश्य़ून्यार्धचन्द्रकम् ॥बिन्दुश्वैव महाशून्यं प्रणवो विश्वतोमुख: ॥२९॥मधले शून्य कुंडल्य असून सर्वशून्य अर्धचंद्रक आहे आणि बिंदु हे महाशून्य आहे. याप्रमाणे प्रणव विश्वतोमुख आहे ॥२९॥शून्यातीत: परात्परो अक्षरं ब्रम्ह उच्यते ॥प्रणव: पररुपोऽपं कारणं ब्रम्हधारणम् ॥३०॥शून्यांतील प्रणवाला परात्पर व अक्षर ब्रम्ह म्हणत प्रणव पररुप असून ब्रम्हाचा साक्षात्कारच आधार आहे व ब्रम्हरुपाने सर्वांचे कारण आहे ॥३०॥ N/A References : N/A Last Updated : December 31, 2017 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP