अध्याय चवथा - श्लोक ४१ ते ५०
कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.
त्रिषु धामसु यो भोगो भोक्तो भोग्यं च यद्भवेत् ॥
तेभ्यो विलक्षण: साक्षी चिन्मात्रोऽहं सदाशिव: ॥४१॥
यावरील तीन अवस्थांमध्ये- भोग, भोगाच आणि भोग्य जो आहे तापेक्षा विलक्षण असलेला चिन्मात्र साक्षी असा मीच सदाशिव
आहे असे ज्ञानी जाणतो. ॥४१॥
एको देव: सर्वभूतेषु गूढ: सर्वव्यापी सर्वभूतांतरात्मा ॥
सर्वाध्यक्ष: सर्वभूताधिवास: साक्षी चेता केवलो निर्गुणश्च ॥४२॥
सर्व भूतांत गूढ असलेला एकच देव असून तो सर्वव्यापी आणि सर्व भूतांचा अंतरात्मा आहे. तो सर्वाध्यक्ष असून सर्वांचा आधार
आहे. आणि तो सर्वसाक्षी असून निव्वळ निर्गुण आहे ॥४२॥
पिंगला द्वादशादित्या ईडेंदु: षोडशांशभाक् ॥
पंचान्त:करणानि स्यु: प्राणानां पंचकं तथा ॥४३॥
पिंगला नाडी हे द्वादश दिवाकर असून इडा ही षोडशलांच चंद्र होय. अंत:करणे पांच असून प्राणाचेही पांच भाग आहेत ॥४३॥
ज्ञानेंद्रियाणि पंचैव पंच कर्मेंद्रियाणि वै ॥
विषया: पंच वै प्रोक्ता विकल्पानां च पंचकं ॥४४॥
ज्ञानेंद्रिये पाच असून कर्मेंद्रियेही पांचच आहेत. विषय पांच आणि विकल्पही पांचच आहेत. ॥४४॥
विकारा: षण्मतास्तेन देहस्यात्मप्रवर्तनं ॥
एवं गुणास्तु सर्वत्र कलाकाष्ठाचतुर्थकं ॥४५॥
विकार सहा असून ते आत्म्याकडून देहाला प्रवृत्त करतात. हे गुण परिणाम सर्व चराचर पदार्थात असतात. ॥४५॥
इक्षुदंडे शर्करा च श्रीखंडे च सुवासितं ॥
क्षीरे यथाऽऽज्यं प्राप्तव्यं तिले तैलं तथाऽऽत्मनां ॥४६॥
उसाच्या पोटात जशी साखर, चंदनात जसा सुगंध, दुधांत जसे तूप आणि तिळांत जसे तेल त्याचप्रमाणे
वस्तुमात्रांत आत्मा आहे ॥४६॥
अभ्यासेन विनाऽप्राप्यो गुरुवाक्येन निश्चित: ॥
स्वात्मा च ह्यदि पद्मे हि विज्ञेयो ज्योतिरात्मक: ॥४७॥
त्या आत्म्याचे दर्शन अभ्यासाशिवाय होणे शक्य नाही, म्हणून गुरुवचनावर पूर्ण विश्वास ठेवून, अभ्यासानें आपल्या
ह्यकमलांत असलेला ज्योति:स्वरूप आत्मा ओळखावा ॥४७॥
प्रथमं तु शिरापद्मं नेत्रपद्मं द्वितीयकं ॥
तृतीयं कर्णपद्मं च मुखपद्मं चतुर्थकं ॥४८॥
पहिले शिर:कमल, दुसरे नेत्रकमल, तिसरे कर्णकमल व चवथे मुखकमल ॥४८॥
पंचमं करपद्मं वै षष्ठं चरणपद्मकं ॥
सप्तमं नाभिपद्मं च ह्यत्पद्मं चाष्टंमं स्मृतं ॥४९॥
पांचवे हस्तकमल, सहावे चरणकमल, सातवे नाभिकमल आणि आठवें ह्यत्कमल, अशी अष्टकमलें सांगीतली आहेत ॥४९॥
अष्टपद्मात्परं ब्रम्ह सूक्ष्मं ह्यदयपंकजं ॥
चक्रातीतं परस्थानं सूक्ष्ममोंकारसंज्ञितं ॥५०॥
या आठही कमलाहून श्रेष्ठ असे ॐकारसंज्ञक सूक्ष्म ह्यदय कमळाचे आधारस्थान चक्रातीत आणि अति सूक्ष्म ब्रम्ह आहे ॥५०॥
N/A
References : N/A
Last Updated : January 01, 2018
TOP