अध्याय चवथा - श्लोक ५१ ते ६०
कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.
ह्यत्पन्नकर्णिकामध्ये शुद्धविज्ञानतत्परं ॥
अंगुष्ठमात्रममलं पश्पंत्येकांतमीश्वरं ॥५१॥
ह्यदयकमलाच्या कर्णिकेत शुद्ध, विज्ञानपर, अंगुष्ठमात्र निर्मल असा सर्वव्यापी ईश्वर असतो त्याला चित्तवृतीच्या विरोधाने पहावे॥५१॥
रात्रौ स्थूलं च विश्रांतं मध्ये दीपस्य स्थापनं ॥
सार्धहस्तत्रिकच्छेद्यं तत्र तिष्ठेच्च लोकयन् ॥५२॥
रात्री या साडेतीन हात लांबीच्या स्थूल देहांत अगदी पुरो भागी स्थापिलेल्या मोठ्या व शांत आलज्योतिमय दीपास
पहात रहावे॥५२॥
लोक्यमानस्य दीपस्य मध्ये नीलं च द्दश्यते ॥
नीलमध्ये तथा पश्येद्यो वै द्रष्टा स उत्तम: ॥५३॥
या दीपाकडे पाहत राहिले असता त्यांत जो एक निलबिंदू दिसू लागतो त्याच्याचकडे बघत रहावे असे जे करतो
तोच उत्तम द्र्ष्टा होय ॥५३॥
तत्नैव पश्यतो यस्य भूयात् सोंतर्लक्षी तदोच्यते ॥५४॥
त्या नील बिंदूतच लक्ष स्थिर करावे. नेत्रांचे विषान्मेलनही करू नये. अशी ज्या दृष्टी स्थिर झाली तो अंतर्लक्षी
असे म्हटला जातो ॥५४॥
अंतर्लक्ष्यविहीनस्य बहिर्लक्ष्यं निरर्थकं ॥
लक्ष्यालक्ष्यस्य वै लक्ष्यलक्षितं स्वयमात्मनि ॥५५॥
जो अंतर्लक्षी नाहे त्याचे बहिर्लक्ष फुकट आहे. लक्ष्याचा विषय न होणारे असे जे ब्रम्ह ते एकाग्रचित्तांत आपोआप
लक्ष्यलक्षित होते ॥५५॥
यथा वारि मरुद्भतं नानाकारं विलोक्यते ॥
तथैव कल्पना यस्य चिद्ब्रम्हणि स मुह्यति ॥५६॥
वार्यामुळे पाण्याला जसे अनेक तर्हांचे आकार येतात तद्वत मनाच्या चंचलतेमुळे ज्याच्या चिद्ब्रम्हांत अनेक कल्पना
उद्भवतात त्याचा आत्मविवेक पार नाहीसा होतो ॥५६॥
द्दष्टिद्वयसमत्वेन गुरुलब्धेन यो युत: ॥
ज्ञातव्यस्तेन वै सूर्यश्चितं स्थिरमिदं यत: ॥५७॥
गुरुपासून मिळालेल्या द्वय द्दष्टींनी जो युक्त असतो त्यालाच हा स्वयंप्रकाश सूर्य जाणण्यास योग्य होतो ॥५७॥
मीन: स्नानरत: फणी पवनभुड्मेषस्तु पर्णाशनो ॥
नैराश्यं ह्यपि चातक: प्रतिदिनं शेते बिले मूषक: ॥
भस्मोद्धुलितविग्रह: खलु खरो ध्यानानुरक्तो बक: ॥
सर्वेषां फलमेव नास्ति सकलं ज्ञानप्रधानं तप: ॥५८॥
स्नान करणे, वायुभक्षण अथवा पर्णभक्षण करून रहाणे, नस्ती विरक्ती धारण करणे, एकांतात बीळरुपी गुहेंत वस्ती करणे, भस्मांत लोळणे, ढोंगाचे ध्यान धारण करणे वगैरे गोष्टींनी जर मोक्ष मिळत असता तर वरील गोष्टींच्या अनुक्रमाने - मासे, सर्प, बकरे, चातक
उंदीर, गाढव, बगळे - हे आचरण करणारे केव्हाच उद्धरून गेले असते. कारण ते ते त्या त्या गोष्टी करीत असतात; परंतु खरे तसे
नाहे तर, कोणतेही तप ज्ञानप्रधान असले तरच तें आपले फल देण्यास समर्थ होतें अससिद्धांत आहे ॥५८॥
मार्गं मानुष्यमीनं च त्रिषु लोकेषु दुर्लभं ॥
य: पठेत्सततं भक्त्या स मुक्तो भवसागरात् ॥५९॥
मानुष्य मीनादि जे अनेक मार्ग आहेत त्यांतील हे पहिले दोन मार्ग त्रिभुवनांत अति दुर्लभ आहेत. त्यांच्या ज्ञानप्राप्तिकरिता
जो कोणी हा ग्रंथ नेहमी पठण करतो तो मुक्त होतो ॥५९॥
अष्टांगं च चतुष्पादं त्निस्थानं पंच देवता: ॥
ॐकारं यो न जानाति ब्रम्हविष्णुशिवात्मकं ॥६०॥
आठ अंगे, चार पाय, तीन स्थाने आणि पांच देवता यांनी युक्त असे जे ब्रम्हा, विष्णु आणि महेश यांचे त्रिकुट त्याला जो ओळखीत
नाही तो अधम होय ॥६०॥
N/A
References : N/A
Last Updated : January 01, 2018
TOP