अध्याय चवथा - श्लोक ३१ ते ४०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

जलस्नानं मलत्यागि भस्मस्नाद्वहि: शुचि: ॥
मंत्रस्नाच्छुचिश्वान्तर्ज्ञानस्नानात्परं पदं ॥३२॥
जलस्नानाने अंग शुद्ध होते, भस्मस्नानाने त्वचा शुद्धि होते, मंत्रस्नानाने अंत:शुद्धि होते आणि ज्ञानस्नानाने परमवद प्राप्ति होते॥३२॥
अंत:स्नानघिहिनस्य बहि:स्नानेन किं फलं ॥
मलयाचलसंभूतो न वेणुश्चन्दनायते ॥३३॥
ज्याने अंत:स्नान केले नाही त्याच्या बहीस्नानाचा काय उपयोग. मलयगिरीवर उगवलेला वेळु चंदन होत नाही ॥३३॥
मंत्रस्नानाच्छुष्ध्दचित्त: स चांत:शुद्धिमाप्नुयात्‍ ॥
अंतर्बाह्य शुद्धयार्थ ज्ञानस्नानं च मोक्षदं ॥३४॥
मंत्रस्नानाने चित्तशुद्धि होते हे खरे पण त्यामुळे बाह्य शुद्धिचा लाभ होत नाही, यास्तव अंतर्बाह्यशुद्धी करिता ज्ञानस्नानच
मोक्ष देणारे आहे ॥३४॥
वटबीजेऽपि सूक्ष्मेऽपि मायया गुणयुक्तया ॥
यदस्ति सर्वता वृक्ष: कुत आधाति तद्वद ॥३५॥
वटबीज अतिसूक्ष्म असते परंतु त्या बीजांत - पुढे होणारा अवाढव्य वृक्ष असतो याचे कारण माया ही गुणयुक्त आहे. तसे नसते तर
पुढे होणारा तो वृक्ष त्या बीजापासून उत्पन्न झालाच नसता ॥३५॥
तथैवाम्यंतरे शुद्धे बहि:शुद्ध्यंति तत्क्षणात्‍ ॥
बीजवॄटक्षादिन्यायन सर्वत्रैक्याच्छुविर्भयेत्‍ ॥३६॥
त्याचप्रमाणे वटबीज वृक्ष न्यायाने बहि:शुद्धीपेक्षा अंत:शुद्धीचीच योग्यता अधिक आहे. अभ्यंतर शुद्धिने बहि:शुद्धि आपोआप तत्काल
होते. कारण वरील न्यायाने बाह्याभ्यंतराचे ऐक्य आहे ॥३६॥
नैकततवस्वरूपं चेदुत्पन्नं ज्ञानमच्चति ॥
अहं ममेती चाज्ञानभ्रमतो ह भ्रमेद्वुथा ॥३७॥
एका तत्वस्वरूपाचे जर ज्ञान झाले नाही तर शाब्दिक ज्ञान विफल होते. मी आणि माझे ह्या भ्रमांत प्राणि
व्यर्थ गुरफटला जातो ॥३७॥
दुर्लभो विषयत्यागी दुर्लभं तत्वदर्शनं ॥
बुर्लभा सहजावस्या सद्‍गुरो: करूणां विना ॥३८॥
विषयांचा त्याग करणारा पुरुष किंवा तत्दर्शन ही जशी दुर्लभ आहेत त्याचप्रमाणे सद्बुगुरुंच्या कृपेवाचून सहजावस्था
प्राप्त होणे दुर्लभ आहे ॥३८॥

ऋषिसिद्ध उवाच ।
कथं भगवतो ज्ञानं शुद्धमत्यन्तमुद्भवेत्‍ ॥
तत्रोपायं मुने ब्रूहि मयि तेऽनुग्रहो यदि ॥३९॥
ऋषिसिद्ध म्हणतात:- हे मुने, माझ्यावर जर आपला अनुग्रह असेल तर अत्यंत शुद्ध असे भगवंतांचे ज्ञान कसे उद्भवेल त्याचा
मला उपाय सांगा ॥३९॥
कपिल उवाच ।
जाग्रत्स्वप्नसुषुप्त्यादिप्रपंचो यत्प्रकाशित: ॥
तद्वह्याहमिति ज्ञात्वा सर्वबंधात्प्रमुच्यते ॥४०॥
कपिल म्हणतात -  जाग्रत्‍, स्वप्न आणि सुषुप्ति इत्यादी अवस्थामय प्रपंच ज्याच्याकडून प्रकाशित होत तेंच ब्रम्ह होय असें जाणल्याने प्राणी सर्वं बंधातून मुक्त होतो. ॥४०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP