अध्याय चवथा - श्लोक ६१ ते ६६

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

ॐकारं पितृरुपेण गायत्रीं मातरं तथा ॥
पितरौ यो न जानाति स विप्रश्चान्यवीर्यज: ॥६१॥
ॐकार पितृरुप असून गायत्री मातृरुप आहे. या मातापितरांस जो ओळखित नाहे तो ब्राम्हण कुसंभव होय ॥६१॥
इदं तीर्थमिदं तीर्थ भ्रमंति तामसा जना: ॥
आत्मतीर्थं न जानंति कथं मोक्ष: शृणु प्रभो ॥६२॥
हे तीर्थ ते तीर्थ असे म्हणत तामसी लोक इतस्तत: भ्रमण करीत असतात; परंतु ते आत्मतीर्थाला ओळखीत नसल्यामुळे त्यांना
मोक्ष कसा मिळणार ? ॥६२॥
ज्ञानं भागीरथी गंगा तत्र विश्राम्यतां मन: ॥
प्रात:प्रभृति संध्यातं संध्यात: प्रातरंतरं ॥६३॥
ज्ञान हीच भागीरथी गंगा असल्यामुळे त्यांतच प्रात:कालापासून सायंकालपर्यंत आणि सायंकालापासून प्रात:कालपर्य़ंत साधाकाने आपले मन स्थिर करावे ॥६३॥
यत्करोमि जगन्नाथ तदस्तु मम पूजनं ॥६४॥
हे जगन्नाथा, मी जे कांही करतो ते सर्व आत्मरुप माझेच पूजन असो ॥६४॥
मनश्चित्ततुरंगाभ्यां शरीरं स्पंदनायते ॥
कालचक्रेण वै याति पूर्वकर्म च सारथि: ॥६५॥
मन आणि चित्त या दोन घोड्यांनी युक्त असलेले शरीर रथरूप पावते ते कालरुपी चक्रांनी चालते. त्याला त्याचे पूर्व
कर्मरुप सारथी चालवितो ॥६५॥
यद्दिने पतितो बिंदुर्मातृगर्भे सुनिश्चितं ॥
तद्दिने लिखितें सर्वं हानिमृत्युमुखोत्तरं ॥६६॥
ज्या दिवशी मातृगर्भात रेतबिंदुची स्थापना होते त्याच दिवशी त्या जन्म घेणार्‍या प्राण्याच्या - हानी, मृत्यु, सुखादिकांचे
सर्व लिखित तयार होते ॥६६॥
येथे कपिल गीतेचा राजराजेश्वरयोग नांवाचा चवथा अध्याय समाप्त झाला.

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP