षण्मुखी चोन्मीलिनी च शांभवी चात्मभाषिणी ॥
पूर्वबोधमबोधी च पंच गोप्या हि मुद्रिका: ॥ २१॥
षण्मुखी, उन्मीलिनी, शांभवी, आत्मभाषिणी आणि पूर्वबोधबोधी अशा पाच अत्यंत गुप्त अशा आहेत ॥२१॥
ऊर्मी चैवापि धूम्री च ज्योतिज्वाला चतुष्काल
कलातीता कला: प्रोक्ता: पंच वै सुप्रतिष्ठिता: ॥२२॥
उर्मी, धूम्री, ज्योतिर्ज्वाला चतुष्कला आणि कलातिता अशा ह्या पांच उत्तम कला सांगितल्या आहेत ॥२२॥
पिपिलिका विहड्गश्च कपिमार्गो हि मीनक: ॥
शेषमार्गो हि संख्यायां पंच मार्गा: पुरातना: ॥२॥
पिपीलिका, विहंग, कपि, मत्स्य आणि शेष हे पाच पुरातन मार्ग सांगितले आहेत ॥२३॥
घटाकाशमठाकाशमहदाकाशसंज्ञितम् ॥
चिदाकाशं निराकाशमाकाशपंचकं बिंदु: ॥२४॥
घटाकाश, मठाकाश, महदाकाश, चिदाकाश आणि निराकाश असे पांच प्रकारचे आकाश सांगितले आहेत ॥२४॥
नेत्रं कंठोऽथ ह्यदयं मूर्धा स्थानान्यनुक्रमात् ॥
शिखायां पंचमं स्थानं पंचस्थानं प्रकीर्त्तितम् ॥२५॥
जाग्रति, स्वप्न, सुषुप्ति व समाधी यांची अनुक्रमे - नेत्र, कंठ, ह्यदय आणि मूर्धा
ही स्थाने सांगितली असून पांचवे स्थान शिखेंत सांगितले आहे ॥२५॥
सत्यवैकुंठकैलासमाश्रयो हि चतुर्थक: ॥
निराश्रय: पंमचश्च पंच लोका: प्रतिष्ठिता: ॥२६॥
मृत्यु, वैकुंठ, कैलास, आश्रय व निराश्रय असे पांच लोक प्रसिद्ध आहेत ॥२६॥
विश्वतैजसप्राज्ञाच्च प्रस्यगात्माभिमानिन: ॥
निरंजनस्तदातीत: सोऽभिमानी तु पंचम: ॥२७॥
विश्व, तेजस, प्राज्ञ, प्रत्यगात्मा आणि निरंजन हे पांच पंचदेहांवर अभिमान ठेवणारे आहेत ॥२७॥
तंतिवीणा वितन्तश्च मृदंगघनकांस्यकम् ॥
सुस्वरो वंशिकानदोऽनाहतो वाद्यपंचकम् ॥२८॥
तंतिवीणा, वितंत, मृदंग, घनकांस्य आणि पांच अनाहत असा सुस्वर वेणुनाद ही वाक्ये व त्यांचे पंचनाद सांगितले आहेत ॥२८॥
गायत्र्या: प्रथम: पादो द्वितीयश्च तृतीयक: ॥
चथुर्थपाद ॐकार: पंचम: परमार्थक: ॥२९॥
गायत्रीचा-पहिला, दुसरा व तिसरा असे तीन पाद सांगितले असून तिचा चवथा पाद ॐकार वर्णिला आहे.
गायत्रीचा पंचम पाद परमार्थपर आहे ॥२९॥
गणेशो भास्करो विष्णु रुद्रशक्ती च शाश्वता ॥
देवगर्भेषु पूज्यन्ते पंचायतनदेवता: ॥३०॥
गणपती, सूर्य, विष्णु, शिव आणि शक्ती या पांच देवता वेदांत सांगितल्या असून, वैदिक त्यांची पूजा करितात ॥३०॥