नित्यानित्यविवेकी च इडामुत्र विवर्जित: ॥
तितिक्षोपरति: शांतिर्मुमुक्षोस्तस्य लक्षणम् ॥११॥
नित्यानित्य विवेकी, ऐहिक व फार लौकिक फलाची इच्छा न करणारा, सहनशील, उपरती झालेला आणि शांति या लक्षणांनी
असलेला मुमुक्ष या उपदेशाचा अधिकारी आहे ॥११॥
कुर्वत: सर्वकर्माणि अर्चंत: सर्वदेवता :॥
अटंत: सर्वतीर्थानि फलं नेच्छंति सर्वथा ॥१२॥
सर्क कर्मे करीत राहून सर्व देवतांचे पूजन करणारे आणि सर्व तीर्थयात्रांनी पुनीत होऊन फलाची इच्छा न धरणारे तेच याच्या
उपदेशाला अधिकारी आहेत ॥१२॥
काम: क्रोधस्तथा लोभो मोहो मात्सर्यमेव च ॥
दंभोऽहंकार इत्येतैर्जाग्रतस्वप्नैश्च वर्जित: ॥१३॥
काम,क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, अहंकार व विपरीत दर्शनरूप जाग्रत् व स्वप्न यांनी जो रहित तोच अधिकारी होय ॥१३॥
निंदको वंचको धूर्त: खलो दुष्कृतितामसौ ॥
एते नारकिण: प्रोक्तोस्तानेतान् परिवर्जयेत् ॥१४॥
निंदक, फसव्या, लबाड, दुष्ट, वाईट कृत्ये करणारा व तामसी अशा स्वभावाचे जे पुरुष ते नरकांत पडणारे असल्यामुळे उपदेशास
अपात्र आहेत ॥१४॥
अभक्ते वंचके धूर्ते पाषंडे नास्तिके नरे ॥
मनसाऽपि न वक्तव्यं गुरुगुह्यं कदाचन ॥१५॥
अशक्त, वंचक, लबाड, पाखंडी आणि नास्तिक अशा पुरुषास मनानेंही कधी गुरुगुह्य सांगू नये ॥१५॥
शांतो, दांत: क्षमी शूर: सर्वेंद्रियसमनिवत: ॥
असक्तो ब्रम्हज्ञानेच्छु: सदा साधुसमागत: ॥१६॥
शांत, दमनशी, क्षमावान, शूर, सर्व इंद्रिये चांगली असून ती ताब्यांत ठेवणारा, विषयासक्तीपासून पाराड्मुख ब्रम्हज्ञानाची
इच्छा असणारा, नेहमी साधुसमागम करणारा ॥१६॥
साधुबुद्धि: सदाचारो योऽभेद: सर्वदैवते ॥
आशापाशविनिर्मुक्तस्त्वेते मोक्षाधिकारिण: ॥१७॥
साधुबुद्धिचा, सदाचारी, दैवतात भेद न मानणारा आणि अशा पाशांतून मुक्त असा जो तोच मोक्षाधिकारी आहे ॥१७॥
अनेकजन्मसंस्काराश्रीगुरोश्च कृपावशात् ॥
प्रत्यक्षश्च परोक्षश्च विवेक: प्राप्यते बुधै: ॥१८॥
अनेक जन्मसंस्कारामुळे आणि श्रीगुरुंच्या कृपेमुळे, प्रत्यक्ष आणि परोक्ष विवेक सुज्ञांसच होतो ॥१८॥
भिद्यते ह्यदयग्रंथिश्च्छिद्यंते सर्वसंशया: ॥
क्षीयंते चास्य कर्माणि तरिमन् द्दष्टे परावरे ॥१९॥
परब्रम्हाचा साक्षात्कार झाला असता, ह्यदयग्रांथे तुटून सर्व संशय नाश होतो आणि प्रारब्धावांचून इतर सर्व संचित
आणि क्रियमाण कर्मे क्षीण होतात ॥१९॥
द्दष्टात्परं प्रवक्ष्यामि सर्वसिद्धांतविस्तरं ॥
वेदांतं च प्रकाशं यत्तत्वं श्रेष्ठमनुत्तमं ॥२०॥
या द्दश्य प्रपंचाहून अगदी भिन्न असलेले सर्व सिद्धांत विस्ताररुप आणि वेदान्तांत प्रसिद्ध असलेले श्रेष्ठ व अनुत्तम असे
जे तत्व ते आतां सांगतो ॥२०॥