अध्याय दुसरा - श्लोक १ ते १०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.


तारकं दंडकं चैव कुंडल्यं चार्धचंद्रकम्‍ ॥
पंचमं बिंदुसंकाशं पंचब्रम्ह सनातनम्‍ ॥१॥
सनातन पंचब्रम्ह कसे आहे ? तर -तारक, दंडक, कुंडल्य, अर्ध चंद्रक, पांचवे बिंदुसंकाश असे आहे ॥१॥
ब्रम्हा विष्णुश्च रुद्रश्च ईश्वरश्च सदाशिव: ॥
पंच दैवं तु विख्यातं पंचब्रम्हस्वरूपवत्‍ ॥२॥
पांच ब्रम्हस्वरुपाप्रमाणेंच - ब्रम्हा, विष्णु, रुद्र, ईश्वर आणि सदाशिव हे पंचायतन प्रसिद्ध आहे ॥२॥
अकारश्च उकारश्च मकारश्च त्रिमातृकम्‍ ॥
एकारश्व्चैव एकार: पंचकं मातृसंज्ञितम्‍ ॥३॥
ॐकारात असणार्‍या अकार, इकार, उकार, मकार व एकार - ह्या पांच प्रकारच्या मात्रा मातृसंज्ञक आहोत ॥३॥
त्रिकूट श्रीहटं स्थानं गोल्हाट, औटपीठ, पुण्याद्री, भ्रामरी व गुंफा - हीं ब्रम्हरंध्रे आहेत ॥४॥
वैखरी मध्यमा बाचा पश्यंती, परा व परात्परा - त्यांपैकी परात्परेचा महिमा अवर्णनीय आहे ॥५॥
अध:शून्यं चोर्ध्वशून्य़ं हि मध्यं सर्वं शून्यं शून्यमिहांद शून्यम‍ ॥
चतु:शून्यागोचरं यन्निशून्यं निर्नामशून्यं निरामयं च ॥६॥
अध: शून्य, ऊर्ध्व शून्य, मध्यशून्य, सर्वशून्य आणि पांचवे अंत:शून्य अशी ही पांच आहेत; परंतु यांतील फक्त पहिली चारच जाणता येतात पांचवे शून्य चारी शून्यांचा विषय होणारे नसून - नि:शून्य, निर्नामशून्य आणि निरुपद्रव असे आहे ॥६॥
जाग्रत्स्वप्न: सुषुप्तिश्च तुयावस्था च उन्मनी ॥
सा चैव सहजावस्था पंचमस्था: प्रकीर्तिता: ॥७॥
जाग्रत्‍, स्वप्न, सुषुप्ति, तुर्या व उन्मनी अशा पांच अवस्था जरी प्रसिध्द आहेत तरी त्यांतील पहिल्या चार सकारण असून पांचवी स्वाभाविक आहे ॥७॥
स्थूलं सूक्ष्मं कारणं च महाकारणकं परम्‍ ॥
कैवल्यज्ञानदेहश्च पंच देहा: प्रकीर्तिता: ॥८॥
स्थूल, सुक्ष्म, कारण, महलाकारण आणि कैवल्यज्ञान देह असे देहाचे प्रकाअर सांगितलेले असून त्यांत शेवटचा प्रकार अत्यंत शुद्ध  व निराकार आहे. ॥८॥
र्‍हस्वमात्रा दीर्घमात्रा प्लुतमात्रा त्रिभेदत:
अर्धमात्रा‍ऽप्युनुच्चार्या मात्रा: पंचकसंज्ञिता: ॥९॥
र्‍हस्व मात्रा, दीर्घ मात्रा, प्लुत मात्रा, अर्ध मात्रा आणि अनुच्चार्य मात्रा असे मात्रांचे पांच प्रकार आहेत. ॥९॥
ॠग्वेदोऽथ यजुर्वेद: सामवेदोह्यथर्वण: ॥
सूक्ष्मवेको हि चाध्यक्ष: पंच वेदा: प्रतिष्ठिता: ॥१०॥
ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद आणि सूक्ष्मवेद असे पांच वेद असून त्यांतला मुख्य सुक्ष्मवेद आहे ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 31, 2017

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP