शैवा: पाशुपता महाव्रतधरा: कालीमुखा: जंगमा: ।
शाक्ता: कौलकुलार्चनादिनिरता: कापालिका:
शांभवा: ॥ येऽज्ञा कृत्रिममंत्रतंत्रनिरतास्ते
तत्वतो वंचिता: ॥
तेषामल्पमिहैकमेव हि फलं सत्यं न मोक्ष: पर: ॥११॥
शेष, महाव्रते, आचरणारे पाशुपत, कालीमुख, जंगम, देवीउपासक्म कुलार्चनांत दंग असलेले कौल, कापालिक,शांभव आणि त्याचप्रमाणे
कृत्रिम मंत्रतंत्रादिकांत रत असलेले अज्ञ, आपल्या अज्ञानाने निव्वळ फसले गेले आहेत. ऐहिक सुखाचेंच त्यांना अल्पसे फळ मिळते. परंतु मोक्ष कधीही प्राप्त होत नाही ॥११॥
चार्वाकाश्चतुरा: स्वधर्मनिपुणा देहात्मवादे रता: ॥
नानातर्ककुतर्कभावसहिता निष्ठापरास्तार्किका: ।
वेदार्थप्रतिपादका: सकुशला: कर्तेति नैय्याधिक् ।
स्तेषांस्वल्पफलं भवेत्तु सततं सत्यं न मोक्ष: पर: ॥१२॥
चतुर चार्वाक, स्वधर्म निपुण अनेक तर्हांच्या तर्ककुतर्कात मग्न असतात; स्वदर्शनावर त्यांची मोठी निष्ठा असते; ते वेदार्थ
प्रतिपादक असतात; असे ते मोठे कुशल नैय्यमिक आत्म्यालाच कर्ता समजतात. त्यामुळे त्यांना त्यांच्या ज्ञानाचे अगदी
अल्प फळ मिळते आणि त्यांना मोक्ष अप्राप्य असा होतो ॥१२॥
कर्माकर्मविकर्मबोधजनका: कामार्थमीमांसका: ॥
सांख्यास्त्यागपरा: सदा विविदिषां संन्यासिन: स्नातका: ॥
योगांगाष्टकबोधकप्रतिभटा: पातं जला न्यायका योगज्ञानमिदं
प्रबोधनजनकं सत्यै न मोक्ष:ळ पर: ॥१३॥
कर्ममीमांसक जे असतात ते-कर्म, अकर्म, विकर्म यांचा बोध करितात, सांख्य त्यागपरायण असून ते नेहमी ब्रम्हचर्यव्रताने
विविदिपासंन्या अवलंबितात व पातंजलन्यायांत प्रवीण असलेले योगी अष्टांग योगाध्य प्रतिपादनात शूर असतात. हे योगजनक
ज्ञान आत्मसाक्षात्कारक असे आहे हे खरे; परंतु त्याच्या योगाने परममोक्षप्राप्ति होत नाही ॥१३॥
वेदांती बहुतर्ककर्कशमतिश्चाद्वैतसंबोधको ॥
नानावादविवादिनो न निपुणा विज्ञानबोधात्मका: ॥
कर्तारं प्रवदंति चैष यवन: पापे रता निर्दया ॥
त्रिप्रा वेदरता: समत्वनिरता: सत्यं न मोक्ष:पर: ॥१४॥
वेदांती अनेक तर्के लढवून अद्वेताचे प्रतिपादन करितात. परंतु त्यांची मती भ्रष्ट झालीले असते. अनेक तर्हेचे वाद करून ते
स्वत:ला विज्ञानबोधस्वरूप असे मानितात खरे; परंतु ते बोलण्याप्रमाणे निपुण नसतात. पापरत आणि दुष्ट यवन आत्म्यालाच
कर्ता असे मानितात.ब्राम्हण वेद रत आणि समत्वमग्न असतात; परंतु त्यांनाही परमोक्षप्राप्ति होत नाही ॥१४॥
शून्यार्थप्रतिपादका लघुगुरोर्बोधज्जिना श्रावका ।
नानातीर्थनिषेवका: श्रुतिपरा: स्मृत्यर्थसंबोधका:
चंडाश्चंडविचंडजल्पकमहाभेदा: सदा वैष्णवा: ॥
सर्वे वै प्रपतंति दु:सहतरे सत्यं न मोक्ष: पर: ॥१५॥
श्रावक जैन सामान्य गुरुच्याने उपदेशाने शून्यार्थ प्रतिपादक होतात. श्रृतिस्मृतींना प्रमाण मानून त्यांचा अर्थ बोध करणारे ब्राम्हण
अनेक तीर्थांचे सेवन करितात. वैष्णव स्वभावत:च नेहमी जाज्वल्य आणी तीक्ष्ण व उग्र भाषण करणारे असतात; परंतु हे सर्व
दु:सह अशा भवसागरात पडतात आणि त्यामुळे त्यांना मोक्ष अप्राप्त होतो ॥१५॥
प्राणापाननिरोधनार्थनिरता: संस्थाप्यते शेषका ।
वायुं पूरककुंभकं प्रतिदिनं तं रेचकं वा हठात् ॥
जिव्हादोहनकर्मिका: सुरसिका लंबायना लंबिका ।
योगांगैश्च विभूषिताश्च सततं सत्यं न मोक्ष:पर: ॥१६॥
पातंजल योगाभ्यासी प्राणायान वायूंचा निरोध करण्यांत दंग असलेले योगी वायूची संस्थापना करुन,पूरक,रेचक व
कुंभक करितात व जिभेला तालूंत शिरकवून तिला हलविण्याचा प्रयत्न करितात. ते मोठे रसिक असून लंबिकायोगही
साधितात. ते यमनियमादि योगांगांनि जरि भूषित असतात तरी त्यांना मोक्षलाभ होत नाही. ॥१६॥
यं शैवा: समुपासते शिव इति ब्रम्हेति वेदांतिनो ।
बौद्धा बुद्ध इति प्रमाणपटव: कर्तेति नैय्यायिका: ॥
अर्हन्नित्यथ जैनशासनरता: कर्मेति मीमांसका: ।
सोऽयं वो विद्धातु वांछितफलं सत्यं न मोक्षात् परं ॥१७॥
शैव ज्याची शिव या नामाभिधानाने उपासना करितात, जे व वेदांति ब्रम्हाचेच अनुसंधान करितात, बौद्ध ज्याला बुद्ध या
नांवाने ओळखतात, प्रमाणकुशल असे नैय्यात्रिक त्याला कर्ता म्हणतात, जैन शास्त्रात ज्याला अर्हन् म्हणतात, मीमांसक ज्याला
कर्म म्हणतात तो हा परमात्मा तुम्हां सर्वांना वांच्छित फळ देवो. खरोखर मोक्षाव्यतिदिक्त सत्य असे दुसरे काही नाही ॥१७॥
सौरा: सूर्यमुपासते च सततं शाक्ताश्च शक्तिं तया ।
नागेशिषु परं गणेशभजनं विष्णुं भजेद्वैष्णव: ॥
शैवानां शिवपूजनं परमकं विप्रे च सर्वात्मकं ।
नानादैवतवांच्छितार्थवरदं सत्यं न मोक्षात् परं ॥१८॥
सौर नेहमी सूर्याची आराधना करितात, शाक्त देवीचे अर्चन करितात, वैष्णव विष्णुचीचे भक्ति करितात, शैव शिवपूजनालाच अधिक
मानितात आणी सामान्य ब्राम्हण सर्वात्मक अशा परमेश्वराची भक्ति करितो; कारण तो अनेक देवतांना इष्ट असलेले वर देतो;
परंतु मोक्षापेक्षाश्रेष्ठ असे दुसरे काही नाही ॥१८॥
नानाचित्रविचित्रवेषशरणा नानामते भ्रामका ॥
नानातीर्थनिषेवका जपपरा मौनस्थिता नित्यश: ॥
सर्वे चोदरसेवकास्त्वभिमता वादे विवादे रता ॥
ज्ञानान्मुक्तिरिदं वदंति मुनयस्त्वप्राप्य सा दुर्लभा ॥१९॥
चित्रविचित्र असे अनेक वेष धारण करणारे, अनेक मतांत भ्रमण करणारे, अनेक तीर्थांचे सेवन करणारे,जपजाण्यात निमग्न
असणारे, नेहमी मौन धारण करणारे व वादविवादात सतत निमग्न असणारे हे सर्व पोटाचे नोकर आहेत असे मानिलेले आहे.
ज्ञानाच्या योगाने मुक्ति प्राप्त होते असे मुनि सांगतात तेव्हा ज्ञानाशिवाय ती दुर्लभच होय ॥१९॥
ज्ञानमात्रेण मुच्यंते नानासाधनवर्जिता: ॥
साक्षातकारपरं ज्ञानं प्राव्यते गुरुराजत: ॥२०॥
ह्या वर सांगितलेल्या अनेक साधनांनी युक्त ज्ञानाच्याच योगाने मुक्त होतात. साक्षात्कारपर ज्ञान प्राप्त होण्यास गुरुराजच
कारण होतात ॥२०॥