नत्वा श्रीगुरुपादाब्जं स्मत्वा मोक्षार्थसिद्धिदम्
तारकाभ्यंतरे पंच महतत्वं तदुच्यते ॥१॥
श्री सद्गुरुंच्या पादरविंदाचे वंदन करुन व मोक्ष देणारा जो परमेश्वर त्याचे स्मरण करुन, तारकांतले पंचम त्यांचे आता येथे
स्पष्टिकरण करितो ॥१
दिशा पाच वेदिका, पांच कोण, पांच ऋचा, प्रमाण संज्ञक पंचक ॥४॥
पाच अंगे (पंचाग म्हणजे स्वत:चा देह, अगर ज्योतिष पंचाग), पांच निरनिराळे वर्ग, पांच मुद्रा, आरंभी आहेत अशा पांच गुप्त कला,
धर्मांत वागण्याचे महर्षींनी घालून दिलेले पांच मार्ग, पांच प्रकारची आकाशस्थाने ॥५॥
देहांतील पांच जागा, ब्रम्हांडातीत्ल पांच स्थले, ब्रम्हांडस्थित पंचलोकात वास्तव्य करणारे सर्व ॥६॥
पांच देहाभिमाने, इंच वाद्ये, पांच पायांची गायत्री, देवतापंचायतन ॥७॥
पांच शक्ती, पंच विचार, पांचामुखी प्रमेश्वरी निर्णय, पंचाग्नि, पांच तर्हांचे आनंद आणि पांच नामे याप्रमाणे पस्तीस पंच तारकां
आहेत ॥८॥
भवबंधापासून मुक्त व्हावयाचे असणार्या गुरुमुखातून या ग्रंथातील शंभर किंवा निदान पन्नास श्लोक तसे सार्थ ऐकावेत ॥९॥
ऐकणाराला पुन्हा संसारांत पडावे लागणार नाही, जन्ममृत्यूचे भय रहाणार नाही आणि आत्ममोक्षाची सिद्धि करणारे म्हणजेच भवबंध
नाहीसा करणे हा जो पुरुषार्थ तोच यामुळे उत्तम गति-उत्तम फल देणारा आहे ॥१०॥
श्री पद्मपुराणातील कपिलमातेचा पहिला अध्याय येथे संपला.