अध्याय चवथा - श्लोक २१ ते ३०

कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.

शाश्वतानन्दत्त्वं पूर्णरुपस्वरुपकं ॥
तुष्टत्वं चाचलत्वं च षडैश्चर्यादि प्राप्यते ॥२१॥
अढळ आनंद, शाश्चत शांति, अखंड सत्ता, पूर्ण आत्मस्वरूप, तुष्टि व अचलत्व ही षडैश्वर्य प्राप्ति साधकाला ज्ञानाच्याच
योगाने प्राप्त होते ॥२१॥
ऋषिसिद्ध उवाच ।
जलस्नानाब्दहि:शुद्धिरंत:शुद्धि: कथं भवेत्‍ ॥
योगिनां च कुत: स्नानं कृपालो कपिलोच्यताम्‍ ॥२२॥
ऋषिसिद्ध म्हणतात:- हे कृपाळु कपिल मुने, जलस्नानाने शरीराची बाह्य शुद्धि होते परंतु अंत:शुद्धि कशी होईल ?
योग्यांना स्नान कसे घडते ते सांगा ॥२२॥
वामनासापुटे हीडा पुटे दक्षे च पिंगला ॥
गांधारी वामकर्णे च हस्तिनी दक्षिणे तथा ॥२३॥
कपिल म्हणतात:- डाव्या नाकपुडित ईडा, उजवीत पिंगला, डाव्या कानांत गांधारी, उजव्यांत हस्तिनी ॥२३॥
सुषुम्ना चांगदा प्रोक्ता जिव्हाग्रे च सरस्वती ॥
वामनेत्रे चक्षुषा तु दक्षिणे‍ऽलंबुषा मता ॥२४॥
अंगदा सुषुम्नलाच म्हणतात, जिव्हाग्रावर सरस्वती, डाव्या डोळ्यांत चक्षुषा व उजव्यांत अलंबुषा अशी ही
नाड्यांची स्थाने आहेत ॥२४॥
कुडूर्गुदस्था संप्रोक्ता शंखिनी लिंगसस्थिता ॥
मूत्रद्वारे वारूणी स्यात्‍ सर्वांगे च पयस्विनी ॥२५॥
गुदांत कुडु, लिंगात शंखिनी, मूत्रद्वारात वारुणी आणि सर्व देहांत पयस्विनी याप्रमाणे नाड्यांची स्थाने आहेत ॥२५॥
नाड्यो द्वादश संप्रोक्ता शरीरे सुव्ययस्थिता: ॥
व्यापोनुवंति दशद्वारं चराचरनियामक: ॥२६॥
ह्या वर सांगितलेल्या बारा नाड्या शरीरात फिरत असतात आणि चाराचरांचे नियम करितात ॥२६॥
इडा भागीरथी गंगा पिंगला यमुना नदी ॥
सुषुम्ना गंडकी प्रोक्ता कृष्णवेण्यौ सरस्वती ॥२७॥
इडा ही भागीरथी गंगा, पिंगला ही यमुना, सुषुम्ना ही गंडकी आणि कृष्णवेणी ही सरस्वती असे म्हटले आहे ॥२७॥  
कुहूश्च नर्मदा ज्ञेया तापी स्याच्छंखिनी तथा ॥
गांधारी चापि कावेरी वारुणी गौतमी तथा ॥२८॥
कुहु हीच नर्मदा, शंखीनी हीच तापी,गांधारी हीच कावेरी, वारूणी हीच गौतमी ॥२८॥
ताम्रपर्णी सुबानाडी सिंधुर्ज्ञेया च हस्तिनी ॥
गोमत्यतंबुषा चैव पूर्णा पूर्णपयस्विनी ॥२९॥
चक्षुषा हीच तम्रपर्णी, सिंधु हीच हस्तीनी आणि पूर्णपयस्विनी हीच गोमत्यलंबुषा जाणावी ॥२९॥
इति नाडी नदी प्रोक्ता शरीरे वर्तते सदा ॥
पवनं च तुरीयं च सर्वत: स्नानमुच्यते ॥३०॥
एणें प्रमाणे नाड्यांच्या ठिकाणी नद्यांची कल्पना करावी आणि त्या नद्या आपल्या शरीरांत आहेत असे समजावे. योगमार्गाने
जाऊ लागले असतां आत्म्याचे तुर्य-साक्षिस्वरूप होते आणि सर्व तीर्थांचे स्नान घडते ॥३०॥

N/A

References : N/A
Last Updated : January 01, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP