अध्याय तिसरा - श्लोक ६१ ते ७०
कपिल ऋषी प्राचीन भारतातील एक प्रभावशाली मुनि होऊन गेले. यांना सांख्यशास्त्र विषयातील आध्य प्रवर्तक मानतात.
षड्दर्शनादिमार्गेषु ब्राम्हदर्शि तथैवच ॥
वर्णेषु वर्णहेनेषु चांडालादिषु निश्वितं ॥६१॥
षड्दर्शनादि मार्गामध्ये ब्राम्हदर्शनच उत्तम होय. या तत्वाचे ज्ञान ब्राम्हणादि उच्चवर्ग किंवा चांडला हीन
वर्ग ही निश्वयाने करून घेतात ॥६१॥
सप्तकोटिर्महामंत्राद्यसंख्या ह्युपमंत्रका: ॥
एताश्च सकलान् मंत्रान् न तावच्चेह ब्रुमहे ॥६३॥
महामंत्र सात कोटि असून उपमंत्र तर असंख्य आहेत; परंतु त्या सर्व मंत्रांचा नुसता नामनिर्देशही आम्ही एथे करणार नाही ॥६३॥
सर्वमंत्राधिका: श्रेष्ठा: पंचायतनमंत्रका : ॥
गजाननाधिकतरा सूर्यविद्या विशिष्यते ॥६४॥
सर्व मंत्रांहून पंचायतन देवतांचे मंत्र श्रेष्ठ होत. त्यांतल्या त्यांत गणपतीपेक्षा सूर्यविद्या विशेष आहे ॥६४॥
सूर्यविद्याधिका देवि विष्णुविद्या विशिष्यते ॥
विष्णुविद्याधिका श्रेष्ठा शांभवी शिववल्लभा ॥६५॥
सूर्वविद्येपेक्षा विष्णुविद्या श्रेष्ठ आहे आणि विष्णुविद्येपेक्षा शंकरास प्रिय असलेली शांभविद्या अधिक आहे ॥६५॥
शांभव्या अधिका देवि शक्तिविद्या परा स्मृता ॥
एतच्छ्रेष्ठतरा विद्या एतच्छ्रेष्ठा न विद्यते ॥६६॥
शांभवी विद्येहूनही शक्तिविद्या श्रेष्ठ आहे, असे हे देवि म्हटले आहे. या विद्येहून श्रेष्ठ अशी विद्या नाही ॥६६॥
सर्वविद्याशिरो ह्यस्माच्छ्रीविद्या हि न संशय: ॥
तस्मात् सा सर्वविद्यानां श्रीविद्या शिरसि प्रिये ॥६७॥
प्रिये, ही विद्या सर्व विद्यांचे मस्तक आहे म्हणूनच तिला श्री विद्या असे म्हणतात यांत संशय नाही. म्हणून
ती विद्या सर्व विद्यांच्या मस्तकावर आरुढ झाली आहे ॥६७॥
रांजंरांजश्वेरी विद्या एतन्मुख्या न काचन ॥
सत्यं सत्यं पुन: सत्यं सत्यं सत्यं पुन: पुन: ॥६८॥
ही राजराजेश्वरी विद्या असून हिच्यापेक्षा मुख्य अशी दुसरी कोणचीच विद्या नाही हे सत्य सत्य असें अगदी
सत्य म्हणून पुण: पुण: सांगतो ॥६८॥
सत्यं सत्यं पुन: सत्यं त्रिर्वाचा कथयाम्यहं ॥
अस्याधिका सर्वरिता एतस्मिन् कथिता तव ॥६९॥
हे सत्य सत्य पुन्हां सत्य असे त्रिवार मी सांगतो आहे. हिच्या महिम्यापेक्षा कोणच्याही विद्येचा महिमा अधिक नाही ॥६९॥
एतदूर्ध्वं न कस्यापि निश्चितं कथितं शिवे ॥
भाष्यं मे हि पुनर्भाष्यं निश्चयेन ब्रवीम्यहं ॥७०॥
हे शिवे, ह्याहून अधिक निश्चित असे मी कधीच कोणाला सांगीतलेले नाही. हे माझें प्रमाणभूत भाष्य आहे. पुन्हां मी
तुला निश्चयाने सांगतो की हे माझे भाष्य आहे ॥७०॥
N/A
References : N/A
Last Updated : December 31, 2017
TOP